अर्धांगिनी - भाग -17
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सोनाराकडून येताना आसिफ पुन्हा मला एका आइस्क्रीमपार्लरला घेऊन गेला, आम्ही दोघांनी आइस्क्रीम खाल्लं, आसिफ अतिशय खुश होता अजून काही खायचं कां असं मला विचारू लागला, मी नको मी दमले आहे घरी जाऊया असं म्हंटल.
गाडीत बसताना खुशीत आसिफ म्हणाला, उद्यापासून तु घरात कुठेही फिरू शकतेस, टेरेसवर जा, घरच्या बागेत पण गेलीस तरी चालेल, पण आयशाला सोबत घेऊन जातं जा. हळू चाल, स्वतःची नीट काळजी घे, चार - पाच महिने आहेत अजून सांभाळ स्वतःला.
मी गाडीत बसून मनात म्हणतं होते, एकदाचं ह्यांचं बाळं होऊदेत म्हणजे मी इथून सुटेन तरी, कायमची इंडियाला तरी जाऊ शकेन, ह्या मनात नसलेल्या बाळासाठी मी इथे अडकले आहे, देव पण नां माझी परीक्षा बघतोय असं मी स्वतःलाच म्हणत राही, कांय वाढून ठेवलं आहे नशिबात त्या देवालाचं माहीत, असा विचार करत मी गाडीत झोपी गेले.
घरं आल्यावर आसिफने मला उठवलं, आयशा दरवाजातचं सगळं ठीक आहे नां असं विचारू लागली, आसिफ म्हणाला, सगळं छान आहे, डोन्ट वरी, बेबी पण ठीक आहे, तिने चला टेन्शन गेलं असं हसत म्हंटल, मी मनात म्हंटल कांय आहेत ही माणसं माझा जीव पणाला लावून खुश होतायत, मी रूममध्ये गेले, फ्रेश झाले आणि बेडवर पडले.
जसंजसे माझे पोट वाढतं होते, तसंतसं आसिफ माझ्याबरोबर सारखा रूममध्ये राहू लागला, गप्पा मारत राहत असे, नुसतं बाळाचं असं तसं, तेंच तेंच, एकदा त्याने माझ्या पोटावर हात ठेवून म्हंटल बेबी मै तेरा पापा हू, तु ठीक है नां, मै तेरेलीये रोज दुवा करता हू. मला त्याच्या ह्या वागण्याचा राग आला होता पण मी मला त्याचं काहींचं वाटलं नाही असं दाखवलं.
सातवा महिना लागला होता, आता पुन्हा सोनोग्राफी करायची होती, ह्यावेळी मात्र आयशा मी स्कॅनला जरूर येणार मला बेबी पाहायचं आहे असं रोज म्हणत होती, ती खूप खुश होती त्यासाठी.
आयशाला माझं वाढलेलं पोट बघून आनंद होतं होता आणि मी मनातून हे मुलं नकोचं असा अजूनही विचार करत असे. ती मला आता अजून पौष्टिक खायला कसं देता येईल ह्याकडे सतत लक्ष ठेवत असे. अगदी मराठी पद्धतीचे एक - दोन पदार्थ पण तिने हॉटेलमधून मागवून मला खायला दिले.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नवव्या महिन्यात डिलिव्हरी तर होते पण बाळाला कांय त्रास असतो त्यामुळे शर्वरी अजून तिथेच अडकून पडते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा