Login

फक्त तू... ओढ तुझी भाग एकोणीस

विराजस आणि जयची मस्ती


डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग एकोणीस

मागील भागात आपण पाहिलं कि, मीरा व वीरवर रागावते..... आता पाहूया पुढे,


विराजस जयला दुसरं काहीतरी काम बघायला सांगतो, पण एवढ्यात ते शक्य नव्हतं. शिवाय संचित तिथेच काम करत असल्यामुळे विराजसला तिथेच काम करणे भाग होत.. जय विचारात पडला, पण विराजसच्या बोलण्याने तो भानावर आला...


“जय, ऐकतोस ना बघशील ना दुसरं कुठेतरी.
हे हॉटेल माझ्यासाठी योग्य नाहीये.... ती हिटलर नको वाटते मला... "

तस जय त्याला डीवचून,


"ओ माय गॉड!”
तो नाटकीपणे ओरडतो.

“हे काय ऐकतोय मी!
The Great विराजस…
एका मुलीला घाबरला?”


एवढं बोलून तो जोराजोरात हसायला लागला, इकडे जयचं हसणं ऐकून तर वीर अजूनच चिडला...

“जय,मुर्खा उगाच अर्थ काढू नकोस.”

“मग काय अर्थ काढू? सांग तूच आजवर तू पोलिसांना, काय स्वतःच्या बापालाही घाबरला नाहीस.
आणि आता म्हणतोयस ‘दुसरं कुठेतरी बघ’?

तो मुद्दाम थांबतो,... आणि डोकं खाजवत पुढे म्हणाला,

कारण काय.... ती मुलगी.... उम्म्म.... काय तिचं नाव.... हा अवनी..... भारी personality दिसते..Strong… कडक…... भेटावं लागेल हिला...दिसायला पण छानच आहे ती..... "

जय त्याला अजूनच चिडवत होता....


"मी तिला घाबरत नाही... प्लीज misunderstand kru नकोस.. "

आता विराजस अजूनच वैताकला होता...जय काही आपली मदत करणार नाही ह्याची त्याला जाणीव झाली होती...

"ठीक आहे, ठीक आहे…घाबरत नाहीस.
फक्त पळून जायचा विचार करतोयस..... विराजस तू पळपुटा बनतो आहेस तेही एका मुलीमुळे.”


जय आपले हसू थांबवत म्हणाला... तस विराजस एकदम थांबतो.

“नाही! मी काही पळून नाही जात"


तो जोरात ओरडतो......

" होका.... मग जा आणि भीड तिला...... "


जय म्हणाला तस डोकं हलवून,

“मी उद्या जाईन आणि टिकून राहीन... मग ती कितीही त्रास देऊ दे, मी मागे हटणार नाही... तस ही मला कुठे आयुष्य काढायचं आहे... काही दिवस फक्त..... "

विराजस विचार करून बोलला तस जय समाधानाने हसला....

“thats, like माय गुड बॉय.....हेच ऐकायचं होतं.”

एवढं बोलून तो थोडा थोडा थांबतो आणि मिश्किलपणे बोलतो,

“आणि हो…एक गोष्ट सांगू का ?”


“बोल... आता काय बाकी राहील तुझं..... बोलून टाक...बाबा एकदाच..."

विराजस म्हणाला,

"मला काय वाटतं माहीत आहे?ती मीरा बहुतेक तिला तू आवडला आहेस...ती जशी तुला शिकवत होती ना…
जरा जास्तच लक्ष देऊन.तेव्हाच लक्षात आलं मला.”


विराजस एकदम दचकतो आणि एकदम कूलपणे बोलतो....,

“मग त्यात काय.... ह्यात वेगळं काही आहे का नाही ना??? मला सवय आहे ह्या सगळ्यांची.. "


"हो... पण तरी सुद्धा सावध.... चल गुड night... भेटू उद्या... तुझा टिफिन येईल थोड्याच वेळात..."


"टिफिन कसला टिफिन.... चायनीज मागव.....

ओह हॅलो तू काय तो श्रीमंत विराजस नाही आहेस आता... तुझा पगार नाही झालेला म्हणून मी देतो. आहे.... नंतर तुझं तू बघायच.... "


एवढं बोलून तो कॉल कट करतोय तर विराजस डोक्यालाच हात लावतो....आणि स्वतःशीच पुटपुटतो—

“देवा, काय दिवस आलेत माझ्यावर.....”

पण त्याच्या ओठांवर नकळत एक हलकंसं हसू येतं.

श्रीमंती गेली असेल,पण दोस्ती अजून आहे,हा विचार त्याला दिलासा देतो.



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"