Login

फक्त तू..ओढ तुझी. भाग अठरा

वीर हॉटेलवर जयला नकार देतो

डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग अठरा

मागील भागात आपण पाहिलं कि, मीरा व वीरवर रागावते..... आता पाहूया पुढे,


तिला पाहिल्यापासूनच वीरला तिथे थांबायची इच्छा होत नव्हती. तिचा त्याला जाणवणारा कडकपणा, तिची ती रागीट नजर, आणि प्रत्येक वेळी आपल्याकडे पाहताना असलेली नापसंती हे सगळं त्याला अस्वस्थ करत होतं.
पण मधेच निघून जाणंही शक्य नव्हतं.ना मनाने…
ना परिस्थितीने. म्हणून त्याने तेवढा वेळ कसा तरी काढला आणि संध्याकाळी काम संपताच
तो कोणालाही काही न सांगता, अगदी मीरालाही काहीही न बोलता थेट निघून गेला.


इकडे अवनी…तिला वीर दिसला की उगाचच राग यायचा.
कारण तिला वाटायचं...संचित काही दिवसांत परत येणारच आहे…मग ह्याला कशाला घेतलं? त्याचं तिथे असणं तिला अनावश्यक वाटत होतं.पण त्याहून जास्त खटकत होती त्याची आणि मीराची वाढत चाललेली जवळीक....ती जवळीक तिला आवडत नव्हती अजिबातच...

कारण मीरा, संचित आणि अवनी ते तिघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकमेकांवरचा विश्वास,कामातली साथ,आणि वर्षानुवर्षांची ओळख.... त्यात तिला अजून कोण नको होता...आणि अचानक मीराचं या नवीन मुलाशी इतकं सहज, इतकं मोकळं वागणं हे अवनीला पटलं नव्हतं. तो फक्त एक trainee आहे, असं स्वतःला समजावूनही तिच्या मनातली अस्वस्थता कमी होत नव्हती.... तेवढ्या वेळात ती स्वतःलाच विचारत होती,
मला खरंच याचा राग का येतोय…आणि मीराच्या बदललेल्या वागण्याचा एवढा त्रास का होतोय???
ह्याच उत्तर मात्र तिलाही कळत नव्हतं.
पण एक गोष्ट नक्की होती, वीरचा तिथे असणं
आता केवळ कामापुरतं राहिलेलं नव्हतं... त्याच अस्तित्वच तिला नको होत....


इकडे वीर घरी पोहोचतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते, नुस्ता वैताग आला होता त्याला...तो बॅग एका कोपऱ्यात फेकतो आणि थेट जयला फोन लावतो.

विराजस एकदम चिडून जयला ओरडतो,

“जय…आज मी त्या भांडखोर महामायेला हॉटेलमध्ये पाहिलं!”

जयला काही समजतच नव्हतं तो कोणाबद्दल बोलतोय...

“कोण महामाया आता?”

“अरे तीच!हॉस्पिटलमध्ये जी मला शिव्या देत होती ना…तिचं मूर्ख मुलगी, अवनी!”

ते ऐकून जयला अजिबात आपलं हसू आवरत नाही.

“तू जिच्यामुळे इतका भडकला होतास आधीही आणि आताही तीच तुझी बॉस निघाली? सॉलिड हा... "

त्यावर वीर वैतागून म्हणाला,

“बॉस?माय फूट.. तिच्यासारख्या मुलीला मी जवळ पण उभ करणार नाही.. ती महामाया... हिटलरगिरी करत राहील माझ्यावर... मला आता तिथे जायचंच नाही, जय.
खरंच सांगतोय…त्या हॉटेलमध्ये मला नाही जायचं.. तू दुसरं काहीतरी बघ....”


"अरे अस काय करतोस?? आता दुसरं काय बघू?"

जय डोक्याला हात लावत म्हणाला....


" मला माहित नाही पण ती हिटलर नको माझ्यासमोर मला... "


तो बेडवर अंग टाकत म्हणाला...


जय काय करेल आता?
विराजस जाईल का पुन्हा?


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"