अर्धांगिनी - भाग - 21
दीर्घकथा लेखन स्पर्धा
हे काय चाललं होतं माझ्यासोबत मी घरी आल्यावर विचार करत बसले.
ती आयशा मला सिली, फुल कांय बोलते, अरे माझ्यामुळे तुम्ही आई- बाबा होणार होतात नां, आणि आता माझ्याचं नावाने खडे फोडताय, अरे नालायक लोकांनो तुमच्या हव्यासापायी तुम्ही मला इथे अडकवलं आहे नां.
ती आयशा स्वतः बाई असून मला समजून घेत नव्हती, अरे माझा जीव जाता जाता राहिला आणि ही म्हणे अजून एकदा प्रयत्न करून पाहूया कां,म्हणजे पुन्हा तो आसिफ जवळ येणार आणि पुन्हा ते सगळं आठवूनच मला किळस वाटायला लागली...
माझ्या ह्या परिस्थितीमुळे आणि आई - बाबांची मला आठवण आल्यामुळे मला जोरात रडायला यायला लागलं होतं, मी खूप रडून घेतलं आणि मग शेवटी बाथरूममध्ये जाऊन तोंड धुवून बाहेर आले तर समोर बेडवर आसिफ बसला होता, माझ्याबरोबरं जेवण्यासाठी आसिफ आत आला होता, मी मुद्दाम म्हंटल असं कसं झालं, मी तर नीट काळजी घेतली होती, त्या डॉक्टरची तर काही चुकी नाही नां..
आसिफ ओरडून बोलला,नको ते अजून प्रश्न शोधू नकोसं तु, मी इथे आधीच त्रासलोय, असं कां झालं, कसं झालं ह्याचा विचार करून हैराण झालोय आणि तुझे प्रश्न,
मी म्हंटल, तुझी आणि आयशाची काळजी वाटली म्हणून मी विचारलं तर मलाच ओरडतोस? बिचारी आयशा खूप रडत होती, रडून रडून अगदी लाल, लाल झाली होती, तिच्याबद्दल खूप वाईट वाटलं मला, ती बाळं येणारं म्हणून खूपच खुश होती नां...
हो नां गं, बिचारी ह्या आनंदासाठी अकरा वर्ष वाट बघतेय, पण नियतीला तीला बाळाचं सुखं दयायचं नव्हतं, बिचारी माझी आयशा अगदी उदास झालीय...असं डोळ्यातं पाणी आणून आसिफ बोलला.
त्याचं ऐकून नकळत मलाही रडायला यायला लागलं, पण माझ्या रडण्याच्या आवाजाला कंटाळून की कशामुळे कांय माहित,आसिफने माझ्याजवळ येऊन माझ्या खूप जोरात कानाखाली मारली, आणि बोलला तुझ्या मनात नव्हतं नां आमचं बाळं ह्या जगात यावं असं.
मी ओरडून त्याला बोलले, मला कां मारतो आहेस, कां चिडला आहेस माझ्यावर.
तर तो माझे केस पकडून म्हणाला, तु मुद्दाम तर काही केले नाहीस नां.. मी रडतं म्हणाले, तु आणि आयशा तिथेच होतात नां मी कांय केलं असणार, माझा ब्लड प्रेशर वाढला त्यात माझी कांय चूक...
आसिफ चिडून बाहेर निघून गेला.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आता शर्वरीला आसिफ मारुही लागला होता तिची अजून दुर्दशा कांय होते ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा