अर्धांगिनी - भाग - 26
अरुणा माझ्या बेडजवळ आली आणि म्हणाली तू मराठी आहेस कां, कुठे राहतेस, काय करतेस असं हौशीने ती विचारू लागली, मी तीला रडतं रडतं मला इथे कसं फसवून आणलं गेलं आणि आता हे लोक माझ्या जीवाशी कसे खेळतायत ते सगळं सांगितले आणि तीला मी म्हणाले प्लिज मला मदत करशील...
माझी कहाणी मी सुरवातीपासून सांगायला सुरवात केली, मी इथे कशी पाच वर्ष अडकली आहे, ते मी सांगितलं...ती माझी सगळी कहाणी ऐकून भावनिक झाली आणि म्हणाली इथे कोण नाही आहे तोपर्यंत पटकन तुझ्या घरातल्या कोणाचा मोबाईल नंबर लक्षात आहे कां तुझ्या.... मी पटकन तीच्या नोटपॅडवर बाबांचा नंबर लिहून दिला.
अरुणा म्हणाली मला कितपत मदत करता येईल सांगता येतं नाही आहे पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मला शक्य होईल तेव्हढे प्रयत्न मी नक्कीच करेन.
कारण हे आयशा आणि आसिफ खुप मोठे लोक आहेत, ते हे प्रकरण दाबायला पाहतील, पण तू धीर सोडू नकोसं, ही तुझी छोटी बहीण तुला नक्कीच मदत करेल. मी तुझ्यासाठी आहे इथे... तू काळजी करू नकोसं.. दोन दिवसांनी तुला सोडतील पण माझ्याकडे ह्या हॉस्पिटलला तुला ऍडमिट केलेल्याची फाईल असणार त्यामुळे मला तुला त्यांनी कुठे ठेवलं आहे त्यांचा पत्ता किंवा फोननंबर मला मिळणार, मी तुला अजून इथे अडकू देणार नाही मी तुला सोडवायला जरूर प्रयत्न करते असं बोलून तिने माझ्या खांद्यावर थोपटलं.
एवढ्या दिवसांनी इथून सुटण्याची दहा टक्के तरी आशा दिसल्यामुळे मला आतून भरून येतं होतं, मी हात जोडून अरुणाला म्हंटल प्लिज तू प्रयत्न कर मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन... प्लिज अरुणा प्लिज...मला सोडवं ह्या सगळयांतून मी रडतं हतबल होऊनं बोलले.
अरुणा म्हणाली, तुला उदया संध्याकाळी सोडतील, मी मदत करते तुला पण आपण बोललेलं कोणाला कळु देऊ नकोसं, मी असं काहीतरी करते की ते आसिफ आणि आयशा अडकतील.. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
अरुणा खूप धीट मुलगी वाटली मला...मला खरंच तिचा खूप आधार वाटला.
मी हॉस्पिटलमधून निघणार त्या दिवशी एक तास आधी पण ती येऊन माझा हात हातात धरून, शर्वरी स्वतः ची काळजी घे, मी जरूर प्रयत्न करणार, तू धीर सोडू नकोसं असं मला जवळ घेऊन सांगून गेली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अरुणा कोणाला कॉन्टॅक्ट करते आणि हे सगळं सांगते ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा