( मागच्या भागात आपण बघितले - रीचा नेहाला बोलते तू माझ्याकडे राहायला आलीस तरी चालेल - आता पुढे )
नेहा ऑफिसमधून घरी जाते, घरी अजूनही सकाळसारखंचं वातावरण असतं, ती फ्रेश होते आणि बेडरूममध्ये जाऊन पुस्तकं वाचत बसते, थोड्या वेळाने रागात बाबा येऊन विचारतात, काय निर्णय घेतला आहेस तू, अबोरशन करणार आहेस ना, नेहा बोलते नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मी उद्याच सकाळी इथून कायमची निघून जातं आहे. बाबा तणतणत बाहेर निघून जातात.
रात्री जेवताना कोणीच कोणाशीच बोलत नाही, नेहा जेवून रूममध्ये येते, आणि स्वतःची बॅग भरायला घेते, बाबा नाईट वॉकला गेलेले असतात, तेवढ्यात तिची आई गपचूप रूममध्ये येते आणि तिच्या हातात एक छोटी पर्स देते आणि बोलते हे काही दागिने आहेत ते पहिले तुझ्या बॅगेत टाक, ठेव पटकन बाबा यायला झालेत, नेहा पण आढेवेढे न घेता पटकन ते बॅगेत ठेवते.
आई बोलते ह्यात तुझ्या दोन चैनी, माझ्या दोन अंगठ्या आणि एक जोड कानातले आहेत. आणि पाच हजार रुपये आहेत जास्त पैसे मला बाबांपासून लपवून देता आले नाहीत, हे माझे घरखर्चातले - उरलेले पैसे आहेत, नाही म्हणू नकोस, मला तुझी खूप काळजी वाटते आहे, मी तुला अधून - मधून फोन करत राहीन, सोन्याचे दागिने तुला अडी-अडचणीला उपयोगी होतील, म्हणून दिलेत,कधी पैश्याची गरज लागली तर हे दागिने मोडून वेळ भागवं... आईच्या डोळ्यात अश्रू होते, नेहाला खूप वाईट वाटतं होतं.
तेवढ्यात बाबा आल्याचा आवाज येतो, आई पटकन रूममधून बाहेर गेली. नेहा बॅगमध्ये तिचं सगळं सामान भरते आणि बेडवर पडते, तिला हे घर सोडून जाताना खूप दुःख होतं असतं, पण वेळच अशी आली होती कि तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता.
सुखी आणि कायम हसत - खेळत आनंदी राहणार चौकोनी कुटुंब आज माझ्या एका चुकीमुळे विखूरलं जातंय ह्याची सल नेहाला खूप टोचत होती.भाऊ तर या सगळ्यात अगदीच गप्प होता, तिच्याशी एकही शब्द बोलला नाही, ती रात्र तीने रडून घालवली. आणि सकाळी उठून आवरून ती घर सोडून जायला निघाली.
ती निघताना आई खूप रडली, अखेरपर्यंत तिला समजावत राहिली, बाबा गप्पच होते तिला निघताना बघून दुसरीकडे तोंड करून बसले. नेहा देवाच्या पाया पडली आणि बॅग घेऊन निघाली. नेहा प्रवासात रडतं होती, तिला त्या घरात गेलेलं तिचं बालपण आठवत होतं आणि आज तेच घर सोडायची वेळ तिच्यावर आली. ती पूर्ण प्रवासात उपाशीच होती, तिला आज खूप अस्वस्थपणा जाणवत होता, कदाचित गरोदरपणात असं होतं असेलही असं वाटून ती ट्रेनच्या खिडकीतुन बाहेर बघत डोळ्यातली आसवं पुसतं राहिली.
नेहा निघून गेल्यावर मात्र बाबांच्या अश्रुंचा बांध फुटला, ते आईला बोलू लागले, मला आपल्याला पहिली मुलगी झाल्यावर किती आनंद झालेला आठवतोय तुला,मी पूर्ण बिल्डिंगमध्ये पेढे वाटले होते, लक्ष्मी घरी आली म्हणून, नेहाला पाहिजे ते सगळं दिलं, खूप लाड केले कधीच कसलीही कमी जाणवू दिली नाही, तिच्या शाळेच्या सगळ्या प्रोग्रामला मी आनंदाने जातं असे, तिचे सगळे ऐकले, तिला कधीच मुलगी म्हणून बंधन घातली नाहीत, आणि तीने आज आपण तिच्यावर केलेल्या प्रेमाचे हे असे पांग फेडले.
आई - बाबा दोघेही खूप रडतात, आई बाबांना समजावते, तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होईल, तुम्ही शांत व्हा बघू, आता तिच्या हट्टापुढे आपण काय बोलणार, ह्यापुढे तिचं नशीब आणि ती, आपण आपल्या परीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला ना, पण नेहा शेवटपर्यंत ऐकलीच नाही, त्याला आता आपण काय करणार.
एकट्या बाईने मुलाला वाढवणं एवढं सोप्प नाही आहे हे तिला कळतंचं नव्हतं. आणि आपल्याला तिला इथे ठेवणं शक्यचं नव्हतं, सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी तिला नाव ठेवली असती, तिचं इथे जगणं मुश्किल झालं असतं, त्यापेक्षा ती दूर राहून काहीतरी पर्याय नक्कीच काढेल ह्यातून... आता तिचं नशीब आणि ती असं बोलून बाबा डोळे पुसतं बेडरूममध्ये निघून जातात.
इकडे नेहा बंगलोर स्टेशनवर उतरते तिला न्यायला रीचा आलेली असते, मग दोघी घरी जातात. रीचाचं घर चांगल मोठं असतं, दोन बेडरूम असतात, रीचा नेहाला सांगते, मी एक बेडरूम तुझ्यासाठी तयार करून ठेवली आहे त्यात तुझी बॅग ठेवून मग फ्रेश होऊन घे. मी आमच्या मावशींना तुझ्यासाठी जेवण बनवायला सांगितलं होतं, जेवण तयार असेल तू आधी जेवून घे, मग आपण निवांत बोलू. आणि तू फार थकलेली दिसते आहेस जेवून आराम कर.
नेहा रीचाच्या चांगल्या वागण्याने रिलॅक्स होते, नेहाला वाटतं होतं रीचा कशी वागतेय काय माहिती... पण रीचा चांगली वागत होती, कामवाल्या मावशींना सांगून तिला काही हवं नको कां ते पाहत होती, तीने ही माझ्या मिस्टरांच्या मित्राची बायको आहे ती गरोदरपणात मदत म्हणून इथे राहायला आली आहे, असं मावशींना आधीच सांगून ठेवलं होतं.
मावशी पण तीला नेहा ताई, असं तिला हाक मारत होत्या, एकूण वातावरण नेहाला आवडलं. नेहा ती सुखरूप पोचल्याचा आईला मेसेज करते. आणि फ्रेश होऊन जेवून घेऊन मग ती आणि रीचा बोलत बसतात.
रीचा सांगते ह्या मावशी माझ्याकडे सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ पर्यंत कामाला असतात, दोन्ही वेळच जेवण त्याचं करतात, त्यामुळे तुला काहीच करावं लागणार नाही, तुला काही खावंसं वाटलं तर त्यांना हक्काने सांग.
नेहा शांत शांत असते. रीचा विचारते काय गं निघताना घरी काय स्थिती, नेहा रडतं बोलते - आईला खूप टेन्शन आलं आहे अगं, आणि बाबा निघताना बोललेच नाहीत.
रीचा सांगते - उद्या सकाळी आपण तुझ्या नोकरीच बघण्यासाठी माझ्या मैत्रिणीच्या हॉस्पिटलला जाऊ आणि मग तू तिच्याशी बोलून पण घे, मी सगळं सांगितलं आहेच.
ठरल्याप्रमाणे दोघी सकाळी हॉस्पिटलला जातात, हॉस्पिटल मोठं असतं, नेहाला कॉम्पुटरवर बिल फिडींग, पेशंटचे रिपोर्ट बनवणे असं क्लेरिकलं कामं दिल जातं.
ठरल्याप्रमाणे दोघी सकाळी हॉस्पिटलला जातात, हॉस्पिटल मोठं असतं, नेहाला कॉम्पुटरवर बिल फिडींग, पेशंटचे रिपोर्ट बनवणे असं क्लेरिकलं कामं दिल जातं.
नेहा कॉम्पुटरच्या कामात हुशार असते त्यामुळे तीला ते कामं आवडतं. नेहा आता रोज हॉस्पिटलला जाऊ लागली, तिची आई तीला अधून - मधून कॉल करत
असे. रीचा तिची चांगली काळजी घेत असे. नेहाला गरोदरपणात काहीच त्रास होतं नव्हता, ती एकदम फ्रेश असे.
बघता बघता सहा महिने पटकन निघून जातात. आणि एके दिवशी नेहाच्या पोटात दुखू लागत. नेहाला ऍडमिट केलं जातं, ती एका गोंडस मुलीला जन्म देते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहा बाळाला सांभाळून नोकरीं कशी करते आणि तीला त्यात काय काय अडचणी येतात ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा