डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग तेवीस
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग तेवीस
मागील भागात आपण पाहिलं कि, अवनीला वाटत वीर येणार नाही, पण त्याला आलेले बघून तिला आश्चर्य वाटत..आता पाहूया पुढे,
काहीतरी विचार करून ती त्याच्या टेबल जवळ जाते, पण तो कामात दंग होता कि ती आलेली त्याला समजत नाही तस पुढे होऊन तिचं म्हणाली....,
"आज लवकर आलास.”
“येस मॅम, काम आहे.”
इतकंच म्हणाला तो आणि तिच्याकडे पाहिलं देखील नाही आणि ह्याचा पण तिला राग आला...अवनी क्षणभर त्याच्याकडे पाहते.
"मानलं पाहिजे, हिम्मत तर आहे या मुलात,..."
ती मनातच म्हणते जे तिला मान्य करावंच लागतं.पण ते मान्य करणं तिच्या अहंकाराला जड जातं. म्हणून ती अजूनच कठोरपणे त्याला म्हणते..
“चांगलं.... आहे तुला काम करायला आवडत मग आज double काम कर.”
ते ऐकून वीर एकदम कालच ऐकून दचकतो... त्याच्या डोळ्यासमोर दिवसा ढवळ्या तारे चमकायला लागले होते... घाबरून त्याने विचारलं...
“डबल? म्हणजे काय करायचं आहे...”
“येस....कालचा बॅकलॉग पण तूच क्लिअर करणार आहेस....”
ती मुद्दाम आदेश देण्याच्या स्वरात बोलते.
“आणि आज सुद्धा एकही excuse चालणार नाही.”
एवढं म्हणून ती वळते.
“Show me how long you can last.”
आणि सॅन्डलचा आवाज करत ती तिथून निघून जाते.
इकडे हताशपणे वीर तिच्याकडे पाहत राहतो.
इकडे हताशपणे वीर तिच्याकडे पाहत राहतो.
"म्हणजे ह्या महामायेने कालचा त्रास मला कमी पडला आहे अस हिला वाटल कि काय...…यार ही पोरगी मला नीट जगून देणार नाही....ड्याड कुठे फसवलं तुम्ही मला.. जेव्हा माझी खरी ओळख हिला समजेल तेव्हा दाखवतोच मी....."
तो मनात पुटपुटला आणि पुन्हा उगाचच त्याचा ऍप्रॉन काढून तो नीट बांधतो व पुन्हा स्वतःला कामात झोकून देतो...
इकडे अवनी दूर उभी राहून त्याच्यावर नजर ठेवून असते.
तिच्या मनाने एक वेगळाच हट्ट निर्माण केला होता..
तिच्या मनाने एक वेगळाच हट्ट निर्माण केला होता..
"तू आज टिकतोस का नाही..तेच पाहते मी..."
आणि म्हणूनच ती त्याला अजूनच जाणीवपूर्वक त्रास द्यायला लागते.
आज सगळ्यांच्या कामाचा वेग जास्त होता. हॉलिडे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि म्हणूनच ऑर्डर्स एकामागोमाग येत होत्या.किचनमध्ये गोंधळ, आवाज, धावपळ चालू होती...
अवनी मुद्दाम त्याच्यावर कामाचा ताण वाढवत होती.
“वीर! तुझे ते veggies अजून झाले नाहीत?” आणि टाइम पण बघ जरा.. Speed वाढव! नाहीतर कस्टमर भुकेचे राहतील... "
वीर घाईघाईत काम करत होता... इकडे तिची बडबड चालू होती, मुद्दाम ती त्याला डिवचत होती जेणेकरून तो चूक करेल आणि तिला त्याला ओरडता येईल... तिने त्याला पंधरा दिवस प्रॅक्टिस सुद्धा करून न देता कामाला लावल होत..काहीही येत नसताना तो बिचारा प्रयत्न करत होता...त्याला समजत नव्हतं...
लवकरही करायचं आणि नीटही करायच....असा ताण होता त्याच्यावर...न त्याच गडबडीत तो भराभर चाकू चालवत असताना भाजीचा एक मोठा तुकडा चुकीच्या आकारात कापला जातो... त्या एका तुकड्यामुळे पूर्ण भाजी इनकन्सिस्टेन्ट होते, ते त्याला लगेच समजत आणि तो क्षणभर थांबतो.
शिट…हे काय झालं...
तो पुटपुटतो...
तो लगेच सुधारायचा प्रयत्न करतो,पण तोपर्यंत उशीर झालेला होता....
त्याच बोलणे ऐकून अवनीची नजर तिथे जाते.
संधीच्या शोधत असलेली ती लगेच त्याच्याजवळ जाते....आणि चॉपिंग बोर्डकडे पाहते...
आणि लगेच बडबड करायला सुरुवात करते....
“अरे...., हे काय केलंस?”
अवनी काय करेल आता???
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा