पिकनिक भाग १६
विदिशा.
त्या क्षणी सर्वांना जाणवलं— ज्याला त्यांनी आपल्या कुटुंबात सामावून घेतलं होतं, जो विदिशाच्या आयुष्याचा आधार बनला होता… तो अचानक त्यांच्या हातातून निसटला होता.
दोन दिवस गेले. घरातल्या लोकांचे डोळे सुजले होते. पण बाहेरचं जग शांत होतं, शेजाऱ्यांना कुतूहल वाटू लागलं.
एक दिवस दुपारी शेजारच्या काकू आल्या, घरातलं वातावरण बघून म्हणाल्या,
“अहो, हे काय? इतकं उदास वातावरण?… आणि विशाल दिसतच नाही? कुठे गेला तो?”
काकांनी जबरदस्तीने चेहऱ्यावर स्थिरता आणली, पण आवाज दुःखाने दडपलेला होता.
“त्याचे वडील फार आजारी आहेत, म्हणून बातमी मिळताच तो ग्वाल्हेरला गेला.”
“ग्वाल्हेर?” – शेजाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. “इतक्या लांब? त्याचे आईवडील तिथेच असतात का?”
काकांनी थोडा विराम घेतला. मग शांत, जणू फार जुनी गोष्ट सांगत आहेत अशा स्वरात म्हणाले,
“हो… महादजी शिंद्यांच्या बरोबर जे मराठे ग्वाल्हेरला गेले, त्यात विशालचे पणजोबा होते. तेव्हापासून त्यांचं घराणं तिथेच आहे. म्हणूनच त्याचे मूळचे लोक ग्वाल्हेरला राहतात. आता वडील प्रकृतीने खालावले आहेत, म्हणून तर तो धावत गेला.”
“हं… ठीक आहे. पण न सांगता एवढं अचानक? असो, परत आल्यावर कळेलच.”
ते लोकं गेले, पण त्यांचा संशय घरातल्या सगळ्यांना जाणवला.
विदिशा खिडकीतून पहात होती. डोळ्यांना धार लागली होती. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, “कुठे गेला असेल माझा विशाल? खरंच ग्वाल्हेरला? की… खरोखरच नाहीसा झाला?”
काकांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला,
“मुली, धीर धर. आत्ताच सगळ्यांना खरं सांगितलं तर गोंधळ उडेल. वेळ आल्यावर सगळं कळेल. तो कुठेही असेल… परत येईलच.”
पण काकांच्या आवाजातल्या तुटकपणामुळे विदिशाला जाणवलं— काकांनाही मनाच्या तळाशी शंका आहे.
विदिशा पार कोलमडून गेली होती. तिच्या सगळ्या संवेदना बधिर झाल्या होत्या. आता या अनोळखी जगात ती एकटी पडली होती. भविष्यात पुढे अजून काय वाढून ठेवलं आहे यांची कल्पनाच करवत नव्हती. विशाल बरोबर होता, त्याचा केवढा आधार होता. पण आता तो नाहीये म्हंटल्यांवर तिला एकटीलाच वाटचाल करावी लागणार होती. त्यांचं लग्न झालं नव्हतं पण ती विशाल मधे पूर्ण गुंतली होती.
विदिशा विहिरीवर विशालचे कपडे घेऊन एकटीच सुन्न बसली होती. आत्ता विशाल येईल आणि आपल्याशी बोलेल असा विचार करत होती. ती विशालची वाट पहात होती. नजरेत कुठलाही भाव नव्हता. काकू आणि रोहिणी तिच्या कडे बघत होत्या. दोघींनाही तिला कसं ताळ्यावर आणावं हेच उमगत नव्हतं.
“वहिनी, विदिशाची अवस्था बघवत नाही हो. काही तरी करायला पाहिजे. “ – रोहिणी.
“हो न. पोरीनी दोन दिवस झाले, काहीच खाल्ल नाहीये. जीव खूप कळवळतो, तिला असं बघून. काय तिच्या नशीबात लिहून ठेवलं आहे देव जाणे.” – काकू.
“वहिनी, हिला कशात तरी गुंतवायला हवं. त्या शिवाय ती या भोवऱ्यातून बाहेर पडणार नाही.” - रोहिणी.
“बरोबर बोलते आहेस तू. मी ह्यांच्याशी बोलते.” – काकू.
त्या दिवशी दुपारी, चार वाजता नेहमी प्रमाणे सरेव ओसारतीत जमले होते आणि गप्पा चालू होत्या. मधेच काकांनी विदिशाला विचारले,
“अग तू मागे एकदा हातातल्या फोन बद्दल काही म्हणत होतीस, काय प्रकार आहे तो जरा सविस्तर सांगशील का?” – काका.
“विदिशा तिथे बसली होती खरी, पण तिचं बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती विशाल मधेच हरवली होती. तिला रोहिणीने कोपरखळी दिली आणि म्हंटलं,
‘कुठे हरवली आहेस? काका काही विचारताहेत तुला.” – रोहिणी.
“अं काय? मला काही म्हंटलं काका?” विदिशा म्हणाली.
मग काकांनी पुन्हा प्रश्न विचारला. विदिशाने थोडा विचार केला की आपण काय सांगितलं होतं त्याचा, आणि आठवल्यावर म्हणाली,
“मोबाइल बद्दल विचारता आहात का? काही विशेष नाही, टेलीफोन सारखा टेलीफोन पण फक्त तळहातात मावेल एवढा. अजून काही नाही.” – विदिशा.
“बस एवढंच?” – काका.
“नाही म्हणजे बऱच काही असतं. पण कसं सांगू तेच कळत नाहीये. तुम्हाला कल्पना करता येणार नाही असं आहे सगळं.” – विदिशा.
“तू सांग आम्ही समजण्याचा प्रयत्न करू.” – काका विदिशाला बोलतं करण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते.
साधारण २००० साला पासून मोबाइल चं चलन खूप वाढलं आता तर असं आहे की जवळ जवळ प्रत्येक माणसाजवळ मोबाइल असतो. म्हणजे कोणीही कोणाशी केंव्हाही बोलू शकतो.” – विदिशा.
“विदिशा फोन ला तारा लागतात. मोबाइल कसा चालतो?” – रघुनाथ.
“रेडियो सारखा. रेडियो कसा वाजतो?” – विदिशा.
“रेडियो ला एरियल असते. त्यातून येणाऱ्या विद्युत लहरी ग्रहण केल्या जातात, आणि त्या आवाजा मध्ये संक्रमित करून आपल्याला ऐकवल्या जातात.” – काका.
“म्हणजे वायरलेस, बिनतारी. तसंच मोबाइल मध्ये पण होतं. पण काका त्या वेळेस तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की एरियल ची जरूर नसते. मोठं मोठे मायक्रो वेव टॉवर असतात, त्यांच्या रेंज मध्ये मोबाइल असतो. ते टॉवर, वेव परावर्तित करतात आणि मोबाइल त्या ग्रहण करतात.” – विदिशा.
“मोबाइल बॅटरी वर चालतो का? पण बॅटरी किती मोठी असते. त्याच्या सकट मोबाइल हातात कसा मावेल?” – काका.
“मोबाइल बॅटरी वरच चालतो पण बॅटरीचा आकार पार्ले च्या बिस्किटा एवढा असतो. आणि त्या बॅटरी वर मोबाइल दिवसभर चालतो. आणि बॅटरी पुन्हा चार्ज करता येते. रात्री लावली की सकाळी तयार.” – विदिशा.
“आणि बोलायचं कसं?” – काका
“आताचे जे फोन आहेत त्यांना नंबर फिरवावा लागतो. मोबाइल ला छोटी छोटी म्हणजे वाटाण्या एवढी चोकोनी बटणं असतात. आता जगातल्या प्रत्येक देशाचा एक नंबर असतो तसंच प्रत्येक शहराला नंबर असतो. आपल्याला ज्या माणसाशी बोलायचं असेल, त्याचा पण एक नंबर असतो. आधी देशाचा कोड नंबर लावायचा, मग त्या माणसाचा नंबर लावायचा. फोन कनेक्ट झाला की बोलायचं.” – विदिशा.
“इतकं सोपं झालं आहे? तुम्हाला हव्या त्या माणसाशी बोलता येतं? केव्हाही?” – काका.
“हो काका फक्त त्या माणसा जवळ पण फोन किंवा मोबाइल हवा.” – विदिशा.
“खूपच प्रगती झालेली दिसते आहे.” – काका.
“अजून आहे काका, तुम्हाला जर त्या माणसाला पाहायचं असेल तर तसाही कॉल करता येतो. त्याला विडियो कॉल म्हणतात. म्हणजे तो माणूस कुठे आहे घरात आहे की बाहेर आहे काय करतो आहे हे सगळं त्यात दिसतं. आणि आपण सुद्धा त्याला दिसतो. अगदी सिनेमा सारखं. म्हणजे तो जर चालत असेल, तर तो चालतांना आपल्याला दिसतो. इथवर प्रगती झाली आहे.” – विदिशा.
हे ऐकल्यावर तर सर्व थककच झाले. या सगळ्या गोष्टींची कल्पना करणं सुद्धा त्यांना अवघड जात होतं. त्यावेळेस चिंचणी गावात एकही फोन नव्हता. त्यांनी फोन फक्त सिनेमात बघितला होता.
“आमच्या गावात टुरिंग टॉकीज आली होती त्यात आम्ही फोन बघितला होता. पण हे तर संजयने जसं महाभारत बघितलं तसंच झालं आहे.” – काकू.
“हो काकू.” – विदिशा.
“हे तर विचित्र विश्व मासिकात येतात तश्याच गोष्टी सांगते आहेस तू. अजून काय काय आहे तुझ्या पोतडीत?” – काकू.
“अजून.. हूं, काका तुम्हाला एखाद्या महत्वाच्या कागदाची कॉपी करायची असेल, तर तुम्ही काय कराल?” – विदिशा.
“हा काय प्रश्न आहे? दुसऱ्या एका कागदावर सर्व मजकूर लिहून काढू.” – काका.
“पण ते करतांना एखादा शब्द काना, मात्रा चुकू शकते. आणि कदाचित अर्थ बदलू शकतो.” – विदिशा.
“होऊ शकतं. पण ते दुसऱ्याने वाचल्यावर लक्षात येऊ शकतं.” – काका.
“आणि ते जर सरकार दरबारी जमा करायचं असेल तर?” – विदिशा.
“तर त्यावर सत्य प्रतिलिपी असं लिहून तहसीलदार साहेबांची सही घ्यावी लागते.”–काका.
“आता बघा प्रगती कशी झाली आहे, ७० सालात कॉपी करण्यासाठी फोटोस्टॅट हा प्रकार निघाला. म्हणजे कागदाचा फोटो काढायचा. संपलं. पण या कॉपीज जरा धूसर असायच्या. मग ९० सालाच्या पुढे झेरॉक्स नावाची मशीन आली. त्या मशीन मधून जे काही लिखाण असेल, चित्र असेल किंवा आकृती असेल, ती जशी च्या तशी कॉपी होईल. अगदी मुळ प्रती असेल तशीच. आणि तेही दोन सेकंदात बघा.” – विदिशा.
“असं खरंच होतं?” – काका.
“हो काका. आणि यांच्या पुढची पण एक पायरी आहे.” – विदिशा.
“अग इतकं झालं, आता याच्यापुढे आणखी काय होणार?” – काकू.
“सांगते न, तर, हे जे मशीन असतं याला टेलीफोन जोडला की याचं फॅक्स मशीन बनत. मग आपल्याला या कागदाची कॉपी ज्याला पाठवायची आहे, त्याचा नंबर फिरवायचा. फोन कनेक्ट झाला, की हा कागद त्या मशीन मध्ये सरकवायचा. हा कागद जसा च्या तसा मशीन मधून बाहेर येतो पण याची हुबेहूब कॉपी पलीकडच्या मशीन मधून बाहेर पडते. आता बोला.” – विदिशा.
सगळे जण स्तंभित होऊन विदिशा कडे बघत होते. विदिशाचा चेहरा उजळला होता. ती डिप्रेशन मधून बाहेर आली होती. काकूंचा उद्देश सफल झाला होता.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – विदिशा

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा