डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग सतरा
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग सतरा
मागील भागात आपण पाहिलं कि, मीरा वीरला शिकवून निघून जाते इकडे निशांत येऊन त्याच थोडं कौतुक करतो.... आता पाहूया पुढे,
निशांतने केलेल्या कौतुकाने त्याला आनंद होतो आणि त्याच आनंदाच्या भरात तो कांदा उचलतो.
पहिला काप देतो दुसरा…देतो....आणि अचानक त्याच्या डोळ्यातून धारा लागतात.
“अरे देवा…हे काय मला काही कस दिसत नाही... हे काय झोम्बल... "
तो डोळे चोळतो, त्याच नाक लाल होतं, आणि डोळे पाणावतात... बिचाऱ्याला कांद्यामुळे रडू येईल हेच लक्षत नाही आलं.... तो वैताकला होता कि तेवढ्यात मीरा परत येते. ती त्याला त्या अवस्थेत पाहते त्याला तस पाहून तिला हसू आवरत नाही.
“अरे बाबा कांदा आहे तो... रडवणारच....”
अस म्हणून ती पटकन त्याला एक ओला कपडा देते.
“हे घे.....डोळ्यांवर ठेव.”
वीर कपडा घेतो.
“हे शेफ लोक रोज हे सहन करतात का ?”
डोळे पुसत तो म्हणाला....
“हो.आणि तरीही हसत काम करतात.”
नंतर ती त्याच्याजवळ थांबते,कांदा कापण्याची छोटी ट्रिक दाखवते.
“हळू कर...... आणि ही कांद्याची साले डोक्यावर ठेव म्हणजे रडू येत नाही अस माझी आई म्हणते... "
"ओह... Its really वर्क.... Then मी असच करतो.. "
अस म्हणून तो डोक्यावर कांद्याची साले ठेवतो.... ते पाहून मीरा अजूनच हसायला लागते...
" काय झालं?? "
तो न समजून तिच्याकडे बघतो...
ते पाहून ती आपलं हसू आवरते आणि त्याच्या डोक्यावरची साले काढत म्हणते...,
" माहित नाही अस होत कि नाही पण तू खूप भोळा आहेस... "
आणि त्याच्या डोक्यातून हात फिरवते,पण तेवढ्यात
“हे काय चाललंय?... पार्क आहे का हे.... कि टाइमपास करायला इथे आला आहात...”
एक कडक, आणि ठाम आवाज त्यांना ऐकू येतो तस
दोघेही दचकून मागे वळतात.किचनच्या दारात अवनी उभी असते.तिच्या चेहऱ्यावर गंभीरपणा, आणि डोळ्यांत राग होता....
दोघेही दचकून मागे वळतात.किचनच्या दारात अवनी उभी असते.तिच्या चेहऱ्यावर गंभीरपणा, आणि डोळ्यांत राग होता....
“मीरा तू त्याला शिकवत आहेस कि रोमान्स करत आहेस... काय फालतुगिरी आहे ही...? "
ते मीरा लगेच सरळ उभी राहते.
“Sorry Avni ma’am…मी फक्त त्याला ”
मीरा बोलतच होती कि तिला पुढे न बोलू देता ती हाताने थांबवून म्हणते,
“एक्सप्लेनेशन नको.... जा कामे कर....”
ती वीरकडे पाहते...तिची पहिलीच नजर
आणि नापसंती स्पष्ट तिच्या डोळ्यात दिसत होती..
“आणि तुम्ही ट्रेनि आहात ना??? मग शिकायच सोडून हे काय मधेच???किचन म्हणजे काय कॉलेज आहे का?? जिथे पोरींना पटवता येत...जर काम जमत नसेल,
तर निघायचं इथून....पाहिली चुकी म्हणून काही करत नाही next टाइम अस नाही चालणार.... Got it... "
ते ऐकून तो गप्पपणे मान डोळवतो....ती निघून जायला निघते आणि अचानक त्याची नजर तिच्याकडे जाते...आणि त्याला आठवतं.
हीच ती मुलगी आहे…हॉस्पिटलमध्ये जिचे शब्द त्याच्या कानात घुमत होते.दारू पिऊन गाडी चालवणारा…
श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा…दुसऱ्याचा जीव घेणारा...
श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा…दुसऱ्याचा जीव घेणारा...
ते आठवून नकळत तो स्वतःच्या हातांच्या मुठी आवळतो.
अवनी वळते... त्याच्याकडे पाहुन एक रागीट लुक देऊन
ती निघून जाते.किचनमध्ये पुन्हा शांतता पसरते.....
ती निघून जाते.किचनमध्ये पुन्हा शांतता पसरते.....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा