अर्धांगिनी - भाग- 5
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मी अगदी प्रत्येक क्षणाला विचारात असायचे, समोरचा टीव्ही पाहायचे, जेवायचे,झोपायचे आणि सतत विचार करायचा काय होणार आणि काय चाललंय हे माझ्याबरोबर, मी वयाच्या स्ववीसव्या वर्षी अशी इथे अडकून पडले होते, आणि पुढे काय याचा विचारही मला करवत नव्हता.
रोज आसिफ भेटायला यायचा, मी टीव्ही पाहात असायचे. रोज ती आयशा यायची जेवण द्यायला, मी पडून असायचे..
एकदा तीने मला पंजाबी ड्रेस आणला, मला तो घालायला लावला आणि ती स्वतःच म्हणाली, खूप सुंदर दिसते आहेस, स्वतः ला आरशात पाहून मात्र पुन्हा एकदा माझा बांध फुटला.
मी पुन्हा एकदा ओक्साबोक्शी रडू लागले आणि तिला विचारू लागले, कां आणि कशासाठी मला इथे आणलं आहे, तो आसिफ तुझा कोण आहे.....
ती म्हणाली आसिफ तिचा नवरा आहे, मी काय असं ओरडून बोलले, ती म्हणाली हो...हे खरं आहे...
आयशा माझं रडणं पाहून माझ्या अजून जवळ आली, आणि तिने मला जवळ घेतलं.
मी मनातल्या मनात म्हंटल ही माझ्याशी इतकी चांगली का वागतेय? तिला वाईट वाटलं नाही कां तिच्या नवर्याने मला असं पळवून आणल्याबद्दल? अशी कोणती मजबुरी होती त्याची, कि आसिफने मला वीस लाखात विकत घेतलं.
थोड्या वेळाने आसिफ आत आला. .मी त्याला म्हंटल मला कां इथे आणलं आहे, सांगेल कां कोणी आणि नसाल सांगणार तर मला थोडं विष तरी द्या आणून म्हणजे मी सुटेन ह्या सगळ्यातून.. प्लीज मला सोडा..
आसिफ अगदी शांतपणे म्हणाला..."मला मान्य आहे तूला इथे आवडतं नाही आहे, तुला खूप बंधन आहेत, पण माझं ऐकलंस तर तुला मी राणीसारखी ठेवेन...
मी ओरडून म्हणाले- काय काम आहे तुझं माझ्याकडे...अरे असं माझ्या मनाविरूद्ध मला डांबून ठेवताना तुला काहीच कसं वाटत नाही.?
आसिफ हसून म्हणाला..." "हे बघ मला काय हवय हे जास्त महत्वाचं. तु मला आवडतेस माझी प्रियसी होशील ना.. आणि तुझ्याबद्दल म्हणत असलीस तर तुला माझ्या आयुष्यातून जाता येणार नाही.
तू वेडा आहेस का, मी रडून म्हणाले..
आसिफ हसून बोलू लागला... मी वेडा नाहीय, मला तू आवडतेस, म्हणून मी एवढे दिवस गप्प आहे, नाहीतर मी केव्हाच तुझ्यावर जबरदस्ती केली असती.
आसिफ निघून गेला. मी विचार करत तशीच बसून राहिले.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- आसिफ कां असा वागत होता, त्याचे काय कारण होते)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
