अर्धांगिनी - भाग -24
आयशा त्या दिवशी खूप आत्मीयतेने मला सगळं सांगत होती, ती सांगत होती, तिचं लग्न अरेंजम्यॅरिज आहे, ती आणि आसिफ इथेच दुबईलाचं राहणारे होते.
आमच्या घरच्यांनी आमचं लग्न व्यवस्थित थाटामाटात लावून दिलं होतं, सगळं छान आहे, आसिफची इथे मोठी कंपनी आहे, सगळं सुखवस्तु आहे, कशाचीच कमी नाही आहे, पण म्हणतात नां देव कधीकधी तुम्ही परीक्षा बघत असतो.
सुरवातीला आम्हाला वाटतं होतं, होईल मुलं, पण नंतर नंतर ती आशा फोल ठरली, आम्हाला मुलं होण्यात अडचणी येऊ लागल्या, मग आम्ही वाट बघण्यात दिवस घालवले, उशिरा कां होईना पण मुलं होईल असंही आम्हाला सतत वाटतं होतं, पण नंतर जसंजसे दिवसं जाऊ लागले तसंतशी मुलं होण्याची आशा धुसर झाली.
आणि मग माझ्यातंच प्रॉब्लेम आहे असं निदान झालं, मी आसिफला म्हंटल मी तुम्हांला मुलं देऊ शकणार नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा, पण ते ऐकले नाहीत, त्यांना मला सोडून देणं पटत नव्हतं.
मग त्यांना मी मुलं दत्तक घेण्यासाठी खूप समजावलं, पण त्यांना ते पण पटेचनां, त्यांना दुस्र्याचं मुलं नको होतं, ते दुसऱ्याच्या मुलाला स्वतः चं मुलं म्हणायला तयार होईना.
मग त्यांनाचं कोणीतरी हे सरोगेसीचं सुचवलं, पण त्यात पण त्यांना अडचणी वाटू लागल्यावर ते नाही म्हणत राहिले, असं ह्या सगळयांत अकरा वर्ष गेली, त्यामुळे आता अजून थांबायचं नाही असं ठरवून त्यांनी हा तुझा पर्याय निवडला, आणि पैसे दिले की अशी कामे होतात हे त्यांना समजले.
पण मनापासून सांगते माझा ह्या सगळ्याला विरोध होता, पण नाईलाज म्हणून मी हो म्हणाले, आणि मला माफ कर असं बोलून आयशा रडू लागली...
मला काय करावे तेच समजेना, त्यामुळे मी तीचं सांत्वन तर सोडाच मी तीला रडू नकोसं असं सुद्धा बोलू शकले नाही, मला तिची दयाचं आली नाही, ती रडतं बाहेर निघून गेली.
ती गेल्यावर, मी मनात म्हंटल दत्तक मुलं नको होतं पण दुसऱ्याच्या मुलीला असं त्रास देणं बरं जमलं तुम्हा दोघांना..अरे माझ्या घरी मी गायब झाल्यावर कांय झालं असेल ह्याचा तरी विचार केलात कां तुम्ही...मी काय रस्त्यावर पडले होते काय, मला असं फसवून इथे आणून तुम्ही चुकीचे वागलात नां म्हणून तुमचं बाळं जगलं नाही, देवाने शिक्षा दिली तुम्हाला, देवपण परीक्षा बघत असतो.
मला असा त्रास देऊन माझं आयुष्य इथे उध्वस्त करून तुम्ही सुखी कसे व्हाल...
माझ्या तोंडातून खरोखर ह्या दोघांसाठी तुम्ही कधीच सुखी होणार नाही तुम्ही, माझा तळतळाट लागेल तुम्हाला असं वाक्य बाहेर पडलं..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी एकोणतीस वर्षाची होऊन पण अजून तिथेच अडकून पडलेली असते.)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा