Login

अर्धांगिनी - भाग -15

Bayko

अर्धांगिनी - भाग - 15


दीर्घकथा लेखन स्पर्धा


आसिफ निघून गेल्यावर माझ्या नजरेसमोरून इथे आल्यापासूनचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर दिसत होते, आणि मला जोरात दाटून रडायला यायला लागलं..

तेवढ्यात आयशा मला बघण्यासाठी रूममध्ये आली, मला रडताना पाहून म्हणाली, कांय झालं.. मी रडतंच म्हंटल मला इथे राहायचं नाही आहे, मला ह्या वातावरणात बंदी राहायला नकोसं वाटतं आहे, प्लिज मला सोडवं नां ह्या सगळ्यातून, मला माझ्या घरच्यांची खुप आठवण येतेय, प्लिज मला जाऊ दया नां तिथे, मला सोडा नां इथून, मला बघून तिच्याही डोळ्यातून पाणी यायला लागलं..


    ती मला समजावत म्हणाली, मुलं झालं की जा तु इथून, तुला नंतर आम्ही जास्त वेळ अडकवून ठेवणार नाही इथे, तु तूझ्या घरी लवकरच जाशील, मी सांगेन आसिफला, मग ती माझ्याशी प्रेमाने खूप वेळ बोलत बसली, माझ्या घरी कोण कोण असतं, माझं शिक्षण, नोकरी ह्याबद्दल सगळं तिने विचारलं, आणि अशा वेळी म्हणजे गरोदरपणात रडतं राहायचं नाही असंही सांगितलं.. आणि मग जवळ जवळ एक तासाने ती निघून गेली, मला जरा मनातलं कोणाशी तरी शेअर केल्यामुळे थोडंसं कां होईना पण हलकं वाटलं.

      देवाने मला ह्या सगळयांतून मोकळं करावं असं मी रोज देवाला सांगत असे, अक्षरशः माझं अबोर्शन व्हावं म्हणून मी देवाला साकडं ही घालत असे, देवाला सोडवं मला ह्या सगळयांतून असं सतत मी बोलत असे.


    आसिफ हल्ली सारखा रूममध्ये येऊन मला बघून जातं असे, माझ्या खाण्याकडे जातीने लक्ष घालत असे, मला काही वेगळं खायला हवं कां असं सतत विचारत राहत असे,सतत असं कर, हा व्यायाम कर असं चाल असं सतत त्याचं ऐकून मी अगदी कंटाळून गेले होते. त्याच्या काळजीने अगदी मी त्रस्तच झाले होते, तो मला जीवापाड जपत असे.


    आयशा पण सतत दोन तासांनी रूममध्ये येऊन काही खायला आणू कां असं विचारत असे, नुसती काळजी काळजी, मी हैराण झाले होते ह्या आसिफ, आयशाच्या वागण्याने..


मी कंटाळून एकटीच विचार करत बसत असे, आताशा मला हॉलमध्ये जायची परवानगी होती, त्यामुळे मी टीव्ही बघत सोफ्यावर बसत असे, मी विचार करत बसले की आसिफ लगेचच बोलत असे, आनंदी रहा, कुठलाही विचार करू नकोसं. खुश रहा, काही खायला हवं असेल तर सांगत जा.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी ह्या आसिफ आणी आयशाच्या वागण्याने कशी हतबल होते ते )

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
0

🎭 Series Post

View all