Login

अर्धांगिनी - भाग -62

Bayko


अर्धांगिनी – भाग – 62


शनिवार उजाडतो, साक्षी पण शऱूबरोबर संस्थेत जाणार असते. दोघी जायला निघतात.

संस्था शहराच्या मधोमध असते,पण आत पाऊल टाकताच एक वेगळंच शांत वातावरण जाणवतं, भिंतींवर लावलेले पोस्टर्स –स्त्री सक्षमीकरण, समुपदेशन, कायदेशीर मदत सगळेचं पोस्टर्स शर्वरीच्या नजरेत भरतात.


“Good morning… Sharvari Joshi?”
रिसेप्शनिस्ट बोलते.“हो,”ती हलकेच हसून उत्तर देते.

“तनिश सर वाट पाहतायत… या प्लिज, समोर साध्या कपड्यातली एक व्यक्ती उभी असते.
“Hi Sharvari… मी तनिश.”
“नमस्कार सर.”“
सर नको म्हणूस,”तो हसत म्हणतो,“आणि बस असं म्हणून तो तिला बसायला सांगतो.

संस्थेचा फेरफटका सुरू होतो.समुपदेशनाची खोली...तिथे बसलेली एक महिला रडत असते, शर्वरी नकळत तिथे थांबते.
“ही सुषमा,”तनिश हळूच सांगतो,“न्यायालयीन लढाईत थकलेली आहे… अजून निर्णय बाकी आहे.”

शर्वरीचं मन क्षणभर भूतकाळात जातं.तिला स्वतःचीच आठवण येते.“तू बसशील तिच्याजवळ?”तनिश विचारतो, क्षणाचाही विचार न करता शर्वरी तिच्याजवळ जाते..

सुषमाच्या डोळ्यात पाणी…शर्वरी तिचा हात धरते.त्या स्पर्शात शब्द नसतात, पण आधार असतो.
तनिश आणि साक्षी दूरून हे दृश्य पाहत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटतं.

फेरफटका संपल्यावर तनिश म्हणतो, शर्वरी अशा मुली असतातं इथे, आयुष्यात हरलेल्या, जगण्याची उमेद गमावलेल्या, त्यांना तू तुझी कहाणी सांगून त्यांची उमेद वाढवशील कां...

शर्वरी मान हलवते, आणि म्हणते... हो नक्कीच.. संस्थेच्या मॅडम येतात आणि शर्वरीला म्हणतात, मी बाकीच्या मुलींना बोलावते तू बोल त्यांना, त्यांच्याशी संवाद साध...

शर्वरी सगळ्या मुलींना छान समजावते, आणि सांगते, हरू नका गं, एक दिवस नक्कीच तुमचा असेल...

त्या मॅडम शर्वरीच्या बोलण्यावर खूप खुश होतात आणि त्यामुळे त्या शर्वरीला निघताना विचारतात...“शर्वरी… उद्यापासून तू इथे ट्रायल बेसिसवर काम करशील.”“पण लक्षात ठेव,”“इथे काम करताना काही नाती जुळतात… काही प्रश्न पडतात… आणि काही उत्तरं आपल्यालाच शोधावी लागतात.”

शर्वरी, वहिनीला विचारते, साक्षी पण म्हणते हो म्हण...

संस्थेबाहेर पडताना तिला जाणवतं, उद्या नुसती नोकरी सुरू होणार नाही आहे…तर तिने स्वतःला पुन्हा समाजाशी जोडायला सुरुवात केली आहे, आणि कुठेतरी, तनिशसोबत झालेली ही पहिली प्रत्यक्ष भेटफक्त कामापुरती राहणार नाही…याची चाहूल तिच्या मनाला लागलेली असते.
ती खोल श्वास घेते आणि मनात म्हणते..हा प्रवास कठीण असेल…पण आता मी एकटी नाही.


(पुढील भागात – भूतकाळाशी साधर्म्य असलेली एक केस… आणि तनिश व शर्वरीमधील संवादाला मिळणारी नवी दिशा …)

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

0

🎭 Series Post

View all