अर्धांगिनी - भाग - 63
दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वरीला लवकरच जाग येते, खिडकीतून येणारा उन्हाचा कोवळा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. काल संस्थेत घडलेले क्षण अजूनही मनात घोळत होते, ती उठून गॅलरीतं जाऊन उभी राहते, तेवढ्यात,स्वयंपाकघरातून साक्षीचा आवाज येतो.“शऱू.... फ्रेश होऊन ये, मग आपण चहा घेऊ.
शर्वरी किचनमध्ये जाते आणि साक्षीला म्हणते - “वहिनी… आज संस्थेत जॉईन व्हायचं आहे पण कालपासून मन काहीसं भरून आलंय.”
साक्षी तिला समजावण्याच्या सुरात म्हणते.. शऱू..“नवीन सुरुवात अशीच असते गं..... थोडी घाबरवणारी पण आश्वासक.… ” तू लवकरच छान रूळशील बघ तिथे, सगळं नीट होईल बघ.. जा पटकन अंघोळ करून घे...
शर्वरी बरं म्हणते, आणि आंघोळ करायला निघून जाते, शर्वरी स्वतःचं आटपून संस्थेतं जायला निघते, संस्थेत पाऊल टाकतानां तीच मन घाबरत असतं..ती कचरतचं आत जाते.
आता जाताच “Good morning, Sharvari.” तनिशचा आवाज.
“Good morning.” ती हसून म्हणते.
“Good morning.” ती हसून म्हणते.
तनिश तिला एक फाईल देतो. आणि म्हणतो.“आज एक केस आहे… तू फक्त बस, ऐक, काही बोलायचं असेल तर बोल.”शर्वरी फाईल उघडते.
नाव – मेघा देशमुख, वय – २९
लग्न – ६ वर्षं, तक्रार – मानसिक आणि शारीरिक छळ
मेघा समोर बसलेली असते. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, आवाजात थकवा, रडतं सगळं सांगण्याचा मेघा प्रयत्न करत असतें, शर्वरीचे डोळे तीला बघून पाणावतात, शर्वरी तीला म्हणते मेघा रडू नकोसं - सगळं ठीक होईल..
तनिश शांतपणे हे सगळं पाहत असतो, त्याला जाणवतं....
ही मुलगी फक्त समुपदेशक नाही… ही स्वतः एक जिवंत उदाहरण आहे.
ही मुलगी फक्त समुपदेशक नाही… ही स्वतः एक जिवंत उदाहरण आहे.
केस संपल्यानंतर तनिश बाहेर येतो आणि म्हणतो, शर्वरी“तुझा भूतकाळ अजूनही तुला दुखावतो का?”ती खोल श्वास घेते आणि म्हणते...
“दुखावतो… पण आता तो मला मोडत नाही. तो मला मजबूत करतो.”
“दुखावतो… पण आता तो मला मोडत नाही. तो मला मजबूत करतो.”
तनिश मनापासून हसतो आणि म्हणतो.“मग इथे तुझी खूप गरज आहे.”
तनिश, आणि त्यांच्या मॅडम - सुधा मॅडम, अजून दोन कलीग आशा, उमा असे सगळे मिळून दिवसभरात सगळ्या केस फाईल शर्वरीला दाखवतात, त्याची कॉम्पुटरमध्ये एन्ट्री कशी करून ठेवायची, कसा रेकॉर्ड सेव करून ठेवायचा असं सगळं शिकवतात.
संध्याकाळी सहा वाजता शऱू आणि एक कलीग उमा घरी एकत्र जायला निघतात, दूरून केबिनमधून तनिशचा आवाज येतो.
“शर्वरी...उद्या वेळेवर ये… अजून एक केस आहे.”
“शर्वरी...उद्या वेळेवर ये… अजून एक केस आहे.”
शर्वरी हसते आणि हो नक्की येईन.. असं म्हणते,ती चालता चालता विचार करू लागते, हा प्रवास सोपा नाही…पण प्रत्येक पाऊल आता अर्थपूर्ण आहे.
(पुढील भागात –मेघाच्या केसला मिळणारे धक्कादायक वळण…
आणि तनिशच्या आयुष्यातील एक माहित नसलेली बाजू उलगडली जाणार...…)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा