चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
शीर्षक: बंडू मेला...
लघुकथा फेरी
शीर्षक: बंडू मेला...
वर्तमानपत्र वाचता वाचता बंडूचा चेहरा वेडावाकडा झाला. सकाळच्या थंडगार वातावरणातही त्याला दरदरून घाम फुटला. डोक्यातून झरा फुटल्यासारख्या घसघसा घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याने काहीतरी प्रयोग करण्याच्या प्रयत्नात बाजूला असलेल्या वस्तू एक-एक करून उचलून पाहिल्या.
"अगं, इकडे ये. लवकर इकडे ये." बंडूने मोठमोठ्याने आपल्या बायकोला हाका मारत म्हटले.
"अहो, काय झाले आहे? सकाळी-सकाळी असा घसा बाहेर काढून का बोंबलत आहात?" सीमाने, म्हणजेच बंडूच्या बायकोने किचनमधूनच बंडूपेक्षा मोठ्या आवाजात ओरडत विचारले.
"अगं बाहेर ये. जरा हे वर्तमानपत्र वाच. यात काय लिहिले आहे ते बघ." बंड्याने आपला चेहरा पुसत म्हटले.
"आता यावेळी मी वर्तमानपत्र वाचायला बसले तर घरातली सगळी कामं काय तुमची आई येऊन करणार इथे?" सीमाने आपल्या नेहमीच्या दराऱ्यात म्हटले.
"चालेल. पाहिजे तर स्वर्गातून आईला बोलावतो, पण तू लवकर इथे ये."
हे ऐकताच आपल्या हातातली भांडी मोठ्याने किचनमध्ये आपटत सीमा रागानेच बाहेर आली.
"सांगा, काय झाले? कुठे आग लागली आहे ते सांगा."
"अगं, मला सांग. मी मेलो आहे का?"
"आता मी तुमच्या डोक्यात पातेले नाही घातले तर माझे नावच सीमा सांगणार नाही."
" अगं जरा माझे ऐकून तरी घे, ही बातमी वाच. वडगाव येथील बंडू पाटील यांचे आकस्मिक निधन. वडगावात आणखी कोण बंडू पाटील आहे?" बंडूने वर्तमानपत्रातील एक बातमी दाखवत विचारले.
"वडगावात आणखी कोणीही बंडू पाटील नाही. तुम्ही एकटेच बंडू पाटील आहात, पण तुम्ही कधी मेलात? आणि मला कसे कळले नाही."
"गप बस. मी कुठे मेलो? तुझ्यासमोर जिवंत तर आहे."
"मग ही अशी बातमी कुणी छापली? ज्याने ही बातमी छापली, त्याला आज मी उकळत्या पाण्यात घालून उकडले नाही तर माझं नावच सांगणार नाही. तुम्ही आत्ताच्या आता वर्तमानपत्राला फोन लावा."
आपल्या बायकोचा भीष्मासारखी गर्जना ऐकून बंडूने थरथरत फोन लावला.
"हॅलो! टिंगल्या टाईम्स." पलीकडून अतिशय किरका आवाज आला.
"नमस्कार, मी बंडू पाटील. साहेब, आज ना तुमच्या वर्तमानपत्रात एक छोटीशी चुक..." बंडूने अतिशय सौजन्याने सांगायला सुरुवात केली.
ते ऐकून सीमाने एका कुस्तीपटूप्रमाणे त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला.
"तुम्ही काय त्याला कीर्तन सांगत आहात?"
"तुम्ही काय त्याला कीर्तन सांगत आहात?"
"अगं पण..."
"एss कोण रे तू? त्या भिकार टिंगल्या टाईम्सचा संपादकच ना? तुम्ही काय दारू पिऊन बातम्या छापता का रे माकडा? आज तुम्ही माझा नवरा मेला आहे, अशी बातमी छापलीच कशी? गाढवा, तुमच्या वर्तमानपत्राचे पान तीन वाच. त्यावर सहवेदनामध्ये माझा नवरा मेला अशी बातमी छापलेली आहे. कावळ्या, तुम्हाला कोणी सांगितले की माझा नवरा मेला आहे म्हणून."
"सॉरी सॉरी ताई, खरं म्हणजे ते मडगाव लिहायचं होतं, ते चुकून वडगाव झालं आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमचे पती मेलेले नाहीत. ते जिवंत आहेत."
"अरे अस्वला, तू मला सांगतो माझा पती जिवंत आहे म्हणून? आत्ताच्या आत्ता बातमी बदल. नाहीतर तुझ्या वर्तमानपत्रातील सगळी शाई संपवून टाकली नाही तर माझे नाव सीमा सांगणार नाही."
"ताई, आता काहीच करता येणार नाही. उद्याच्या अंकात दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही काहीच काळजी करू नका."
"तशी बातमी दिली नाही तर परवाच्या अंकात तुझ्या मरणाची बातमी आलीच म्हणून समज."
"हो हो ताई, नक्की करेन." सीमाचा चढलेला आवाज ऐकून तो बिचारा घाबरला.
सीमाने फोन ठेवला.
"आता माझ्याकडे काय बघत बसला आहात? ऑफिसला नाही जायचं का? की खरेच मेले आहात?"
"नाही, नाही जातो."
नेहमीप्रमाणे बंडू आपल्या ऑफिसमध्ये ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये गेटवर पोहोचला. तिथे त्याला सेक्युरिटी गार्ड भेटला.
"साहब, आप पाचवे मंजिलवाले ऑफिस में काम करते हो ना?" त्याने बंडूला विचारले.
"हो, काय झाले?"
"पाचवे मंजिलपर काम करने वाले बंडू सर मर गये है. आपको पता नही?" सेक्युरिटी गार्डने एका न्यूज चॅनल सारखी बातमी दिली.
"कोण बंडू?"
"बंडू पाटील साहब. आप बंडू पाटील को नही जानते?"
त्याचे ते बोलणे ऐकून बंडूला तो एखादा मंत्री असल्यासारखा भास झाला.
"हो, काय झाले?"
"पाचवे मंजिलपर काम करने वाले बंडू सर मर गये है. आपको पता नही?" सेक्युरिटी गार्डने एका न्यूज चॅनल सारखी बातमी दिली.
"कोण बंडू?"
"बंडू पाटील साहब. आप बंडू पाटील को नही जानते?"
त्याचे ते बोलणे ऐकून बंडूला तो एखादा मंत्री असल्यासारखा भास झाला.
"काय बंडू पाटील?"
"हा साहब, आपको भी सदमा लगा ना. मुझे भी लगा. बहुत भले आदमी थे. अभी भी उनका हसता-मुस्कुराता चेहरा मेरे आंखों के सामने आ रहा है."
"असं काय? धन्य आहेस तू. तुझे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे." त्या माणसाला काय म्हणावे हेच बंडूला समजत नव्हते.
"आप नही गये सर?"
"नाही." असे म्हणत बंडूने तिथून आपला पाय काढला.
बंडू पाचव्या मजल्यावरच्या आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे त्याला सगळा शुकशुकाट वाटत होता. नेहमी विनाकारण उणीदुणी काढण्यात गजबजणारे ऑफिस आज शांत वाटत होते.
ऑफिसमध्ये कोणीच दिसले नाही म्हणून बंडूने ऑफिस बॉयला हाक मारली.
माझा आवाज ऐकून आत निवांत झोपलेला 'ऑफिस बॉय' झोपमोड झाली म्हणून चिडत बाहेर आला आणि एखादे भूत पाहिल्यासारखा बंडूला पाहून अचानक थरथरू लागला.
"भ... भ... भूत! बंडू सर... बंडू सर... असं करू नका. मी आतापर्यंत तुमच्याकडे वाईट वागलो, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मान्य आहे, मी तुमची कामं कधी कधी ऐकली नाहीत. पण त्याची एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका. मोठ्या मनाने माफ करून सोडा मला." तो डोळे मिटून वेड्यासारखा बडबडत होता.
"अरे, असे काय करतोस? मी बंडू आहे."
हे ऐकताच तो आणखी थरथरला आणि मोठमोठ्याने किंचाळू लागला.
"हो, माहित आहे. तुम्ही बंडू आहात, पण तुमचा आत्मा इथे का भटकतो?"
"अरे, मी खराखुरा बंडू आहे."
"तेच म्हणतो मी सर. तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही तुमच्या घरी जा ना. तिथे तुमचा अंत्यविधी सुरू आहे. तिथे कोण तुमच्यासाठी रडतंय, कोण तुमच्याबद्दल बोलतंय ते बघा ना. इथे तुम्हाला काय मिळणार?"
"आता तुझ्या एका कानाखाली लावतो बघ. कोणी सांगितले तुला की मी मेलो म्हणून?" बंडू ओरडला.
"म्हणजे तुम्ही मेला नाहीत?" त्याने आपला एक डोळा हळूच उघडत म्हटले
"तुझ्यासमोर उभा आहे, तो दिसत नाही का तुला?"
"मग वर्तमानपत्रात ती बातमी आली होती, ती काय? अहो सर, सगळे तुमच्या घरी गेले आहेत."
"काय?"
बंडूच्या अंत्यविधीला गेलेले सगळेजण जे बाहेर गेले होते, ते पुन्हा ऑफिसमध्ये आलेच नाहीत.
त्यादिवशी दिवसभर बंडूचा फोन वाजतच राहिला. प्रत्येकाला सांगून-सांगून तो थकला की तो जिवंत आहे.
शेवटी कंटाळून त्याने फोनच बंद करून टाकला.
शेवटी कंटाळून त्याने फोनच बंद करून टाकला.
ऑफिस सुटल्यावर घरी येताना पूर्ण रस्त्यावर त्याला जो-तो आश्चर्यकारक नजरेने बघत होता. जणू काही तो स्वर्गातूनच पृथ्वीवर उतरला आहे.
शेवटी तो घरी पोहोचला. सीमा कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होती.
"अगं, तू कुठे जात आहेस?" बंडूने सीमाला विचारले.
"कुठे जात आहे? तुमच्या त्या टिंगल्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जात आहे. मी पुन्हा पुन्हा फोन करते, म्हणून फोन बंद करून ठेवला आहे त्या डुक्कराने. सकाळपासून लोकांनी इथे माझा जीव हैराण करून सोडला आहे. दिवसभर किती लोक आले म्हणून सांगू? कोणी अगरबत्ती घेऊन येत होते, कोणी फुले घेऊन येत होते. ती दुसऱ्या वाड्यावरची सटवी सुनिता, तुमच्यासाठी जाईची फुले घेऊन आली होती. म्हणते कशी, 'माझ्या बंडूला जाईची फुले फार आवडायची म्हणून खूप शोधून आणली आहेत.' तीच फुले माळून पाठवली तिला. आणि तो तुमचा मित्र पांडू तर तिरडीचं सामान घेऊन आला होता. त्याच बांबूने त्याला असं बडवलं म्हणून सांगू, पाठीचा कणा मोडला नसेल तर शप्पथ." सीमा चंडिकेचा अवतार धारण करून सांगत होती.
"अगं पण ते मदतीलाच आले होते ना आपल्या."
"पण असल्या अभद्र गोष्टी? तुम्ही निवांत फोन बंद करून होता, आणि इथे सगळं मला निस्तरावं लागत होतं. तुम्हाला काय? त्या वर्तमानपत्रवाल्याला मी सोडणार नाही. ओळखत नाही तो मला."
"अगं, असू दे गं. मी जिवंत आहे हेच देवाचे उपकार नाहीत का? उद्या सकाळी सगळं ठीक होईल."
"तुम्ही सांगता म्हणून सोडत आहे, नाहीतर सोलून काढलं असतं त्याला." असं म्हणत सीमा आत गेली.
****************
दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्याच पानावर बातमी आली:
'कालच्या अंकात तिसऱ्या पानावर तांत्रिक कारणामुळे चुकून मडगाव ऐवजी वडगाव असा उल्लेख झाला आहे.
त्यामुळे वडगावचे बंडू पाटील व कुटुंबीयांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
– संपादक
टिंगल्या टाईम्स
त्यामुळे वडगावचे बंडू पाटील व कुटुंबीयांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
– संपादक
टिंगल्या टाईम्स