अर्धांगिनी - भाग - 58
आयशा बोलू लागते - सगळं खरं सांगते.. अगदी समिरचा कॉन्टॅक्ट नंबर कुठून मिळाला आणि तो हे काम कधीपासून करतोय हे सगळं, आणि त्या एजन्सीचा ऍड्रेस, सगळं प्रिंट करून पेपर्स असं सगळं तिने आणलेलं असतं...
शर्वरीचे डोळे पाणावतात,साक्षी तिचा हात घट्ट धरते.
समीरचा चेहरा फिकट पडतो, पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यांत भीती दिसते.
पळायची एकही वाट उरलेली नाही…हे त्यालाही कळतं....न्यायाधीश गंभीर आवाजात म्हणतात..
“ही साक्ष केससाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”
न्यायाधीश समोर पाहत म्हणतात,“आरोपी पक्षाला उलटतपासणीस परवानगी आहे.”...समीरचा वकील उभा राहतो...
“आयशा खान,”तो उपरोधिक हसत विचारतो,“तुम्ही स्वतः कबूल करता की तुम्हीही या सगळ्यात सामील होतात,मग आम्ही तुमच्या साक्षीवर विश्वास कसा ठेवायचा?”
आयशा क्षणभर थांबते, संपूर्ण कोर्टरूम तिच्याकडे पाहत असते.ती शांतपणे म्हणते,“हो, मी गप्प बसले होते, कारण माझा नाईलाज होता..
आयशा क्षणभर थांबते, संपूर्ण कोर्टरूम तिच्याकडे पाहत असते.ती शांतपणे म्हणते,“हो, मी गप्प बसले होते, कारण माझा नाईलाज होता..
वकील पुन्हा विचारतो...
“तुम्हाला खात्री आहे का की समीरच यात सामील होता?”आयशाचे डोळे थेट समीरकडे जातात......
“हो,”.....ती ठामपणे म्हणते,“कारण मी त्याचा आणि आसिफचा व्हिडीओ कॉल ऐकला आहे,मी समीरचा चेहरा पाहिलेला आहे,संपूर्ण प्लॅन एका एजंटमार्फत ठरवलेला होता.”
कोर्टरूममध्ये एकच खळबळ उडते.सरकारी वकील तत्क्षणी उभा राहतो.
“माय लॉर्ड, साक्षीदाराला त्या एजंटबद्दल अधिक माहिती आहे.”न्यायाधीश मान डोलावतात.“सांगू शकता का, आयशा?”
“माय लॉर्ड, साक्षीदाराला त्या एजंटबद्दल अधिक माहिती आहे.”न्यायाधीश मान डोलावतात.“सांगू शकता का, आयशा?”
आयशा म्हणते “हो....ती एक एजन्सी आहे…
जिथून मुलींना नोकरी, लग्न, चांगलं आयुष्य दाखवून फसवलं जातं...नंतर त्यांना कोंडून ठेवलं जातं…आणि बेशुद्ध अवस्थेत भारतातुन दुबईला पाठवलं जातं.”“मी त्या एजन्सीचं नाव,कॉन्टॅक्ट नंबर,आणि पत्ता सगळं पोलिसांना देते आहे...,”

शर्वरीच्या डोळ्यांत पाणी तरळतं.
माझ्यासारख्या कितीतरी मुलीं फसल्या गेल्यात..…हा विचार तिच्या मनात येतो.
समीर आता पूर्णपणे कोलमडलेला असतो, त्याचा चेहरा पांढराफटक पडतो.
वकीलही गोंधळलेला दिसतो, न्यायाधीश कठोर आवाजात म्हणतात,
“ही साक्ष अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
पोलीस तात्काळ तपास सुरू करतील.”समीरकडे पाहून ते पुढे म्हणतात,“आणि आरोपीला ताब्यात घेण्यात यावं.”त्या क्षणी पोलिस समीरच्या जवळ येतात.
तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो…पण शब्द फुटत नाहीत.
तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो…पण शब्द फुटत नाहीत.
शर्वरीचे पाय थरथरतात.साक्षी तिचा हात घट्ट धरते.
तो क्षण…जिथे समिरचा मुखवटा कोसळतो.शर्वरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात.पण आज ते अश्रू वेदनेचे नसतात, ते असतात मुक्ततेचे.
तो क्षण…जिथे समिरचा मुखवटा कोसळतो.शर्वरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात.पण आज ते अश्रू वेदनेचे नसतात, ते असतात मुक्ततेचे.
ती मनातच म्हणते,दहा महिने…आज खऱ्या अर्थाने संपले, न्यायाधीश समिरला दोषी ठरवतात, आणि आयशाची मुख्य साक्षीदार म्हणून सुटका होते..
आयशा शर्वरीकडे येते आणि तीला मिठी मारते..
शर्वरी म्हणते आयशा खूप खूप धन्यवाद.....
आयशा…आज तू फक्त माझ्यासाठी नाही,तर त्या सगळ्या मुलींसाठी उभी राहिलीस.” दादा आणि साक्षी पण तीला थँकयु म्हणतात.......आयशाचे डोळे भरून येतात.....ती मान खाली घालते आणि म्हणते तुम्ही तिघांनी जमलं तर मला माफ करा... मी हात जोडून तुमची माफी मागते... शर्वरी म्हणते आयशा घरी येतेस आमच्या, जेवून जा निवांत....बसून बोलू आपण..
आयशा म्हणते नको, मी संध्याकाळच्या फ्लाईटने निघते आहे, इथे एका हॉटेलवर थांबली आहे.. सगळ्यांचा निरोप घेऊन आयशा निघते...
(पुढील भागात - शर्वरीच्या आयुष्याची नवी सुरुवात.)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा