अर्धांगिनी - 20
हॉस्पिटलच्या रूमबाहेर सतत आसिफ बसलेला असे, मी पळून जाईन की कांय असं त्याला वाटतं असावं बहुदा, मी कशी पळणार होते कारण इथलं हे आसिफचं घर सोडल्यासं मला बाहेरचं काहींचं माहित नव्हतं, इंडियन एम्बसी कुठे आहे, हेही मला माहित नव्हते, माझा पासपोर्ट माझ्याजवळ नसल्याने मी पळण्याचा विचारही करू शकत नव्हते.
तीन दिवसांनी हॉस्पिटलमधून सोडल्यावर आसिफ गाडीत पण खूप गप्प गप्पचं होता. आयशा पण नाराजचं होती, आणि मी मला इथून सूटता येणारं नाही म्हणून हे लोक आता माझ्याशी कसे वागणार अश्या विचारात होते.
मला आसिफचं घर आल्यावर असं वाटलं, की मी ह्या घरातून सुटण्यासाठी इथे दिड वर्ष घालवलं, आणि एक दिवस मी नक्कीच सुटणार ह्या आशेवरच अजून आहे पण आता हे मुलं मेल्यावर मी अजून अडचणीत अडकते की कांय, की हा आसिफ मला पुन्हा थोड्या दिवसांनी बाळासाठी चान्स घ्यायला लावणार आहे की काय...
पण मला जर इथून सुटका हवी असेल तर एकच आशेचा किरण होता तो म्हणजे ह्यांचं होणार बाळं, आणि त्यासाठी आता पुन्हा मला ह्या आसिफच्या स्वाधीन व्हावं लागतंय की कांय, तो सांगेल तसं मला वागावचं लागणार होतं, आणि त्यासाठी आता पुन्हा त्या सगळ्या संकटात अडकायचा विचारही मला करवत नव्हता,
मी अक्षरशः चिडून आयशाला म्हंटल माझं कांय करणार आहात आता तुम्ही...आयशा चिडली आणि जोरात ओरडून बोलली इथे आमचं बाळं गेलंय आणि तुला कायमचं स्वतःचीचं पडलेली असते.
मी तिचा तो एवढा चिडलेला रागीट आवाज कधीच पाहिला नव्हता, मी तिचा आवाज ऐकून अचानक जोरात रडायला लागले, आणि ती इंग्लिशमध्येच मला सिली, फुल असं बडबडू लागली आणि आसिफला इंग्लिशमध्ये माझं कांय करायचं की पुन्हा एकदा प्रयत्न करून चान्स घ्यायचा कां असंही बोलली.
आयशा आणि आसिफला इतकं व्यवस्थित इंग्लिश बोलताना मी कधीच ऐकलं नव्हतं, ते भरपूर चर्चा करून लवकरचं ठरवूया पुन्हा एकदा प्रयत्न करूयात अशा निर्णयावर पोचले.
मी मनात म्हंटल मी कांय खेळण आहे कां, पुन्हा एकदा प्रयत्न करायला...अरे वीस लाख दिलेत म्हणून कांय माझ्या शरीराशी खेळ करत बसालं कांय, आता ह्यावेळीच्या डिलिव्हरीवेळी पण कंप्लिकेशन्स होत्या तरी नशीब मी वाचले आणि मेले असते तरी ह्यांना कुठे फरक पडत होता म्हणा.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरीचे होणारे हाल )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा