Login

अर्धांगिनी - भाग -19

Bayko

अर्धांगिनी - भाग -19


मला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं, माझा बीपी सतत वाढतंच होता आणि मग डिलिव्हरीसाठी तीन तासाने मला आत नेण्यात आलं, आयशा, आसिफ सतत देवाचा धावा करतं होते, आणि मला काही कळायच्या आतच मी बेशुद्ध झाले.


चार तासांनी शुद्धीत आल्यावर समजलं, बाळं वाचलं नाही, मी ते ऐकून अवाक झाले, आसिफ आणि आयशा कसे असतील ह्याचा मी विचार करु लागले, मी ग्लानीत पण विचार करू लागले आता कांय होणार, मी कशी सुटणार इथून, मला सुचेनासं झालं.


    मी पुन्हा ह्या सगळयांत अडकते की काय ह्याची मला चिंता वाटू लागली, मला रडायला यायला लागलं, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून नर्स म्हणाली असं होतं कधीकधी तु वाचलीस हे महत्वाचं, तुझी कंडिशन क्रिटिकलं झाली होती,तीला माझी दया येत होती आणि मी नशिबाला कोसंत होते.


आसिफ तर अतिशय चिडला असेल, आयशा रडतं असेल असं माझ्या मनात आलं तेवढ्यात आसिफ आत आला आणि चिडून बोलला तुला मी सांगितलं होतं ना, बेबीची काळजी घे, स्वतःला सांभाळ, मी मुद्दाम आसिफसमोर मला पण दुःख झालं आहे असं नाटक केलं, मलासुद्धा खूप वाईट वाटलं आहे,दु:ख झालेलं आहे हे आसिफला दाखवणं खूप गरजेचं होतं आणि मी रडायला लागले.


मी रडायला लागल्यावर आसिफने माझा हात हातात घेऊनं म्हंटल, अल्लाने ये क्या किया सब तो ठीक तरहसे चल रहा था नां,डॉक्टर बोलें थे, तेरी कंडिशन बिघड रही है, दोनोंको भी मतलब बेबी और तु - तुम दोनोंको शायद नही बचा सकते थे, लेकिन तु बचं गयी, बेबी ऑफ हो गया.


बॉय था बच्चा, अल्लाने हमारे साथ ऐसा क्यो किया क्या पता..बिचारी आयशा तर बेबी झाल्यावर कांय नाव ठेवणारं ते पण सतत सांगत होती, बेबी झाल्यावर असं करू तसं करू, ड्रेस पण आणले होते तिने बेबीसाठी, तीने तर रडून रडून स्वतःची हालत करून घेतलीय.


मी आसिफचे शब्द ऐकून मनात म्हणाले,मला हे मूल नको होतं. पण माझा ह्या पोटातल्या बाळाचा लळा लागला होता की कांय म्हणून माझ्या पण डोळ्यातून अश्रू येतायत..



मला त्रास झाल्यामुळे अजून पुढचे दोन,  तीन दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, आयशा माझ्या सोबतीला राहिली होती, मुलं गेल्यावर हे लोक आता माझं कांय करणार ह्याचा मी सतत विचार करत असे, आणि त्यावेळी असंही मनात येत होते की ह्या बिल्डिंगवरून उडी मारून स्वतःला संपवावे, किंवा पळून जावं, पण पळून कसं जाणार होते माझा पासपोर्ट आसिफकडे होता, त्यात इथे मी कोणालाच ओळखत नव्हते.


आसिफचं माझ्याप्रति वागणं अचानक बददलं होतं, तो नीट बोलतं नव्हता, कदाचित ह्या सगळ्याला माझं काळजी नं घेणं नडलं असणार असं त्याला वाटतं असणार..

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी पुन्हा ह्या सगळयांत अडकते कां ते )

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
0

🎭 Series Post

View all