Login

अर्धांगिनी - भाग -33

Bayko
अर्धांगिनी - भाग -33


( मागील भागात आपण बघितले -  आयशा शर्वरीला म्हणाली मी तुला मदत करेन असं, पण ते एवढं सहज शक्य नव्हतं, आता पुढे )


    दुसऱ्या दिवशी सकाळी आयशा रूममध्ये आली आणि म्हणाली, की माझे तुला मदत करण्याचे प्रयत्न चालू आहेत, प्लिज माझ्यावर विश्वास ठेवं, मी आज आसिफ ऑफिसला गेल्यावर माझ्या वडिलांशी ह्या विषयावर चर्चा करणार आहे, माझ्या माहेरचे लोक खूप चांगले आहेत. माझे अब्बू नक्कीच मला मदत करतील.


अब्बू तुझा पासपोर्ट आणि जाण्याचा सगळा खरंच सुद्धा सहज करतील, पण प्रश्न असा आहे की, मला तुझे पासपोर्ट आसिफच्या कपाटातून चोरावे लागेल, आणि दुसरं म्हणजे जे सगळं गुपचूप करावं लागेल, आणि चुकून हे सगळं आसिफला कळलं तर माझं काही खरं नाही.


मला आताशा समजून चुकलं आहे माझ्या नशिबात मुलाचं दान देव देणार नाही आहे, त्यामुळे मला आता माझी चूक उमगली आहे, जे झालं त्यात मी उगाच सहभागी झाले असं वाटतंय आता, उगाच माझं पण पाप वाढलं, देव मला पण ह्याची शिक्षा कधी नां कधी देईलचं.



मी म्हणाले आयशा - तू मला मदत करते आहेस हे आसिफला कळले तर तो तुला जिवंत ठेवणार नाही अगं, तू रिस्क घेते आहेस खरी, पण मला मनापासून तुझी पण काळजी वाटतेय.


आयशा म्हणाली -  तू नको काळजी करू, मी जरूर प्रयत्न करतेय, मला तुला ह्यावेळी मनापासून मदत करावीशी वाटतेय आणि ती मदत मी नक्कीच करणार आणि ती मनापासून हसली आणि म्हणाली,. "मला आनंद आहे की तू तुझ्या घरी परत जाते आहेस."


मी म्हणू लागले....आसिफ कांगावा करेल, तुला मारेल त्याची पण काळजी आहेच गं, त्याची मला खूप भीती वाटते अगं, हा निर्णय समजल्यावर तो खूप चिडेल, काय बोलावे मला काही सुचेचना. मी आयशाचा हात हातात धरून तीला तुझे खूप खूप आभार तुझे असं मनापासून म्हंटल.


आयशा बोलू लागली, तुझ्या मनावर झालेले घाव तू विसरशील तेव्हा विसरशील पण तरीही मी तुझी मनापासून माफी मागते, तू आता लवकरच घरी जाशील, तू गुपचूप हळू हळू तुझ्या बॅगा पण पॅक करायला सुरवात कर,  तू ह्यावर जास्त विचार करू नकोस, आता तू तूझ्या घरी नक्कीच जाणार..तू एक- दोन महिन्यात नक्कीच तुझ्या आई- बाबांकडे जाशील, तू आता आनंदी रहा. असं बोलून आयशा बाहेर निघून गेली.



मी मनातुन खूप खुश झाले, आणि मनात म्हणू लागले, चला फायनली माझी सुटका होणार.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आयशा शर्वरीच्या हातात इंडियाचं तिकीट ठेवते पण ते ती कसं शक्य करते ती ).
0

🎭 Series Post

View all