Login

अर्धांगिनी - भाग -35

Bayko

अर्धांगिनी - भाग - 35


मी प्लेनमध्ये बसले आणि मला रडू आवरेना, मी विचार करु लागले.....आज सात वर्षांनी मी मुक्त झाले होते, माझे वय आता बत्तीस चालू होते, ह्या सात वर्षात समाजाने मला किती नावं ठेवली असतील ना, एवढी वर्ष एखादी मुलगी गायब होते म्हणजे लोकांनी मला बदनाम केले असेल, आई- बाबांना तर वाटले असेल मी कोणाबरोबर पळून तर गेले नाही ना, सात वर्षात मी कोणालाच कॉन्टॅक्ट केला नव्हता, आणि आजही माझ्याकडे मोबाईल नव्हता.

सात वर्षांनी मी पुण्यात पोचणार होते, आई- बाबा काय रिऍक्ट होतील, दादाचं लग्न झालं असेल कां, वहिनी मला असं सात वर्षाने आलेलं बघून काय म्हणेल, मी सर्व खरं सांगितलं तर वहिनी मला दोष देईल कां, कि मला सगळेच सहज स्वीकारतील.

असे नानातर्हेचे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले, मी विचार करून रडतं राहिले, आणि फायनली पुण्याला पोचले, आणि आता कधी एकदा घरी पोचते असं मला झालं होतं, मी माझा चेहरा पूर्ण झाकून घेतला, कारण आजूबाजूच्या कोणी बघितलं तर उगाच काय उत्तर देऊ अशी माझी स्तिथी झाली होती.


मी घराजवळ पोचल्यावर तर माझ्या छातीत धडधडू लागलं, मी घराजवळ पोचले, आणि बघितलं तर घराला टाळ होतं, मी स्क्रॅफने चेहरा झाकला होता तशीच मी बाजूच्या रूममध्ये घरी कोण कां नाही हे विचारायला गेले, तर समजले घरचे सर्व ही रूम सोडून दुसरीकडे राहायला गेलेत, पण कुठे गेले त्यांचा पत्ता कोणाकडेचं नव्हता.

मी खूप घाबरले आता काय करू असं मला झालं होतं, कोणीच आई- बाबा, दादाबद्दल माहिती सांगत नव्हते, मला जोरात रडायला यायला लागलं, मी म्हंटल मी त्यांची नातेवाईक आहे त्यांना तातडीने भेटायचं होतं.


माझा चेहरा झाकलेला असल्यामुळे कोणीच मला ओळखलं नाही, एक बाई बोलल्या अहो त्यांची मुलगी गायब झाल्यावर ते लोकांच्या प्रश्नांना कंटाळून कुठेतरी गायब झालेत, रोज पोलीस येत होते, बिचारे त्या मुलीचे आई- बाबा रडून दिवस घालवत होते, मुलगी खूप शोधल्यानंतर पण सापडली नाही त्यांची, कुठे गेली काय माहिती, कि कोणाचा हात धरून पळून गेली देवचं जाणो.. आई- बापाच्या जीवाला घोर लावून गेली ती...


मला रडू आवरेना म्हणून मी तिथून निघाले आणि आता काय करू, कुठे जाऊ ह्या विचाराने सुन्न झाले, पुणे प्लॅटफॉर्मवर बसून पुढे काय असा विचार करू लागले, कसं शोधणार आई- बाबांना.. मला काय करू सुचतचं नव्हतं.


मी पोलीस स्टेशनला जायचा निर्णय घेतला, मनात म्हंटल सात वर्षांपूर्वी मी हरवले त्याची नोंद नक्कीच तिथे असेल, कदाचित आई- बाबांचा नवीन ऍड्रेस किंवा नवीन मोबाईल नंबर तरी तिथे मिळेल.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- शर्वरी तिच्या घरातल्यांचा शोध कसा घेते )

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all