अर्धांगिनी- भाग-37
मागच्या भागात आपण बघितले - शर्वरीला दादा सांगतो, आई - बाबा दोघेही वारलेत, आता पुढे....
शर्वरी आणि दादा घरी येतात, वहिनी - साक्षी त्यांना घरात घेते, पण शर्वरी सापडली म्हणून दादासारखा तीच्या चेहऱ्यावर आनंद नसतो, ती ताई आत या, एवढंच बोलून पाणी आणायला किचनमध्ये जाते, ती गप्प असतें.
दादा मात्र वहिनीला हाक मारून म्हणतो - साक्षी - शर्वरीला आराम करुदेत ती लांबून, प्रवासातून आली आहे, तिच्यासाठी छान जेवण करं असं वहिनीला सांगतो, ती फक्त हो असं बोलून आत जाते.
शर्वरीला दादा म्हणतो, तू फ्रेश हो आणि मग सगळं निवांत सांग मला, कां अडकली होतीस तिथे आणि ते पण सात वर्ष, जेवून घे मग आपण बोलू, जा फ्रेश हो, असं बोलून तो तीला थोपटतो.
शर्वरी बाथरूममध्ये जाते आणि तीला रडायला येतं, त्या पाण्याबरोबर ती आपल्या दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देते, ती मनातल्या मनात म्हणते, काय सांगणार मी, माझा दोन वेळा गर्भपात झाला, आसिफने मुलं होण्यासाठी माझ्यावर सतत अत्याचार केला.
मुलं झालं नाही म्हणून मला सोडलंय आता त्यांनी... कसं आणि काय सांगू ह्या दोघांना, त्यात वहिनी माझ्या ह्या अशा अचानक येण्याने नाराज दिसतेय, त्यांच्या संसारात मी उगाचंच आले हे तीच्या वागण्यावरूनचं समजतंय, दादाला काय सांगणार मी हे सगळं, आणि हे सगळं समजल्यावर वहिनी अजून माझा दुस्वास करेल, दुसऱ्या कोणाच्या तरी घरी मी सात वर्ष राहिले आणि ते पण नोकरीसाठी न्हवे तर त्यांना मुलं देण्यासाठी, हे वहिनीला अयोग्य वाटणार..
शर्वरीला खूप रडायला येतं असतं, शेवटी ती ठरवते की, असं सांगूया की -तिकडे घरकाम करण्यासाठी फसवून दहा मुलींना नेण्यात आलं होतं, त्यात् ती पण होती, आणि मग त्या लोकांच्या घरी मदतनीस म्हणून सात वर्ष ती राहिली, आणि आता ते सर- मॅडम एका अपघातात वारले म्हणून हिची त्यांच्या एका पाहुण्यांनी सुटका केली.
शर्वरी बाथरूममधून बाहेर येते, दादा तिचीच वाट पाहत असतो, शर्वरीला तो म्हणतो, वहिनी स्वयंपाक करतेय तोपर्यंत तू मला आता सगळं सविस्तर सांग..
शर्वरी सांगते तिचा एक मित्र कामावरून येताना तीला लिफ्ट देतो, आणि मग ती कशी फसते आणि मग तीला एक महिन्याने दुबईला नेलं जातं, आणि मग एका जोडप्याच्या घरी तीला नोकर बनवून सात वर्ष तिथेच पगार न देता अडकवून ठेवलं होतं, ते जोडपं वारलं आणि तिची सुटका झाली.
दादा अजून पण खूप प्रश्न विचारत असतो, पण वहिनी तेवढ्यात जेवण घेऊन येते आणि मग विषय तिथेच थांबतो, वहिनी जेवायला वाढताना पण खूप गप्प गप्प असतें, ते बघून शर्वरिचं म्हणते वहिनी जेवण छान झालं आहे, बरं एवढंच साक्षी बोलते.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- साक्षीच्या ह्या अशा वागण्यामुळे शर्वरीला अजून काय मनस्ताप सहन करावा लागतो ते)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा