फर्स्ट फ्लोअर
तिसरा भाग
@ ज्योती सिनफळ
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी इ. कुलकर्णी मनोहर सोसायटीत गेले. फर्स्ट फ्लोअरवर जाता जाता आपल्या कॉन्स्टेबलला त्यांनी ऑफिसमधून सीसीटीव्ही फुटेज पेनड्राईव्हवर कलेक्ट करण्यास सांगितले आणि ते काणेंच्या घरी चौकशीसाठी पोहोचले.
बेल वाजवली तेव्हा एका तरुण मुलाने दार उघडले. इ. कुलकर्णींनी त्याला विचारले,
“मिस्टर काणे घरी आहेत का? त्यांना सांगा इ. कुलकर्णी आले आहेत.”
तेवढ्यात आतुन मिस्टर आणि मिसेस काणे हॉलमध्ये आले आणि त्यांनी हसतमुखाने इ. कुलकर्णींचे स्वागत केले व आपल्या मुलाकडे बघून ते म्हणाले,
“अमित, तू आत जाऊन अभ्यास करत बैस.”
ते ऐकताच इ. मध्येच बोलले,
“अहो त्यालाही इथेच थांबू द्या. मला त्याचीही चौकशी करायची आहे. तुमचा लेक वाटत?”
त्यावर काणे,
“हो सर, माझा मुलगा अमित. त्याची उद्या इंजिनियरची परिक्षा आहे म्हणून मी त्याला अभ्यास कर असे म्हणालो.”
“ते ठीक आहे, पंरतु गुन्हा जिथे घडतो तिथल्या सगळ्या लोकांची चौकशी करणे हा आमच्या तपासाचाच एक भाग आहे.”
आता आपली नजर अमितवर रोखून इन्स्पेक्टर कुलकर्णींनी त्याला विचारले,
“तुझी परिक्षा कधी संपणार आहे?”
त्यावर अमित,
“चार दिवसांनी संपेल सर.”
“ओके, मग चार दिवसांनी पोलिस स्टेशनमध्ये ये मला भेटायला.”
त्यावेळी अमित थोडा अस्वस्थ झाला आणि होकारार्थी मान हलवत तो लगेच आपल्या खोलीत गेला.
त्यानंतर काणेंनी इ. कुलकर्णींना आपल्या पत्नीची ओळख करुन दिली.
मग इ. कुलकर्णींनी मिस्टर काणेंच्या पत्नीला विचारले,
“तुमचे भावे कुटुंबाशी खूप चांगले संबंध आहेत असे मला कळले, मग ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात?”
त्यावर मिसेस काणे,
“साहेब त्या दिवशी विशाखाशी माझी भेटच झाली नाही. कारण काल सकाळीच मी माझ्या आईला बरं वाटत नाही म्हणून माझ्या माहेरी गेले होते. रात्री दहा वाजता परत आले तेव्हा मला ही घटना समजली आणि खुप धक्का बसला हो ऐकून. विशाखा अत्यंत गुणी व हुशार मुलगी आहे.”
आता कुलकर्णींनी काणेंना विचारले,
“काल संध्याकाळी तुम्ही कुठे होता?”
त्यावर काणे,
“सर मी पेशाने सीए. आहे. माझ्या ऑफिसमधून घरी यायच्या वेळा निश्चित नसतात. कधी मी लवकर येतो तर कधी उशीरही होतो.”
“मग तुम्हाला ह्या घटनेविषयी कधी आणि कसे कळले?”
“आरती वहिनी घाबरलेल्या अवस्थेत आमच्या घरी आल्या तेव्हा आम्हाला ही घटना कळली.”
“थॅंक्यू मिस्टर काणे. येतो मी.”
कॉन्स्टेबल सखारामला सगळ्यांचे मोबाईल नंबर नोट करुन ’फ्लॅट क्रमांक १०३ ला या’ असे सांगत कुलकर्णी तिथून बाहेर पडले आणि १०३ मधील दाते आज्जींच्या घराची बेल वाजवली. दहा,पंधरा मिनिटे झाली तरी कोणीही दार उघडले नाही म्हणून इन्सपेक्टर कुलकर्णीं फ्लॅट नंबर १०४ मधील पटवर्धनांच्या घरी गेले.
एका तरुणाने हसत स्वागत करुन त्यांना सांगितले,
“सिक्युरिटी गार्डने आम्हाला तुमचा निरोप दिला होता म्हणून आज आम्ही घरी आहोत.”
त्यावर इ. कुलकर्णींनी विचारले,
“मिस्टर पटवर्धन, तुमचे पुर्ण नाव आणि तुम्ही काय व्यवसाय करता हे सांगा?”
“सर मी रोहन पटवर्धन आणि ही माझी पत्नी रीमा पटवर्धन. आम्ही दोघेही आय.टी. कंपनीत कामाला आहोत.”
“ह्या सोसायटीत येऊन तुम्हाला किती वर्ष झाली आणि ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात?”
“ह्या सोसायटीत येऊन आम्हाला चार महिने झाले सर. पण आम्ही सकाळी नऊ वाजताच ऑफिसला निघतो ते थेट अकरा वाजता घरी येतो त्यामुळे ह्या घटनेविषयी आम्हाला काहीच माहिती नाही आणि सोसायटीतही आमच्या अजून फारश्या ओळखी नाहीत.”
तेवढ्यात शेजारच्या आज्जी रीमाच्या घराच्या उघड्या दरवाजातून आत शिरत तिला विचारल्या,
“अगं, तू बेल वाजवलीस का आमच्या घराची?”
रीमा काही उत्तर देणार इतक्यात इ. कुलकर्णी म्हणाले,
“अहो आज्जी, मीच आलो होतो तुमच्या घरी. पंरतु तुम्ही दार उघडले नाही म्हणून मी पटवर्धनांकडे चौकशीसाठी आलो.”
“अच्छा असं झालं का! अहोऽ, मी वॉशरुमला गेले होते म्हणून उशीर झाला. मग येताए का आमच्या फ्लॅटला?
आजींनी हसुन विचारले.
त्यावर कुलकर्णी म्हणाले,
“आता आलाच आहात तर इथेच थांबा. मी तुम्हां सगळ्यांना एकत्रच प्रश्न विचारतो.”
आज्जी बाजुच्या खुर्चीत बसल्यावर कुलकर्णींनी त्यांना लगेच विचारले,
“आता मला असं सांगा आज्जी, तुमच पुर्ण नाव, वय, तुम्ही इथे किती वर्षापासुन राहता?
तुमच्या घरात एकुण किती माणसं राहतात? आणि भावे कुटुंबाशी तुमचे संबध कसे आहेत?”
त्यावर दाते आज्जींनी आपल्या स्वभावानुसार अघळपघळ बोलायला सुरुवात केली,
“अहो साहेब काय सांगू तुम्हाला, भावे कुटुंब म्हणजे नाऽऽ.”
त्यांना अर्ध्यावरच तोडत कुलकर्णी म्हणाले,
“आज्जी, आज्जीऽ, मला फक्त मी विचारलेल्या प्रश्नांचीच सविस्तर उत्तरे द्या.”
दाते आज्जी वरमल्या आणि म्हणाल्या,
“सॉरी साहेब चुकलं माझं. माझे नाव शुभांगी दाते. माझे वय पंच्याहत्तर वर्ष. मी ह्या फ्लॅटमध्ये एकटीच राहते. मला एक मुलगी आहे जवळच चार कॉलनी सोडून राहते. ती माझ्याकडे अधून मधून येत असते.”
हे ऐकताच कुलकर्णींनी मध्येच प्रश्न विचारला,
“ती कुठे राहते?”
“हे काय समोरच्या गुलमोहर सोसायटीत चौथ्या मजल्यावर राहते.”
“बरं मग पुढे?”
“मी ह्या सोसायटीत जवळपास वीस वर्षापासून राहते. त्यामुळे भावे कुटुंबाला मी बरेच वर्षांपासून ओळखते.
त्यांची विशाखा तर माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे.तिच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. हे फारच वाईट झालं!”
आज्जींनी नकळत ओलावलेले डोळे आपल्या पदराने टीपले.
एक मिनिटभर तिथले वातावरण भावुक झालं.
मग कुलकर्णीनी आज्जींना पुन्हा विचारले,
“काणे आणि भावे कुटुंबाचे परस्पर संबंध कसे आहेत आज्जी?”
“अगदी घरोब्याचे संबंध आहेत. खरंतरं आमच्या तिन्ही घरांचे एकमेकांशी खूप छान संबंध आहेत.”
त्यावर कुलकर्णींनी विचारले,
“अमित आणि विशाखाबद्दल तुम्ही काय सांगाल?”
आज्जीं काहीतरी आठवलं तशा अचानक उठत कुलकर्णींना म्हणाल्या,
“मी गॅसवर काहीतरी ठेवून इकडे आलेय, तुम्हीच तिकडे येता का साहेब?”
कुलकर्णीही त्यांच्या मागोमाग गेले. आपल्या घराच्या दारात उभे रहात अगदी कुजबुजल्या आवाजात आज्जींनी इन्स्पेक्टर साहेबांना अमितबाबत एक किस्सा ऐकवला. हे ऐकून इन्स्पेक्टर पण गंभीर झाले.
कळलेला विषय म्हणलं तर फार विशेष नाही आणि म्हणलं तर खूपच धक्कादायक होता. ह्या घटनेमुळे इ्. कुलकर्णीच्या डोक्यात नवीन विचारचक्रं सुरू झाले. पण चेहऱ्यावर तसे न दर्शवता ते आज्जींना म्हणाले,
“धन्यवाद आज्जी. खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही. गरज भासलीच तर मी पुन्हा येईन चौकशीला.”
आज हाती लागलेल्या सगळ्या महत्वपूर्ण माहितीचा खजिना मेंदूत साठवत कुलकर्णी पोलीस स्टेशनला पोहोचले.
कॉन्स्टेबल सखारामने आणलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे पेनड्राईव्ह आपल्या लॅपटॉपला जोडून त्यांनी त्या दिवशीच्या सर्व घडामोडी तपासल्या. लोकांची जा-ये दिसत होती. एक, एक विडों स्क्रोल डाऊन करता करता अचानक त्यांची नजर एका विंडोवर स्थिरावली. अत्यंत बारकाईने त्यांनी त्या फुटेजचे निरीक्षण केले आणि त्यांचे डोळे विस्फारले. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित पसरले.
---------------------------------------------------------------(क्रमशः)
फर्स्ट फ्लोअर
तिसरा भाग
@ ज्योती सिनफळ
आज्जींनी कुलकर्णींना अशी कोणती धक्कादायक बातमी दिली? ह्या घटनेशी त्याचा काय संबंध असेल?
अमितचा ह्या घटनेशी काही संबंध तर नाही?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुलकर्णींना काय दिसले?
कोण असेल खरा गुन्हेगार?
हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा