अर्धांगिनी - भाग -30
आसिफ निघून गेल्यावर आयशा म्हणाली, शर्वरी मी हात जोडून मनापासून तुझी माफी मागते, आणि आसिफला माहित आहे, मी ठरवलं तर त्याचं वाईटही करू शकते, कारण माझ्या माहेरचे आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहेत त्यामुळे मी त्याच्या विरोधात जाऊ शकते, कारण त्याने मला तलाक नं देता तुला चुकीच्या पद्धतीने इथे आणून ठेवलं आहे.
मी त्याला तेव्हा खूप समजावलं होतं की त्याने असं करू नये, त्याच्या आईने पण त्याला असं करू नकोसं असं सांगितलं होतं, पण आसिफ कोणाचचं ऐकायला तयार नव्हता. मी त्याला साथ दिली नसती, किंवा नाही म्हणले असते तरीसुद्धा त्याने तुला पळवलं असतंच, त्याला बाप होण्याच्या इच्छेने पच्छाडलं होतं.
आसिफने कोणाचं लहान मुलं बघितलं की त्याला वाईट वाटतं असे, कोणत्याही फॅमिली प्रोग्रामला जाणे त्याने बंद केले होते, कारण तिथे खूप लहान मुलं असायची त्यांना त्यांचे आई - वडील खेळवतं असायचे..मग ह्याला त्यांना बघून हळहळायला व्हायचं, आतून खूप रडायला यायचं, पण दोष माझ्यात होता त्यामुळे तो काहींचं करू शकत नव्हता, त्यात त्याचा माझ्यावर जीव पण आहेच.
आणि त्याचे आई- वडील माझ्याशी अतिशय चांगले वागतात मला मुलीसारखं वागवतात, त्यामुळे ते माझ्या बाजूने होते त्यांचं म्हणणं होतं मुलं दत्तक घ्या नां, आणि ते पण नको असेल तर एखादं अनाथ मुलं घ्या, स्वतः च्या मुलाप्रमाणे त्याच्यावर माया करा, आपलं मुलं म्हणून त्याला वाढवा, आम्हीही त्यात खुश होऊ, त्याची आई खूप प्रेमळ आहे अगं, माझी सासूबाई नाही ती दुसरी आईच आहे माझी ती.
पण आसिफ मनाने खचला होता, रात्र - रात्र जागु लागला, त्याला बाप नं होणे म्हणजे लोक त्याला नाव ठेवतील असंही वाटू लागलं होतं, बाप नं होणे म्हणजे तो त्याचं पुरुष असणं सिद्ध करु शकत नाही आहे असे अनेक विचार तो करू लागला होता, आणि एका क्षणी तो अजूनच खचला, एवढा की मी त्याला मानसिक डॉक्टरकडे घेऊन गेले, त्यांनीही त्याला खूप समजावले.
आणि मग त्याच्या एका मित्राने त्याला ही अशी पैसे देऊन तुला पळवून आणण्याची आयडिया सुचवली ते ऐकून तो खुश झाला, त्याचं म्हणणं होतं मुलं झालं की भरपूर पैसे देऊन तुला आम्ही पुन्हा इंडियाला सोडू, एवढे पैसे की पन्नास लाख पण तुला त्याने जाताना दिले असते, पण नशीबाची चक्र वेगळ्याच दिशेने फिरली आणि आमचं मुलं वाचलंच नाही, पण आता बसं झालं तुझी अजून वाताहत नको मी तुला सोडवण्यासाठी प्रयत्न करते..
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आयशा बोलली तर खरी पण शर्वरीला आसिफच्या तावडीतून सोडवणं तिलाही एवढं सहज शक्य नव्हतं.)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा