अर्धांगिनी - भाग -31
दुसऱ्या दिवशी सकाळी आसिफ आत आल्यावर रागात मी विचारलं,
...माझं आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही?
...माझं आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही?
तुझं काय- म्हणजे? इथेच राहणार आहेस तू...आसिफ मोठ्याने बोलला.
तुम्ही दोघेही मला म्हणाला होतात मी जर ह्या प्रकरणात तुम्हाला मदत केली तर तुम्ही मला माझ्या आई - बाबांकडे पाठवालं.
नाही तू कुठेही जाणार नाहीस असं आसिफ ओरडून बोलला, त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने आयशा आत आली आणि म्हणाली.....जर काल तिने आपल्याला ह्या प्रकरणातून सुटायला मदत केली तर मीदेखील तिला मदत करेन असं मी तिला म्हटलं होतं"
आयशा तू काय वेडी झालीस कां, तू हिला कशाला मदत करते आहेस,तिला परत पाठवण्यासाठी तू प्रयत्न करतेस, काय पागल आहेस कां.. ती कुठेही जाणार नाही आहे, मुलं वाचत नाही आहे पण ती माझ्यापासून गरोदर राहते आहे हे कशी विसरतेय तू, ही इथून जाणार नाही, समजलं तुला...नको तो शहाणपणा करणं बंद करं, वीस लाख मोजलेत हिच्यासाठी, आणि अजून मला मुलं झालेलंच नाही आहे.
मला मुलं हवंय हिच्याकडून समजले तुला,तू अशी मागे कां फिरते आहेस, तू तेव्हा मला सपोर्ट केला होतास ह्या सगळ्यात, आणि आता ही शर्वरी इथे सेट झाली आहे तर तुला तीला परत पाठवायचे आहे..
आयशा म्हणाली अरे पण काल आपण वाचलो पण पुन्हा कोणी चेकिंगला आलं आणि त्यांना सुगावा लागला तर मला जेलमध्ये जायचं नाही आहे, पुन्हा ह्यात अडकलो तर आपण...
आणि मी नाईलाज म्हणून तुझं ऐकलं होतं, तू खूप खचला होतास, रडायचासं म्हणून मी हो म्हणाले होते. तूझ्या आईला हे सगळं पसंत नव्हतं तरी मी अर्धांगिनी म्हणून तुला साथ दिलीच नां रे, मी तुझी बायको दुसऱ्या रूममध्ये झोपलेली असताना हिच्याबरोबर मुलं व्हावं म्हणून तुला झोपू दिलंच नां मी, मला कांय यातना झाल्या असतील ह्याचा तू विचारही करू शकत नाहीस.
मी तुझ्याबरोबर लग्न करून पंधरा वर्ष झालीत, मी तुला दुस्र्या स्त्रीच्या रूममध्ये पाठवताना मला झोप लागली असेल कां रे रात्रं- रात्रं, माझ्या मनाचा विचार केलास कां रे तू, मी रडली नसेन कां रे...
माझ्या आई - वडिलांना तूझ्या ह्या निर्णयामुळे काय धक्का बसला असेल ह्याचा तरी तू विचार केला होतास कां, मी अक्षरशः त्यांना रडून रडून समजावलं होतं. पण पाच वर्ष झाली हेच चालू आहे आता बसं झाली तुझीच मनमानी..
पाच वर्षात मुलं होऊ शकलं नाही आहे आणि ही शर्वरी बिचारी इथेच अडकून पडली आहे, दोनदा मुलं गेलं म्हणजे देवाला पण तुझं बाप होणं मान्य नाही आहे हे स्वीकार कर आसिफ...
आयशाच्या शेवटच्या वाक्यावर आसिफने चिडून तीला आयशा गप्प बसं असं बोलून कानाखाली मारली, ती पुन्हा ओरडून बोलली माझ्यावर चिडून काय होणार आहे सत्य स्वीकार...
मी आज नां उद्या बाप होणार आहे समजलं तुला असं चिडून बोलून आसिफ रागात बाहेर गेला.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरीला मदत करायला आयशा गेली तरी आसिफ तीला काय त्रास देणार ते. )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा