Login

अर्धांगिनी - भाग -51

Bayko

अर्धांगिनी- भाग - 51


कोर्टात केस चालू असते, शर्वरीची बाजू खरी असली तरी आरोपीचे वकील आरोपीला वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतात.....


वकील सगळी साक्ष, उलट- सुलट फिरवून शर्वरीला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करत असतं, सहा महिने तारखेला सतत हेच होतं होते, पण वहिनी- दादा शर्वरीला धीर देतं असतं.. हे सगळं लवकरच संपेल असा दोघं आत्मविश्वास देतं असतं.


बाल्कनीत उभी असलेली शर्वरी दूर आकाशाकडे पाहत उभी असते, आतून वहिनीचा आवाज येतो.
“शर्वरी… आत ये. थंडी वाढतेय.”

दुसऱ्या दिवशी सकाळीच शर्वरिचा फोन वाजतो, वकील देशमुख असतात. “ ते म्हणतात...शर्वरी, आज समीरची उलटतपासणी आहे. मानसिकदृष्ट्या तयार रहा. ते तुला तोडायचा प्रयत्न करतील., पण तू ठाम राहा...”ती हो बोलूंन फोन ठेवते, आणि आरशात पाहून ती स्वतःलाच म्हणते..अजून किती दिवस हे सगळं चालणार आहे देवचं जाणो...


पण ती मनाला समजावते - “तू आजपर्यंत सहा महिने लढलीस आता माघार नाही....त्या समीरला सजा झालीच पाहिजे...


आजही कोर्टात वातावरण अधिक तणावपूर्ण असतं. समीर आत्मविश्वासात उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची छाया नसते, उलट एक विचित्र हसू असतं., तो काही केल्या त्या आसिफ, आयशाचा पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर सांगत नसतो, जणू त्याला खात्री असते,कि हे लोक माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत, उलटतपासणी सुरू होते.


तेवढ्यात समीर बोलतो, हि शर्वरी खोटं बोलतेय, हिच्याकडे मीच हिला माझ्या गाडीत बसायला सांगितलं ह्याचा काय पुरावा आहे “ही सगळी बनवाबनवी आहे. मला बदनाम करण्यासाठी!”


शर्वरी अचानक त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, अरे नीच माणसा - सात वर्ष मी त्रास भोगला तो पण तुझ्यामुळे आणि आता तू म्हणतोस काय पुरावा आहे असं...तू वीस लाखात दुसऱ्याच्या मुलीला विकलंस तुला तुझी बहीण तेव्हा आठवली नाही कां..मी तिकडे अडकले आणि तू इथे मोकाट होतास...माझ्या आयुष्याची राख- रांगोळी केलीस आणि आता बोलतोस काय पुरावा आहे...

समीरचे वकील म्हणतात पण पुरावा नाही आहे ना, सात वर्षांपूर्वीचं सी सी टीव्ही फुटेज पण नाही आहे, त्यात त्यावेळी रात्र होती.. त्यामुळे तू म्हणते आहेस ते खरं कसं मानायचं.. तू दुबईवरून आलीस हे खरं मानलं तरी तुला तू कुठे होतीस तिथला पत्ता, फोन नंबर पण सांगता येत नाही आहे, तुला कोंडून ठेवलं होतं म्हणतेस पण सात वर्षात तिथला पत्ता नाही समजू शकलीस तू...

शर्वरी ओरडून बोलते, सात वर्ष एका रूममध्ये होते, मला बाहेर नेलं जातं नसे...मला कोंडून ठेवलं होतं त्यांनी, समीर सांग ना तू त्या आसिफला मला विकलं होतंस ते, कां खोटं बोलतो आहेस, कां माझ्या सहनशक्तीचा अंत बघतो आहेस तू.....

न्यायालयात वातावरण बदलतं, सुनावणी पुढे ढकलली जाते, बाहेर पडताना शर्वरीला जाणवतं — लढाई अजून संपलेली नाही.

घरी परतल्यावर दादा म्हणतो....शऱू “आज तू फक्त स्वतःसाठी नाही… अनेक न बोलणाऱ्या आवाजांसाठी उभी राहिलीस... तुझा अभिमान वाटतो मला, आपण त्या आयशा आणि आसिफचा काही पत्ता लागतो कां ते बघुयात...


(पुढील भागात — खटल्यातील निर्णायक पुरावा, शर्वरीच्या आयुष्यात येणारी नवी ओळख आणि तिच्या भविष्याचा पहिला दरवाजा उघडतो…)

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

वाचकहो, अर्धांगिनी कथा - आता न्यायाच्या पुढे जाऊन नव्या आयुष्याकडे वळते आहे.… वाचत राहा...
0

🎭 Series Post

View all