अर्धांगिनी - भाग - 60
(नवा प्रवास… एक अनपेक्षित वळण)
दुसऱ्या दिवशीची सकाळ वेगळीच उजाडते, शर्वरी लवकर उठते, खिडकी उघडते…हवेत एक वेगळाच गारवा असतो, जणू आयुष्याने नवं पान उघडलंय.
स्वयंपाकघरातून साक्षीचा आवाज येतो,
“शऱू… चहा घेतेस ना?”“हो वहिनी,”
शर्वरी हसत उत्तर देते,हा हसरा आवाज तिलाच आज नवा वाटतो.
“शऱू… चहा घेतेस ना?”“हो वहिनी,”
शर्वरी हसत उत्तर देते,हा हसरा आवाज तिलाच आज नवा वाटतो.
चहा हातात घेऊन ती टेबलजवळ बसते,दादा पेपर वाचत असतो.
तो शऱूला म्हणतो,“शर्वरी… पुढे काय करायचंय ते ठरवलंस का?”
तो शऱूला म्हणतो,“शर्वरी… पुढे काय करायचंय ते ठरवलंस का?”
“माहिती नाही दादा,” ती प्रामाणिकपणे म्हणते...
दादा म्हणतो, बरं ठीक आहे, तू बीजी राहावीस म्हणून मी म्हणत होतो.. सध्या आठ - दहा दिवस आराम कर, मग आपण जॉबचं बघू...
दादा म्हणतो, बरं ठीक आहे, तू बीजी राहावीस म्हणून मी म्हणत होतो.. सध्या आठ - दहा दिवस आराम कर, मग आपण जॉबचं बघू...
दुपारी महिला सहाय्यता केंद्रातून आलेली बाई घरी येते.
ती म्हणते,“तुझी केस आम्ही अभ्यासली आहे,तू जे सहन केलंस…ते इतर मुलींना समजायला हवं.”ती बाई पुढे म्हणते,
“की तू इतर पीडित मुलींशी बोलशील, त्यांना धीर देशील,तू तयार आहेस का?”
शर्वरी शांतपणे ऐकत असते...शर्वरीच्या मनात आठवणी दाटून येतात…सात वर्ष एक रूम …असहायता…ती म्हणते,“जर माझ्या बोलण्याने एखादी जरी मुलगी वाचली…तर मी नक्की मदत करेन.”
साक्षीचे डोळे भरून येतात.
“मग पुढच्या आठवड्यात एक छोटा कार्यक्रम आहे,तिथे तू बोलशील.”,”ती बाई म्हणते.. शऱू हो म्हणते.
ती बाई निघून गेल्यावर - दरवाजा बंद झाल्यावर साक्षी शर्वरीला मिठी मारते.
“शऱू… तुला कल्पनाच नाही, तू किती मोठं काम करायला चालली आहेस.”
शर्वरी हसते आणि म्हणते “माझ्यासाठी नाही वहिनी…माझ्यासारख्या सगळ्यांसाठी.”
त्या रात्री तिला उशिरा झोप लागते, पण आज विचार भीतीचे नसतात…
ते आशेचे असतात.
झोपेतच तिचा फोन वाजतो,एक मेसेज.
“Hello Sharvari …... मी तनिश.... सपोर्ट ग्रुपचा ऍडमिन...
“Hello Sharvari …... मी तनिश.... सपोर्ट ग्रुपचा ऍडमिन...
I heard about your case through the support group.
Your courage inspired me, Can we talk?”
Your courage inspired me, Can we talk?”
शर्वरी मेसेज वाचून स्तब्ध होते,अनपेक्षित… पण अर्थपूर्ण.
ती रिप्लाय करते,“Yes. We can.”
आणि फोन बाजूला ठेवते.
ती रिप्लाय करते,“Yes. We can.”
आणि फोन बाजूला ठेवते.
तीच्या छातीत एक वेगळीच धडधड होवू लागते, ही फक्त सुरुवात आहे, हे तिला कळून चुकतं, ती मनातल्या मनात म्हणते - कोण हा मुलगा आहे काय माहित, काय बोलतो ते उदया बघूयात... त्या सपोर्ट ग्रुपच्या मॅडमनी त्याला मला त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये ऍड करायला सांगितले असेल... असूदेत बरं...
(पुढील भागात — शर्वरीचा समाजासाठी उघडणारा नवा मंच, आणि तिच्या आयुष्यात येणारी एक नवी व्यक्ती… जी तिच्या प्रवासाला वेगळं वळण देणार आहे…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा