डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग दहा
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग दहा
मागील भागात आपण पाहिलं कि वीरला जय समजावून हॉटेलकडे घेऊन जातो....आता पाहूया पुढे...,
हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर अवनीने आपला मोर्चा थेट हॉटेलकडे वळवला पण तिच्या डोळ्यासमोर येणारा संचितचा चेहरा आणि त्याच दुखणं काही केल्या जात नव्हतं. तिला त्याची सवय झाली होती, असा एकही दिवस गेला नव्हता कि संचित सोबत तिने किचन शेअर केल नव्हतं... मस्ती मजाक करत त्यांचा ग्रुप काम करत असे... पण जास्त वेळ संचितसोबत असल्याने त्याची कमी नक्कीच तिला जाणवणार होती. तो लवकरात लवकर बरा व्हावा अशीच प्रार्थना ती देवाला करत होती.
त्याच टेन्शन मध्ये स्वादिष्टम हॉटेलमध्ये पाऊल टाकल. तिथली सकाळची गडबड तिला जाणवते.
किचनमध्ये गडबड चालू होती, सकाळीच नाश्त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या... जेवनाचा तो वास एकदम प्रसन्न करून सोडत होता,त्याच बरोबर भांड्यासोबत माणसांचा आवाज येत होता. थोडाफार कानोसा घेऊन अवनी कपडे चेंज करायला आतमध्ये निघून गेली. थोडताच वेळात अवनी बाहेर आली पण ही अवनी देशमुख एकदम वेगळी दिसत होती. अगदी प्रोफेशनल, चेहऱ्यावर असलेला कॉन्फिडन्स ह्याने ती अजूनच सुंदर दिसत होती. ती ह्या हॉटेलमध्ये फक्त शेफ नसून मेन शेफ होती, त्यामुळे तिचा aura काही वेगळाच होता... तिने समोर उभ्या असलेल्या विभाला ऑर्डर सोडली,
“विभा टेबलं no. 7 ready आहे का? Sauce ओव्हरकूक नको हा....आणि महत्वाचं म्हणजे टाईमिंग चुकायला नको.... लक्षात ठेव..... "
" येस मॅम, ऑल done.... "
विभा हसून उत्तरली...
ती फिरतच होती कि तेवढ्यात तिचा मॅनेजर, निशांत तिच्या जवळ आला,
“मिस अवनी, गुडमॉर्निंग... तुम्हाला काही सांगायचं होत...”
ते ऐकून अवनी हातातली प्लेट खाली ठेवून त्यांच्याजवळ जाते..
" गुडमॉर्निंग सर, बोला ना.. काय झालं?? "
"ते संचित ठीक होईपर्यंत…त्याच्या जागेवर आजपासून एक मुलगा घेतलाय.”
हे बोलताना निशांत थोडा अडखळतो, तो तिथला मॅनेजर जरी असला तरीसुद्धा अवनी तिथली मेन शेफ होती आणि ती तिची टीम होती, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तिला विचारात घेणे गरजेचे होते...
ते ऐकून अवनी क्षणभर थक्क होते, आणि तिला वाईट देखील वाटत...
“नवीन मुलगा????"
“हो.....म्हणजे फक्त ट्रेनिंगवर पिरियड वर असेल आजपासून. बाकी त्याला नंतर ठेवायचं कि नाही तूच ठरव..."
अवनी दीर्घ श्वास घेते. तिच्या चेहऱ्यावर असलेली नाराजी मॅनेजर सरांना देखील दिसत होती....त्याच फ्लो मध्ये ती बोलून गेली,
“पण सर, काही दिवसांचा तर प्रश्न होता.... नंतर संचित जॉईन होणारच आहे ना... मग तरीही...."
" मला समजतंय अवनी... पण वरून ऑर्डर आहे, ज्याच्या against मला जाता येत नाही आहे... Try to understand... प्लीज... त्या मुलाला तुझ्या हाताखाली ट्रेन कर....कामावर परिणाम होता कामा नये.... प्लीज....”
निशांत एका दमात बोलून गेला...
"Ok सर... बघते मी....."
अवनी म्हणाली तस निशांत थँक्स बोलून तिथून निघून जातो.
ईकडे अवनी किचनकडे पाहते..... आपला एप्रन नीट करते,आणि डोक्यातील सगळे विचार बाजूला करते....
“अवनी काम आधी. फोकस.....बाकी बघ नंतर....... "
असा निर्णय ती मनात पक्का करते......आणि किचनमध्ये परत एकदा तिचा आवाज पूर्ण किचनमध्ये घुमतो,
“Focus guys
**********************************
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा