Login

बालपण आणि पाऊस

बालपण आणि पाऊस यांच्या गमतीजमती सांगणारी कविता

बालपण आणि पाऊस

बालपण आणि पाऊस
यांच अनोख नातं
मन आजही त्या
आठवणीत हरवून जातं

रिमझिम पावसात
मनसोक्त भिजायचं
कागदाच्या होड्या
त्या पाण्यात सोडायचं

पाण्यात पाय आपटून
नाचत मस्त बागडायचं
नंतर आईचा ओरडा
आणि प्रसंगी मार खायचं

किती ते क्षण
वाटायचे भारी
विसरायचो त्यात
दुनिया सारी

आठवता ते
मस्तीचे क्षण
नयनांतून वाहे
आसवांचे घन