अर्धांगिनी - भाग- 7
दीर्घकथा लेखन स्पर्धा
आसिफ एका संध्याकाळी माझ्यासाठी गाण्याच्या सीडी घेऊन आला, मला म्हणाला गाणी ऐक. मी आसिफला थँक्स म्हंटल.
अरे त्यात थँक्स काय? तू माझ्यावर प्रेम करायला हव आहेस आणि त्याकरता मला तुला इम्प्रेस करायचं आहे. शिवाय तुला इथे राहाणं आवडतं नाही आहे आणि ते कधी आवडेल हे मला माहित नाही पण तोपर्यन्त मी प्रयत्न करत राहणार आहे.
'हा असा काय... असा माझ्या मनात पुन्हा विचार आला.
पण मग मी स्वतःलाच समजावलं, 'चला शर्वरी सुटका तर नाहीच आणि नशिबात हेच असेल तर हेच..तेंवढाच विरंगुळा..
एके दिवशी मनात विचार आला. दिवाळी जवळ आली असेल कां.इतके दिवस भानच नव्हत, दिवस रात्रीचं. समोर येईल ते खायचं आणि टी.व्ही बघत राहायचं.
मला इथे येऊन कोणी सोडवून नेत नाही किंवा माझी सुटका होत नाही तोवर जगायचं तर आहेच, कारण मरणाचीही खात्री नाही. मग जोवर जगायचं आहे तोवर कसं जगायचं कि गाणं ऐकत?
मी अचंबित झाले. किती करतोय हा माणूस मला इम्प्रेस करायला. आणि स्पष्टपणे सांगतोसुद्धा आहे तसं. कळस आहे नीचपणाचा कां आणि कशासाठी करतो आहे हा असा, का माझ्याबरोबरचं हे सगळं.
आसिफ एके सकाळी म्हणाला, तू योगा, मेडिटेशन कां करत नाहीस त्याने तुला शांत वाटेल बघ..
अजूनही मला कायम इथेच राहयचं आहे हा विचार मला पचलाच नव्हता. त्यामुळे पुढे काय ह्याचा विचार माझं मन सतत करत असे, माझी सुटका कशी आणि कधी होणार हा आणि हा एकच विचार माझ्या मनात असे.
जर असं असेल तर मग मी आसिफच्या आयुष्यात राहयचा कधी विचार केला होता की मी इथे अडकले, मी स्वतःलाच विचारलं.
आणि सहा महिन्यांनी मी ठरवलं ह्याच्याशी चांगल वागून मग गोड बोलून भविष्यात इथून सुटका करून घ्यायची, पणं ते वाटतं होतं तेवढं नक्कीच सोप्प नव्हतं.
मी एके सकाळी आसिफला म्हणाले- मी इथेच राहेन कायमची. तुझी बनून, तुझ्यावर प्रेम करत. पण मी तुझ्यावर प्रेम करावं ह्याकरता तुला तितकं चांगलं वागावं लागेल."
"म्हणजे काय करायचं मी?"
"मी का तुझ्यावर विश्वास ठेवू?" असं आसिफ म्हणाला..
आसिफ विश्वास ठेवण्यावाचून काही पर्याय आहे का? तू मला इथे मारून जरी टाकलंस तर कोणाला कळणार आहे?
आसिफ माझी ही वाक्य ऐकून खूप खुश झाला आणि म्हणाला.. चला शेवटी तू हार मानलीसचं...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरी आसिफच्या मनासारखं वागून तिला अजून काय अडचणी येतात)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
देवरुख.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
