अर्धांगिनी - भाग - 32
पुढचे दोन दिवसं कोणीच माझ्या रूममध्ये आलं नाही, मदतनीसबाईच जेवण आणून देत होत्या, नंतर मी मनात म्हंटल मागे एकदा मी इथे नवीन असताना आसिफ म्हणाला होता ह्या रूममध्ये माईक बसवला आहे, पण आयशा माझ्याशी एवढी बोलतेय म्हणजे तिने गुपचूप माईक काढला की काय, मी रूमला आतून कडी लावून माईक शोधला कुठेही काहींचं दिसलं नाही. मी मनात म्हंटल आयशा एकटी दिसली की तीला विचारते,कारण अजून पण मला रूमबाहेर जाण्याची बंदी होती.
पाचव्या दिवशी आयशा स्वतः जेवण घेऊन आली आणि म्हणाली आसिफ घरी नाही आहे ऑफिसमध्ये आहे, आपण निवांत गप्पा मारत जेवूया माझं पण जेवण इथेच आणलं आहे, तिने मला एक घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
ती म्हणाली शर्वरी मला माफ कर, मी माझ्या नवऱ्याच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि तुला इथे आणायला हो म्हणाले. मी तीला हळूच म्हंटल माईक आहे नां इथे, ती हसून म्हणाली तो मी केव्हाच गडप केला आहे, एकदा तू आणि आसिफ सोनोग्राफीला दोघेच गेला होतात बघ मला ताप आला होता म्हणूनं मी घरी राहिले तेव्हाच मी तो माईक तोडून टाकुन पण दिला, आणि आसिफला काहींचं लक्षात पण आलं नाहीं नंतर तो विसरून पण गेला असेल इथेच माईक होता ते, आम्ही दोघीही हसलो.
आयशा बोलू लागली, आसिफ तसा खूप प्रेमळ आहे, त्याने कधीही मुलं होण्याव्यतिरिक्त बाकी वेळेस दिवसाही तू एकटी असताना तुझ्यावर उगाचंच जबरदस्ती केली नाही नां, तो तसा वाईट नाही आहे पण तरी हा त्याचा हा मुलं होण्याचा अट्टहास त्याला कुठे पोचवतो आहे ते देवालाच माहित, मुलं होणं म्हणजेच सगळं काही असं त्याचं वागणं झालं आहे.
अरे सर्व छान आहे, आर्थिक स्थिती उत्तम आहे, मग हा हट्ट कां, त्यात तो पण एकुलता एक आहे नां त्यामुळे ही संपत्ती त्याच्यानंतर कोणाला देणार, फुकट जाणार सर्व ऐश्वर्य असंही तो म्हणतो, विचार करण्याची त्याची क्षमता वेगळी आहे, त्याला आपण काय करू शकतो.
आता मी चार दिवसापूर्वी तुला मदत करेन म्हणाले नां आता तो माझ्यावर पण लक्ष ठेवून असेल बघ, आता तो माझ्या अकाउंट्स वर पण लक्ष ठेवेल मी तुला सोडवण्यासाठी कोणाला पैसे देते कां हे पण तो लक्ष ठेवून असेल.
पण खरं सांगू आता मला तुला मनापासून मदत करावीशी वाटतेय, बघू मला काही करता येतं कां ते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरीची सुटका होते की नाही ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा