तेलही गेले तूप ही गेले -
भांडण - (भाग १)
©® स्वाती बालूरकर सखी.
“ माझ्या आई वडिलांना मुलगा नाही त्यामुळे त्यांची जबाबदारी आम्हा दोघी बहिणींवरच आहे. . . हे माहीत आहे ना तुला?”
“ हो ना. मी नाही म्हणालो का ? अगं पण किती ? किती जबाबदारी घ्यावी . . . आणि कुठे पर्यंत घ्यावी याला काही मर्यादा आहे की नाही ?”
“सॉरी मीत, पण तू आता लिमिटच्या बाहेर बोलतो आहेस. कसली मर्यादा रे? आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा ताई घेऊन गेली होती ना तिला . आता बाबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे , मी त्यांना ऑपरेशन नंतर घरी आणायला हवं होतं . . .पण कुठे जमलं. . ? बरोबर त्यावेळी तात्या आणि माई आले.”
“अगं हो! त्यांचं रुटीन चेकअप नको का करायला ? मीच बोलावलं होतं त्यांना . . . आणि त्यांची अपॉइंटमेंट होती केव्हापासून . . तुझ्या बाबांचं अचानक ठरलं.”
"अरे हो, पण ऑप्टिक नर्व्ह मध्ये इन्फेक्शन झालं ना, ते अचानकच होणार! ते काय सांगून किंवा प्लान करून होत नसतं ."
"तुझा स्वर बदलतोय मिताली. माईंड युवर सेल्फ ! आवर स्वतःला. आणि हो तेवढं कळतं मला. आता आपण सिच्युएशन मॅनेज करावी. ."
"तेच तर . मी म्हणूनच सिच्युएशन हँडल करतीय. बाबांना इथे आणू शकत नाही. जागा तरी कुठे आहे आपल्या या छोट्याशा घरात ?"
"मिताली, प्रशस्त टू बीएचके फ्लॅट आहे ग आपला , जागा नाही असं काय म्हणतेस ?”
“हो रे पण बेडरूम दोनच ना ! एक आपली आणि एक रुद्र्ची. तुझे आई बाबा असताना रुद्रची खोली आपण त्यांना देतो . मग बाबांना जर इथे आणलं तर त्यांना कुठे झोपायला देणार ?”
मीत ने कपाळाला हात मारला .
“पण आपल्याला तर हे मॅनेज करावेच लागेल ना !”
“मॅनेज तर करतेच आहे ना मी. तुझ्या लक्षात येत नाहीय का?”
“आता प्रत्येक वेळी त्यांना इथे आणणार का तू ? नाही ना!”
“अरे मग मी ड्युटी वरून येताना डायरेक्ट बाबांकडे जाते . त्यांना गोळ्या औषध देते . डोळ्यात ड्रॉप टाकते. संध्याकाळचे खायला बनवते आणि मग घरी येते ना . माझी किती ओढाताण होते आहे कळतंय का?”
“अच्छा तुझी ओढाताण अन् माझं काय? मी तर ऑफिसातून आठ वाजता येतो तेव्हा घरात हा पसारा असतो. स्वयंपाक झालेला नसतो. मग मी कुकर लावतो. रुद्र ची मदत घेऊन घर आवरतो . . . हे तुला कधीच का दिसत नाही ?”
“अरे हो ना! दिसतं पण मग घरासाठीच करतोयस ना तू. त्याची एवढी चर्चा कशाला करतोस . तर आल्यावर मी पण करते ना पोळी भाजी.”
“ हो ना मग , ते तर करायलाच पाहिजे.”
“एक सांग , माई आहेत ना घरात? मग तू का कुकर लावतोस? मी जर करायलाच पाहिजे तर तू पण करायलाच पाहिजे ना . . . आपल्या संसारासाठी करतोस.”
“हो बरोबर आहे. . . आपल्या संसारापेक्षा तुला तुझ्या आई-बाबांचं नेहमीच जास्त कौतुक असतं .एवढा विचार कधी माईचा करतेस का ग तू? “
“.मीत, कशी काय तुलना सुचते रे तुला? अरे माई - नाना धडधाकट आहेत ना. माझ्या आई-बाबा सारखे आधारित नाहीत. एकटे राहून करतात ना त्या गावी , मग इथे पण एखाद्या दिवशी . . . स्वयंपाक केला तर काय झालं ?”
“अग ते सोड ती रोजच येते किचनमधे, मी स्वयंपाक करते म्हणून , मी तुला करू देत नाही .घरी पण तिने तेच करायचं आणि इथे मुलाकडे आल्यावर तेच . . तरीही ती कणिक मळून ठेवते, भाजी चिरून ठेवते तू येईपर्यंत .खूप अंडरस्टँडिंग आहे ग माझी आई .”
रुद्र दारात उभा राहून हे सर्व ऐकत होता.
त्याला कळतच नव्हतं की नेमकं कोण बरोबर आहे आणि कोण चूक .
त्याला कळतच नव्हतं की नेमकं कोण बरोबर आहे आणि कोण चूक .
त्याला दोन्ही आजी-आजोबा आवडायचे.
त्याला मॉम आणि डॅडू पण हसत खेळत बोलताना खूप आवडायचे पण यादरम्यान असे खटके नेहमीच आठ- दहा दिवसाला उडायचेच.
त्याला मॉम आणि डॅडू पण हसत खेळत बोलताना खूप आवडायचे पण यादरम्यान असे खटके नेहमीच आठ- दहा दिवसाला उडायचेच.
म्हणजे त्याला कळायचं नाही की एरवी इतक्या प्रेमाने राहणारे नवरा बायको असे कडकडून कसे भांडू शकतात ?
शिल्लक किंवा क्षुल्लक कारण ही पुरायचं त्यांना वाद सुरू करण्यासाठी.
मग तो त्यांचा चढलेला आवाज ऐकून रूद्र भेदरून जायचा.
सुरुवातीला तो आत खोलीत जाऊन झोपायचा किंवा मित्राकडे खेळायला जायचा.
सुरुवातीला तो आत खोलीत जाऊन झोपायचा किंवा मित्राकडे खेळायला जायचा.
जर हे भांडण रात्री चाललं असेल तर तो कानावर उशी ठेवून आवाज न ऐकायचा प्रयत्न करायचा.
त्याला कधी कधी वाटायचं की दोघांची तोंडे हाताने बंद करावी आणि म्हणावं की ‘बस आता प्लीज ! माझ्याशी बोला ना ! मला विचारा शाळेतल्या गोष्टी ? माझं कौतुक करा. कधीतरी.’
पण हे जे त्याला वाटायचं ते क्वचितच घडायचं.
आजही त्याला गणिताच्या टेस्टमध्ये 20 पैकी साडे 19 मार्क पडले होते. खूप उत्साहाने तो घरी आला होता.
आता तो वही घेऊन बेडरूमच्या दारात उभा होता आणि यांचा वाद संपला की वही दाखवावी आणि कौतुक करून घ्यावं.
पण वाद काही संपत नव्हता, तो वाढतच गेला.
आता तो वही घेऊन बेडरूमच्या दारात उभा होता आणि यांचा वाद संपला की वही दाखवावी आणि कौतुक करून घ्यावं.
पण वाद काही संपत नव्हता, तो वाढतच गेला.
मग त्याने आजोबांचा फोन घेऊन गेम खेळायला सुरुवात केली.
थोड्यावेळाने किचनकडून आवाज आला .
“या जेवायला, स्वयंपाक तयार आहे.”
मीत पटकन भानावर आला .
“अग माई हे काय? तू का केलास स्वयंपाक, आम्ही येतच होतो ना!”
मिताली पण म्हणाली,” अहो ,काय माई ,मी फ्रेश होऊन येतच होते.”
“ तेच ना, तू वाद घालत बसलीस माझ्याशी आणि माईनेच स्वयंपाक केला बघ.” मीत खूप नाराजीच्या स्वरात बोलला.
मिताली वरमली .” अरे पण भांडणाला सुरुवात कोणी केली?”
यावरून पुन्हा त्यांची चर्चा सुरू झाली.
तात्यांनी दोघांना आवाज दिला. तेव्हा दोघे गुपचूप जेवायला आले .
©® स्वाती बालूरकर सखी.
३०.११.२४
३०.११.२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा