प्रिया आज माझी भाग २२
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सर्व काही व्यवस्थित चालले आहे असे सर्वांना वाटत होते. दोघांचं वरवरचे सुख बघून सर्व खुश होते. लग्नाआधी शेखरची कामे त्याची आई करत होती पण आता ते तिने प्रियाकडे सोपवल्यामुळे प्रिया ते आनंदाने करीत होती विशेष म्हणजे तो ही काही हरकत घेत नव्हता.
त्याच्या आवडीन आवडी त्याच्या सवयी सर्व प्रियाने जाणून घेतल्या होत्या.
सकाळी उठल्यावर त्याला नाश्त्याला फक्त सँडविच हवे असते, त्याला कोरा चहा आवडतो... पालेभाजीवर खोबरे पेरलेले त्याला आवडत नाही. पालकाची डाळ, मेथीचे थेपले त्याला फार आवडतात..संध्याकाळी आल्यावर आंघोळीनंतर त्याचे जिमचे कपडे टेबलवर समोर काढून ठेवावे लागतात.... इत्यादी.
त्याच्या सर्व बारीक सारीक सवयी तिने टिपल्या होत्या आणि त्याने मागण्याआधी सर्व गोष्टी आधीच हजर असायच्या. त्याची एक गोष्ट मात्र अशी होती ती तिला अजिबात आवडायची नाही
... ती म्हणजे त्याचे सिगारेट ओढणे. मुख्य म्हणजे तिला सिगारेटची ॲलर्जी होती.... पहिल्यावेळेस त्याने त्याच्या बेडरुममधल्या बाल्कनीत जेव्हा सिगारेट ओढली तेव्हा खोकून खोकून ती बेहाल झाली होती. इतके की काही वेळ तो ही खूप घाबरून गेला होता. तेंव्हापासून त्याने त्या बेडरूममध्ये तिच्यासमोर सिगारेट कधीच ओढली नाही.
... ती म्हणजे त्याचे सिगारेट ओढणे. मुख्य म्हणजे तिला सिगारेटची ॲलर्जी होती.... पहिल्यावेळेस त्याने त्याच्या बेडरुममधल्या बाल्कनीत जेव्हा सिगारेट ओढली तेव्हा खोकून खोकून ती बेहाल झाली होती. इतके की काही वेळ तो ही खूप घाबरून गेला होता. तेंव्हापासून त्याने त्या बेडरूममध्ये तिच्यासमोर सिगारेट कधीच ओढली नाही.
तिच्याशी दिलखुलास हसणे बोलणे मात्र त्याला जमले नाही तो एकदा जरी तिच्यावर हसला की तिला गगन ठेंगणे व्हायचे पण का कोणास ठाऊक तिला त्याचवेळी जाणवायचे की आपला या घरातील निवास काही काळच आहे , अगदी क्षणभर भंगुर... कदाचित या जाणीवेमुळे शेखरच्या चेहऱ्यावर प्रसंन्नता तर नाही ना !
कधी कधी प्रियाला शेखरच्या प्रेयसीला बघण्याची, तिच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याची फार उत्कंठा असायची. पण प्रत्यक्ष तिच्याबद्दल शेखरला विचारण्याची तिला हिम्मत झाली नाही.
' खरच कोण असेल ती जिच्या सौंदर्याने शेखरला इतके वेड लावले!' तिचा मन म्हणत असायचं.
ती देवाजवळ म्हणायची त्याला आवडण्याइतपत सौंदर्य मला दिले असते तर ते मला पुरेसे होते. तिला बिचारीला काय माहिती शेखरच्यालेखी सौंदर्य म्हणजे काय होते ते .... तो मिहिकाच्या वरवरच्या सौंदर्याला भुलला होता.
कधी कधी बाजूच्या देशपांडे काकूंसारखे काही येणारी जाणारी लोकं प्रियाला पाहून म्हणायचे ,
'परांजपे बाई तुम्हाला सून अगदी सुंदर भेटलेय'
'परांजपे बाई तुम्हाला सून अगदी सुंदर भेटलेय'
प्रिया मनातल्या मनात स्वतःवरच हसायची, म्हणायची, असलं वेगळ सौंदर्य या लोकांनाच आवडणार. माझ्या शेखरला जे आवडत नाही त्याला सौंदर्य कसं म्हणून मी? शेखरला मनातही माझा बोलताना तिला जाणवायचे, मी ज्याला माझा माझा म्हणून मिरवते तो शेखर माझा नाही. मनात असा विचार केल्यावर तिला हमखास रडायला यायचे.
आज तिने शेखरची खोली साफसफाई करायला घेतली होती. त्याची रोजची वापरायची वस्तू आली की मग ती अलगदपणे स्वच्छ करून ठेवायची. त्याच्या प्रत्येक वस्तूत ती त्याला पाहत होती. ती साफसफाईत गुंतलेली असताना तिला शेखरच्या एका कोटाच्या खिशात ठेवलेली लहानशी डायरी भेटली. तो कोट तो फारसा वापरत नसायचा.
तिने डायरी उघडली. पहिल्या पानावर त्याने सुवाच्य अक्षरात इंग्रजीमध्ये स्वतःचे नाव लिहिले होते. प्रियाने हळुवारपणे त्या अक्षरावरून आपली बोटे फिरवली.
तिने पान पलटले....व्हेन आय सॉ हर (मी पहिल्यांदाच जेव्हा तिला पाहिले) शीर्षक वाचताच तिला पुढे वाचायची उत्सुकता झाली. साहजिकच आहे ....जिच्यासाठी लिहिण्यासाठी त्याने डायरीचा वापर केला होता....ती नक्की कशी आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता तिला वाटणारच ना ...कारण सध्याच्या काळात डायरी लिहिणारे तसे थोडकेच असतात.
हातातली सर्व कामे बाजूला सारून डायरी घेऊन ती बेडवर बसली. शेखरने तिच्याबद्दल लिहिले होते पण कुठेही नावाचा उल्लेख मात्र नव्हता. यामागे कोणाच्या हातात डायरी लागली तर तिचे नाव जाहीर होऊ नये हा उद्देश असावा. जी व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडची इतकी काळजी करतो...तो आपल्या बायकोची किती करेल...म्हणजे खऱ्याखुऱ्या बायकोची... मी तर फक्त नावाला बायको आहे. ती स्वतःवरच उपहासात्मक हसली आणि ती पुढे वाचू लागली.
शेखरची आणि तिची भेट झाली तेव्हा त्याचे तिच्याबरोबरचे बोलणे झाले नव्हते त्यांने तिला फक्त पाहिले होते. अहमदाबाद मध्ये एमबीए करत असताना तिथल्या इन्स्टिट्यूटची ती अलिखित ब्युटी क्वीन होती. शेखर हुशार असल्यामुळे तोही त्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होताच. प्रथम तो तिचे नाव ऐकून होता पण त्याने तिला कधी पाहिले नव्हते. तिथल्या लायब्ररीत त्याने तिला सर्वप्रथम पाहिले. कसले तरी सिने मॅक्झिम चाळण्यात ती गुंग होती.
तिचे सौंदर्य पाहून शेखर स्तब्ध झाला. सुंदर गोरा पण गोल चेहरा, डोळ्यावर सारखे सुळसुळणारे तिचे सरळ पिंगट छोटे केस. चेहऱ्यावर फारसा मेकअप नाही. लांबसडक पापण्या, निळे गहिरे डोळे, लालभडक रंगवलेले डाळिंबा सारखे ओठ.... सगळं अगदी बघत राहण्यासारखे ...शेखर अगदी पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. फर्स्ट साईट लव. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये दिसली तेव्हा त्याला मित्रांकडून कळले की हीच आपल्या कॉलेजची ब्युटी क्वीन आहे.
दोघेही एमबीएच्या पहिल्या वर्षातच होते. पण दोघांचाही वर्ग वेगळा होता. जाता येता दोघांची नजरानजर व्हायची. पण शेखरने मनातले कधी बाहेर येऊ दिले नाही. एकदा तिच स्वतःहून त्याच्याकडे आली , म्हणाली, मिस्टर शेखर...मला पेपर टू मध्ये तुझी मदत हवी आहे...काही कॉन्सेप्ट समजत नाहीत...तू मदत करशील का?
ती स्वतःहून आली या गोष्टीचा त्याला इतका आनंद झाला की त्याच्या तोंडातून हो म्हणण्या पलीकडे काही आले नाही. इतकी सुंदर तरुणी आपल्याशी स्वतःहून बोलायला येते ही गोष्टच त्याला सुखावणारी होती.
झाले... त्याचे मित्रही त्याला तिच्यावरून चिडवायला लागले. तिच्याबद्दलचं त्याचे आकर्षण वाढतच गेले. ती काही काही प्रश्न घेऊन त्याच्याजवळ यायची पण ते प्रश्न इतके सामान्य असायचे की शेखरला कधी कधी आश्चर्य वाटायचे. इतके सामान्य प्रश्न या सुंदर तरुणीला येऊ नयेत? तिला उत्तर समजवताना शेखरचा पूर्ण दिवस जायचा. पण ते उत्तर तिच्या मठ्ठ मेंदूत पोहोचायचं नाही. पण शेखर अगदी आवडीने तिला नव्याने शिकवायला तयार असायचा. पण त्याचे तिच्यावर प्रेम आहे हे सांगायची त्याला कधी हिंमत झाली नाही. तिला हे आवडणार नाही ह्या जाणवेने तो गप्प बसला.
पण आग दोन्ही बाजूंनी सारखीच लागली होती. मिहिका बोल्ड अँड ब्युटीफूल होती. तिनेच पुढाकार घेऊन त्याला प्रपोज केले. त्याने नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तेंव्हा ती दोघं एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होते.
पुढे डायरीत त्याने प्रियाबद्दल लिहिले आहे.
'आईसारखी सारखी प्रिया प्रिया करीत असते. तिच्या या प्रिया नामजपामुळे मला पण वाटले. बघूया तरी प्रिया कोण आहे. आईबरोबर तिच्या घरी गेलो तर ती नव्हती . पण ती कशी का असेना मी तिच्याशी लग्न तर अजिबात करणार नाही असा मी निर्णय घेतलाय. प्रेम एकदाच होते. तिच्याशी लग्न करून मी तिला सुख देऊ शकणार नाही '
यापुढे डायरीतली सर्व पाने कोरी होती. तिच्या मनात फक्त शेखाचे उद्गार घोळत होते. प्रेम एकदाच होते.
' मग काय शेखरच्या हृदयात मला कणभर एवढी देखील जागा नाही?'
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
