अर्धांगिनी - भाग - 67
काही क्षण जातात मग शर्वरी म्हणते,"कसा आहेस?”तो हसण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो,“मी नेहमीच ठीक असतो.”
“खरंच?” ती सरळ विचारते,तो नजर खाली करतो आणि म्हणतो “एकटेपणाची सवय आहे मला,पण आता सवय बदलावी म्हणतोय, दहा वर्षे एकटा राहतोय, कंटाळलो आहे आता त्या एकटेपणाला...तो तिच्याकडे पाहतं म्हणतो..
चहा संपतो. “ चल उशीर होतोय, वहिनी वाट बघत असेल असं म्हणून उदया परत भेटूया कां, पण लंचला भेटू म्हणजे बराच वेळ बोलता येईल..?”असं शर्वरी विचारते......“नक्की,”तो म्हणतो,ती हलकंसं हसते.
शर्वरी घराकडे जायला निघते. रस्त्यात गर्दी आहे, गाड्यांचे आवाज आहेत… पण तिच्या मनात मात्र शांतता नाही, तनिशचे शब्द पुन्हा पुन्हा तीच्या कानात घुमत असतात, “दहा वर्षे एकटा राहतोय… कंटाळलो आहे त्या एकटेपणाला…”
ती स्वतःलाच विचारते,मी पण तर एकटेपणाशीच झुंजतेयं ना?
फरक एवढाच… आपण ते मान्य करायला वेळ घेतो, आणि त्याने ते थेट बोलून टाकलं....
दुसऱ्या दिवशी दुपारी ती ठरलेल्या वेळेला पोहोचते, यावेळी दोघांमध्ये कालसारखं अवघडलेपण नसतं, तनिश आधीच तिथे आलेला असतो,तिला पाहून हलकंसं हसतो.
शर्वरी“मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितोयं,”
तो पुढे म्हणतो,“कदाचित चुकीची वेळ असेल… पण योग्य माणूस समोर असेल, तर वेळेला अर्थ असतो.”
तो पुढे म्हणतो,“कदाचित चुकीची वेळ असेल… पण योग्य माणूस समोर असेल, तर वेळेला अर्थ असतो.”
तो थोडा थांबतो.. आणि म्हणतो...
“मला एकटेपणातून बाहेर यायचं आहे…आणि तू…तू माझ्या आयुष्यात आलीस, तेव्हा पहिल्यांदा वाटलं...कदाचित आता थांबायची वेळ आली आहे.” तुझी साथ मला हवी आहे,माझी अर्धांगिनी होशील तू...
“मला एकटेपणातून बाहेर यायचं आहे…आणि तू…तू माझ्या आयुष्यात आलीस, तेव्हा पहिल्यांदा वाटलं...कदाचित आता थांबायची वेळ आली आहे.” तुझी साथ मला हवी आहे,माझी अर्धांगिनी होशील तू...
ती नजर खाली घालते, मग हळूच म्हणते,
“तनिश…मी सध्या स्वतःला सावरतेय, माझाही सुखाचा संसार असावा असं मला ही वाटतं पण तुला माझा सगळा भूतकाळ माहित आहेचं पण तरीही तू मला विचारतो आहेस, तुझी सहचारिणी होण्यासाठी मी योग्य आहे हे तुला मनापासून वाटतंय नां...

तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मला सगळं माहित आहे अगं, तरीही तू मला माझ्या घरी बायको म्हणून हवी आहेस.. माझं प्रेम आहे तुझ्यावर...
दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरते, शर्वरी हातातला पाण्याचा ग्लास अलगद ठेवते.
क्षणभर डोळे मिटते… जणू स्वतःशीच बोलते आहे.
क्षणभर डोळे मिटते… जणू स्वतःशीच बोलते आहे.
तनिश तिच्याकडे पाहत असतो—घाई न करता, आग्रह न धरता.
पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या निर्णयाला वेळ देतोय, हे तिला जाणवतं.
“तनिश…”ती हळू आवाजात म्हणते,“मला उत्तर द्यायला वेळ हवा आहे.”
तो लगेच मान हलवतो, “माहिती आहे. आणि तो वेळ मी तुला देईन.
तो लगेच मान हलवतो, “माहिती आहे. आणि तो वेळ मी तुला देईन.
कारण मला तुझं हो हवं आहे....“मी तुझी वाट पाहीन,”
तो पुढे म्हणतो,“पण तोपर्यंत… आपण फक्त एकमेकांना ओळखूया, शर्वरी हळूच हसते.
तो पुढे म्हणतो,“पण तोपर्यंत… आपण फक्त एकमेकांना ओळखूया, शर्वरी हळूच हसते.
संध्याकाळी घरी परतल्यावर ती खोलीत येते,आरशात स्वतःला पाहते, आणि हळूच हसते, रात्री साक्षी तीला म्हणते, “शऱू… आज खूप शांत दिसतेस.”
शर्वरी थोडा वेळ थांबते... आणि म्हणते...“वहिनी… कुणीतरी मला स्वीकारायला तयार आहे…माझ्या भूतकाळासह.”साक्षी तिचा हात घट्ट धरते आणि म्हणते...
“मग ऐक फक्त मनाचं...येणाऱ्या गोड भविष्याला स्वीकार....
त्या रात्री शर्वरीला झोप लागत नाही, खूप दिवसांनी मनात प्रश्न असले तरी,मनावर ओझं नाही.
पुढच्या भागात - शर्वरीचं हो म्हणणं आणि तीच्या कुटुंबाशी तनिशचा संवाद
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा