Login

अर्धांगिनी - भाग - 55

Bayko

अर्धांगिनी - भाग -55



शर्वरी वहिनीच्या हातातली ती चिट्ठी पाहून क्षणभर स्तब्ध होते. तीच्या हृदयाची धडधड वाढते, हात थरथरू लागतात.
“दे… दे इथे…”बघू काय लिहिलं आहे त्यात..
तिचा आवाज नकळत कापरा धरतो.


ती चिट्ठी उघडते,ती चिठ्ठी साध्या कागदावर होती.... शर्वरी वाचायला सुरवात करते....


शर्वरी तु मला माफ कर असं मी म्हणणार नाही,
कारण मी माफ करण्याच्या लायकीची पण नाही आहे,
मी आसिफच्या वतीने तुझी माफि मागते,
तुझी सात वर्ष आम्ही फुकट घालवली,
मुलाच्या हव्यासापोटी आसिफने हे असं कृत्य केलं,
देव आम्हाला तुझ्या आयुष्याची वाट लावून सुखं कसं देईल,
आपण सात वर्ष एकत्र राहिलो त्यामुळे तुझ्याबद्दल खूप आस्था वाटतेय..
तू तिकडे गेल्यावर घरचे तुला कसे ऍकसेप्ट करतील,
तूला एवढ्या वर्षांनी सहज स्वीकारतील कां ह्याची पण मला खूप चिंता वाटते आहे..... खरंच मनापासून तुझी काळजी वाटतेय... म्हणून तूला मला कधी चुकून माफ करावंसं वाटलं किंवा माझ्याशी बोलावंसं वाटलं तर तर कुठे बोलशील.. गुप्ततेच्या कारणासत्व मी माझा मोबाईल नंबर तुला देत नाहीं आहे...



पण इथे इमेल आयडी लिहिते आहे, तुला चुकून कधी माझी आठवण आली तर इमेल कर मला...तुझी खुशाली प्लिज मला कळवं, मी तुझ्या इमेलची वाट बघेन...


सॉरी.........आयशा”

चिठ्ठी वाचून शर्वरीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.
ती खुर्चीवर बसते.... आणि साक्षीला म्हणते वहिनी देवाने आपलं गाऱ्हाणं ऐकलं, आयशाचा पत्ता नाही पण निदान इमेल आयडी तरी मिळाला, मी तीला इमेल करून ती रिप्लाय देते कां बघते...


आधीच आपण वकिलांना नको बोलूया आधी आयशा काय रिप्लाय करते ते बघुयात... साक्षी म्हणते जा तू पटकन लॅपटॉप आण आपण इमेल करूयात....


शर्वरी आयशाला इमेल लिहायला बसते...त्यात ती लिहिते...


आयशा...मी घरी सुखरूप पोचली आहे, तू कशी आहेस,आसिफला घरी आणल्यावर त्याने मी नाही बघून गोंधळ घातला कां, तुला त्रास दिला कां, तु सुखरूप आहेस नां... तू कुठल्या त्रासात नाहीस नां...मला इमेलला रिप्लाय देऊन सगळं कळवं...


प्लिज रिप्लाय कर..

शर्वरी....


तीन दिवसांनी आयशाचा रिप्लाय येतो... ती सांगते...


आसिफला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर परिस्थिती फार बिघडली...तो तू नाहीस बघून फार चिडला, त्याने खूप गोंधळ घातला, तो व्हाब्रेट झाला आणि त्यांतच त्याला पुन्हा दुसरा अटॅक आला आणि आसिफ त्यात मला सोडून गेला, तो ऑफ झाला आहे, सध्या आसिफचा बिजनेस मी सांभाळतेय...माझ्या सोबतीला माझी एक कझीन आहे.. आम्ही दोघी सगळं संभाळतोय.. आसिफ गेल्यावर त्याचे आई-वडील एक महिन्यांनी पुन्हा पाकिस्तानला गेले..


शर्वरी म्हणते.... आसिफचं ऐकून फार वाईट वाटलं...


आयशा तू माझी एक मदत करशील....आयशा बोलते हा सांग नां...


शर्वरी म्हणते....मी ज्या मित्रांने मला फसवून दुबईला तुमच्याकडे पाठवलं होतं त्याच्या विरोधात केस टाकली आहे, तो आता जेलमध्ये आहे...तर तू मी सांगतेय ते खरं आहे ह्याबद्दल तू साक्ष देशील कां प्लिज...





(पुढील भागात — आयशा साक्ष देते कां... आणि समीरसमोर उभा राहणारा तो क्षण… ज्यापासून तो पळू शकणार नाही… हे आपण बघणार आहोत.)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all