अर्धांगिनी – भाग - 61
सकाळ उजाडते......स्वयंपाकघरातून साक्षीचा आवाज येतो,“शऱू… आज तुला इंटरव्हिव्हला जायचं आहे नां...
“हो वहिनी,”शर्वरी उत्तर देते.
दादा हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवतो आणि म्हणतो, शऱू तुझे सगळे डॉक्यूमेंट्स घेऊन जा, दुबईचं काहीच नावं काढू नकोसं.. नोकरी नाही मिळाली तरी चालेल, पण टेन्शन घेऊ नकोसं, नीट सगळ्या प्रश्नांची उत्तर दे.. हो दादा मी अकरा वाजता निघणार आहे, असं शर्वरी म्हणते..
शर्वरी खोलीत जाऊन बॅग तपासते.
रेझ्युमे…ओळखपत्र…सगळं व्यवस्थित आहे ना ते पाहून घेते, आरशात पाहताना ती स्वतःशीच हसते आणि म्हणते...आज चेहऱ्यावर मेकअप नाही…फक्त आत्मविश्वास आहे.
रेझ्युमे…ओळखपत्र…सगळं व्यवस्थित आहे ना ते पाहून घेते, आरशात पाहताना ती स्वतःशीच हसते आणि म्हणते...आज चेहऱ्यावर मेकअप नाही…फक्त आत्मविश्वास आहे.
अकरा वाजता ती घराबाहेर पडते.
साक्षी दारात उभी राहून म्हणते,“शऱू… काहीही झालं तरी तू नाराज होऊ नकोस, तू आधीच खूप मोठी लढाई जिंकली आहेस.”
शर्वरी मान हलकेच हलवते आणि साक्षीला बाय करून निघते.
ती इंटरव्हिव्हच्या जागी पोचते, ऑफिसची बिल्डिंग खूप मोठी असते..रिसेप्शनवर स्वतःचं नाव सांगताना तिचा आवाज क्षणभर अडखळतो…पण ती स्वतःला सावरते.
ती वेटिंग एरियामध्ये बसलेली असताना अर्ध्या तासाने
“Sharvari Joshi?”
असा आवाज पुकारला जातो, शऱू उभी राहते.मनात धडधड…ती केबिनमध्ये जाते.
इंटरव्हिव्ह रूममध्ये दोन जण बसलेले असतात.
प्रश्न साधे असतात…कामाचा अनुभव,आव्हानं,स्वतःबद्दल…
प्रश्न साधे असतात…कामाचा अनुभव,आव्हानं,स्वतःबद्दल…
“तुम्ही इतका ब्रेक का घेतलात?”एक जण प्रश्न विचारतो...क्षणभर शांतता, शर्वरी खोल श्वास घेते आणि म्हणते, सर“माझी काही वैयक्तिक कारणं होती…...त्यानंतर कोणीही पुढचा प्रश्न विचारत नाही.
इंटरव्हिव्ह संपतो.
“आम्ही तुम्हाला लवकरच कळवू,”असं ते म्हणतात.
“आम्ही तुम्हाला लवकरच कळवू,”असं ते म्हणतात.
ऑफिसच्या बाहेर पडताचं पाऊस सुरू झालेला असतो.तेवढ्यात तिचा फोन वाजतो.
“Sharvari?
“हो.”
“मी तनिश बोलतोय.
मॅडम, तुम्हाला आमच्या संस्थेत शनिवारी यायचं आहे, टाईम आणि वेळ दोन दिवसात कळवतो..तनिश अगदी हसून बोलतं असतो..
हो बरं चालेल असं बोलून फोन ठेवताना शऱूच्या चेहऱ्यावर एक.. समाधान येतं.
ती पावसात थोडीशी भिजते, पण आज तिला थंडी वाटत नाही, कारण आज पहिल्यांदाच नोकरीपेक्षा मोठं काहीतरी तिने मिळवलं आहे..तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास.
शर्वरी पावसात थोडावेळ तशीच उभी राहते,भोवतालचं जग घाईत असतं…लोक छत्र्या उघडत, ऑटो पकडत धावत असतात…पण ती मात्र आज गतीने चालते.
बसस्टॉपकडे जाताना ती फोन हातात घेते, दादाचा मिस्ड कॉल येऊन गेलेला असतो, ती लगेच कॉल करते.
“दादा…दादाचा आवाज नेहमीसारखाच, पण आतून काळजीचा.”“कसा झाला इंटरव्हिव्ह?” दादा विचारतो..
“ठीक झाला दादा…काय होईल माहित नाही... दादा बोलतो- बरं असूदेत...
घरी परतल्यावर साक्षी दारातच उभी असते, शर्वरीला पाहताच विचारते,“काय झालं, घाबरली नाहीस ना बोलताना..”शर्वरी हसतं म्हणते, नाही गं वहिनी..
ते हसू साक्षीसाठी सगळ्या उत्तरांपेक्षा मोठं असतं, साक्षी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते सगळं नीट होईल...
(पुढील भागात - संस्थेतली शर्वरीची पहिली पायरी, आणि तनिशसोबत होणारी प्रत्यक्ष भेट…जी तिच्या आयुष्यात नात्यांचा अर्थ बदलून टाकणार आहे…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
