अर्धांगिनी - भाग - 10
आसिफ चिडून बोलू लागला, मला काहीच ऐकायचं नाही आहे, माझी बायको तुला गरम- गरम जेवण आणून देते, तुझे कपडे सुद्धा वॉशिंग मशीनला धुवायला घेवून जाते, तुला हवं नको ते पाहते, तुझ्यापेक्षा मोठया घरातली आहे ती, तरी ती माझं सगळं ऐकतेय..
तुला मला खूष ठेवावं लागेल नाहीतर ...तुझी काही खैर नाही.
मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे, मी चिडून बोलले ..
दोन दिवसात ऐकली नाहीस तर दिवसा पण त्रास द्यायला कमी करणार नाही मी, आता राहतेस तसं राहायचं असेल तर माझं ऐक..
वीस लाख मोजलेत तुझ्यावर, त्यामुळे अजून मी थांबू शकत नाही, सहा महिने दिले तुला, मी माझी वसुली झाल्याशिवाय तुला सहजासहजी सोडणार नाही, तुला अजून दुसऱ्या कोणाला तरी विकायला पण मी मागे - पुढे बघणार नाही, बऱ्याबोलाने ऐक...
एवढं बोलून आसिफ निघून गेला..
मी मनात म्हंटल, मी विचार करतेय तसंच असावं बहुतेक ह्याला माझ्याकडून मुलं हवं आहे म्हणून हा सगळा आटापिटा त्याने चालवला आहे, आणि त्याला त्याचं मुलं प्रेमाने झालेलं हवं आहे, जोरजबरदस्तीने नाही, गुण्या- गोविंदाने मुलं जन्माला घातलेलं हवं असं असावं, आणि ती बिचारी आयशा स्वतः आई होऊ शकतं नसल्याने हे सगळं नाईलाज म्हणून सहन करत असेल..ती पण कांय विचार करत असेल ना माझ्याबद्दल...आणि मग मुलं झाल्यावर हा माणूस माझं कांय करणार आहे कांय माहित..
तो म्हणाला, मी त्याला प्रतिसाद दिला नाही तर तो माझे शारिरीक हाल करेल? अरे मी कांय खेळण आहे कां, ह्यांच्या सुखासाठी मी मुलं जन्माला घालावं कां..
दुसर्या दिवशी मी मनाशी काहीतरी ठरवले. मनाला सांगितले हे स्वीकारायचं, विचित्र वाटतं होतं...पण मी तयार झाले...
तिसऱ्या दिवशी माझं उत्तर ऐकण्यासाठी आसिफ आत आला आणि त्याने दार बंद केलं आणि मला मिठी मारली आणि त्याक्षणी मला रडायला आलं, मी मनात म्हंटल ह्याने दोन दिवस दिले होते ते संपले...
असिफ बोलू लागला, मी थांबणार नाही आता...तुला मी सहा महिने कां दिले कांय माहीत...आणि एवढं बोलून तो मला अजून जवळ घेऊ लागला...
माझ्या मनात गलबललं, मी मनात म्हंटल, कांय आहे हा माणूस...काहीतरी कमतरता आहे ह्याच्या आयुष्यात ... त्याशिवाय एवढी गुणी बायको असताना हा असा कां वागतोय...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरी तयार तर झाली पण ह्याचे परिणाम कांय होतील)..
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा