Login

अर्धांगिनी - भाग -18

Bayko

अर्धांगिनी - भाग - 18


   सातव्या महिन्यातल्या सोनोग्राफीला मी आयशा, आसिफ असे तिघेही गेलो, सोनोग्राफी करताना आयशा आत आली होती, ते पोटातलं हलणार बाळं बघून तीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, आसिफने तीच्या खांद्यावर हात ठेवून तीला थोपटलं आणि म्हंटल अल्ला सब ठीक कर रहा है. तु निश्चिन्त रहा, मी मनात म्हंटल इथे मला अडकवून माझा वापर करून हे खुश होतायतं, आणि देवाचे आभार मानतायत.


सोनोग्राफी झाल्यावर डॉक्टर माझी कशी काळजी घ्यायची ते सगळं आयशा आणि आसिफला समजावून सांगत होत्या, कोणती औषधं द्यायची ते बोलतं होत्या, मला ते ऐकण्यात काहींचं इंटरेस्ट नव्हता, मी अजूनही सुटकेला पाच - सहा महिनेच उरलेत ह्याचाच विचार करत होते.


डॉक्टरांनी सांगितले नववा महिना लागल्यावर पोटात दुखल्यावर लगेचच हॉस्पिटलला घेऊन यायचं, हो चालेल असं बोलून आसिफ आणि आयशा मला घेवून बाहेर पडले, आजपण बाहेरचं जेवून आम्ही घरी गेलो..


घरी गेल्यावर समजलं, घरी आसिफने एक नोकराणी आयशाच्या मदतीला ठेवायचं ठरवलं होतं,  ती मदतनीस भेटायला आली होती, तिच्याशी बोलून आसिफ - आयशाने रोज जेवण करण्यासाठी यायचं असं सांगितले.


     कारण कांय तर आता दोनच महिने उरले होते त्यामुळे आयशा माझी नीट जबाबदारी ती पार पाडू शकेल ह्या उद्देशाने, माझ्याकडे नीट लक्ष देऊ शकेल म्हणून...


आयशा जेवणात अडकून राहिली तर माझ्याकडे दुर्लक्ष होईल असं आसिफ म्हणत होता, कांय कांय करत आहेत ही नवरा - बायको मुलाला पाहण्यासाठी असं माझ्या मनात आलं...


चार दिवसांनी आसिफची एक चुलत बहीण मला भेटायला आली, माझ्यासाठी मिठाई घेऊन आली, मला जवळ घेऊन तिने आशीर्वाद दिला, आसिफ आणि आयशाचं अभिनंदन करत होती, मी मनात म्हंटल मुलं माझ्यामुळे होणार आणि ह्या आसिफचे पाहुणे अभिनंदन कोणाचं करतायत. काय एकेक असतात नां लोक.


बघता बघता मला नववा महिना लागला, माझं पोट चांगलंच गरगरीत दिसत होतं, आता आयशा माझ्या रूममध्येचं माझ्याबरोबर झोपू लागली,  दिवस दिवस माझ्याजवळचं राहून ती मला जपत असे, मला हात धरून उठवत असे, दोघंही नवरा - बायको अक्षरशः एक एक दिवस मोजत होते, आसिफ तर देवाला सतत सगळं नीट होऊदेत म्हणून प्रार्थना करत राहत असे.


आणि एकेदिवशी नववा महिना लागून सहा दिवसानंतर माझ्या पोटात दुखु लागलं, आयशा आणि आसिफ मला तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेले, मला ऍडमिट करण्यात आलं. माझा बी पी सतत वाढतं होता, त्यामुळे दोघं काळजीत होते.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरीला डिलिव्हरीमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होतात)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
0

🎭 Series Post

View all