" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
भुताटकी की कॉमेडी?
©® एकता माने
कॉलेजमध्ये दिवसभराच्या लेक्चर्स, त्यानंतर मित्रांच्या गप्पांमध्ये संध्याकाळी सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं की आज एक भन्नाट हॉरर मूव्ही बघायची. अगदी नाव ऐकूनच अंगावर काटा यावा अशी... त्यामुळे सगळे मिळून शहरातल्या एका मल्टिप्लेक्समध्ये गेले होते.
सिनेमात जे काही भयानक दाखवलं गेलं होतं ते पाहून मित्रमंडळी थोडी घाबरलीसुद्धा होती; पण दीपक मात्र अजूनही ठामपणे म्हणत होता,
"अरे, हे सगळं काही नसतं. भूत वगैरे काही नसतं रे बाबांनो. लोक फक्त मनातल्या भीतीतून कल्पना करतात."
त्याचे मित्र हसले.
त्यांपैकी सूरजने त्याला चिडवत म्हटलं,
"ठीक आहे रे महाशय! आज रात्री बारानंतर जेव्हा एकटा घरी जाशील ना, तेव्हा लक्षात येईल की भूत आहे का नाही ते."
"ठीक आहे रे महाशय! आज रात्री बारानंतर जेव्हा एकटा घरी जाशील ना, तेव्हा लक्षात येईल की भूत आहे का नाही ते."
यावर सगळे जण खळखळून हसले.
चित्रपट संपला आणि मित्र आपापल्या गाड्यांनी निघाले. दीपकला त्याचा मित्र समीरने स्कूटीवरून मेन रोडपर्यंत सोडलं.
"अरे तू गाडी इकडेच का थांबवली? इकडून दहा मिनिटांच्या अंतरावर तर घर आहे, मग तिकडेच सोड ना..." दीपकने विचारलं.
तसा समीर खिदळला.
"अरे, आता तूच म्हणाला होतास ना की भूत वगैरे नसतं. मग जा ना निर्धास्त. शिवाय मला उद्या सकाळी लवकर क्लास आहे, उशीर झाला तर आई काढते कानशिलात!"
असं म्हणून त्याने हात हलवत स्कूटी वळवली.
असं म्हणून त्याने हात हलवत स्कूटी वळवली.
शेवटी दीपकने एकट्यानेच पुढचा रस्ता धरला.
रात्र गडद काळोखाची होती. रस्त्यावर क्वचितच एखादी लखलखणारी निळसर लाईटची झळक पडत होती. वाऱ्याचा हलकासा सुळसुळाट कानावर येत होता.
चालताना दीपकने मोबाईल काढून वेळ पाहिली तर बरोबर १२:०० झाले होते.
क्षणभर त्याच्या अंगावर शहारा येऊन गेला. कारण अगदी अलीकडेच तोच मित्रांना सांगत होता की भूत वगैरे काही नसतं; पण आता मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती.
त्याला अचानक समोर काहीतरी पांढरं दिसलं. दूरवर रस्त्याच्या कडेला एखादी स्त्री उभी असल्यासारखी... अंगावर पांढरी साडी, लांब केस आणि ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती.
क्षणभर दीपक थबकला.
त्याच्या मनातल्या सगळ्या 'भूत नसतं..' या गप्पा गळून पडल्या. हृदयाची धडधड वाढली होती.
तो स्वतःशी पुटपुटला,
'नाही रे… हा काहीतरी गैरसमज आहे. ही नक्की एखादी बाई असेल. कदाचित कुणीतरी गावाकडची किंवा…'
पण त्याचे पाय मात्र पुढे जायला तयारच नव्हते.
त्याने मागे वळून पाहिलं. रस्ता रिकामा... ना कुणी माणूस, ना कुत्रं, ना आवाज. फक्त झाडांच्या फांद्यांचा सळसळणारा आवाज येत होता.
पुन्हा त्याची नजर त्या पांढऱ्या सावलीवर गेली. ती अजूनही तशीच उभी होती. जागची हलतही नव्हती.
दीपकचे शब्द घशात अडकलेले.
"ए… ए… कोण आहे तिथं?"
पण समोरून काहीच उत्तर आलं नाही.
त्याने थोडं पुढं पाऊल टाकलं. आता स्पष्ट दिसत होतं की ती पांढरी साडी नेसलेली एक बाई आहे. लांब केस पाठीवर सोडलेले. मात्र अजूनही हालचाल काहीच नव्हती.
दीपकच्या पोटात गोळा आला. घाम फुटला. तो जवळपास कुजबुजला,
'हे काय खरंच भूत तर नाही ना?'
'हे काय खरंच भूत तर नाही ना?'
तो मागे वळून पळायचा विचार करत होता; पण मन म्हणत होतं की "भूत नसतं म्हणाला होतास. आता पळालास तर सगळे मित्र चिडवतील."
त्याने धीर करून एक पाऊल पुढे टाकलं. मग अजून एक. अजून एक...
आता तो अगदी जवळ आला होता. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की जणू बाहेर पडेल.
त्याने घाबरत तिच्या खांद्याला हलकेच हात लावला आणि म्हणाला,
"ओ… बाई… तुम्ही… कोण आहात?"
"ओ… बाई… तुम्ही… कोण आहात?"
क्षणभर शांतता पसरली होती आणि पुढच्याच क्षणी ती 'भुताटकी बाई' मागे वळली.
दीपकच्या डोळ्यांत धडकी भरली; पण मग...
"अरे देवा!"
त्या खरं तर त्याच्या शेजारच्या गल्लीतील शांता काकू होत्या!
पांढरी साडी नेसून, हातात पांघरूण घेतलं होतं. डोक्यावर तेल लावल्यामुळे केस अगदी ओले दिसत होते.
शांता काकू घाबरून ओरडल्या,
"अरे दीपक! तुला काय झालंय? मध्यरात्री असं चोरट्यासारखं का आलास माझ्या मागं?"
"अरे दीपक! तुला काय झालंय? मध्यरात्री असं चोरट्यासारखं का आलास माझ्या मागं?"
दीपक थरथरत म्हणाला,
"क…काकू, ते... तुम्ही इतक्या रात्रीचे असे रस्त्यावर काय करत आहात? ते पण एकट्या!"
"क…काकू, ते... तुम्ही इतक्या रात्रीचे असे रस्त्यावर काय करत आहात? ते पण एकट्या!"
"अरे त्या आपल्या शेजारच्या नाडकर्णी काकू आहेत ना, त्यांच्या घरात बसले होते. त्यांनी काय तो जुना पिक्चर लावला होता मग माझी पण बघण्याची इच्छा झाली. उद्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे तशी पण मुलं काय उशिरा उठणार आहेत. मग विचार केला आज वेळ आहे तर बघू. म्हणून मग तशीच बसून राहिले. पिक्चर संपायला एवढा वेळ झाला हे समजलेच नाही. बाहेर गारवा आहे, म्हणून त्यांचं अंगावर घेतलेलं पांघरूणच घेऊन आले." काकू अगदी सहजपणे त्याच्याकडे बघून त्याला सांगत होत्या.
दीपक गडबडून हसला आणि म्हणाला,
"काकू... खरंच सांगतो, माझा जीव कुठेतरी जाऊन पडला होता जणू. पांढरी साडी, रात्री बारा वाजलेले… सगळं सिनेमासारखं वाटलं!"
"काकू... खरंच सांगतो, माझा जीव कुठेतरी जाऊन पडला होता जणू. पांढरी साडी, रात्री बारा वाजलेले… सगळं सिनेमासारखं वाटलं!"
काकू खदखदून हसल्या आणि म्हणाल्या,
"अरे बावळटा, तुझ्या अशा वागण्याने मलाच हृदयविकाराचा झटका आला असता रे! एवढ्या रात्री कोणी पाठीतून 'ओ बाई' म्हणून बोलवलं तर कोण घाबरणार नाही?"
"अरे बावळटा, तुझ्या अशा वागण्याने मलाच हृदयविकाराचा झटका आला असता रे! एवढ्या रात्री कोणी पाठीतून 'ओ बाई' म्हणून बोलवलं तर कोण घाबरणार नाही?"
त्यांचं हसू थांबेचना. दीपकला पण आता स्वतःचे हसू येऊ लागले.
'समीरला सांगितलं तर तो मला कधीच सोडणार नाही.' दीपक पुटपुटला.
"हो हो, उद्या सगळ्या गल्लीत सांगणार आहे. हा दीपक मला रात्रीचे भूत समजून घाबरला. स्वतःही घाबरला आणि मलाही घाबरवलं!" काकूही त्याला चिडवण्याच्या स्वरात म्हणाल्या.
पुढची काही मिनिटे दीपक आणि शांता काकू एकत्र चालत गेले. दीपक सतत स्वतःवर हसत होता. मित्रांपुढे नेहमी 'मी काही भुतांना घाबरत नाही.' असं सांगणारा तो, आज एका पांढऱ्या साडीच्या सावलीला पाहून जवळजवळ रडायलाच आला होता.
रात्रभर तो हा किस्सा आठवून स्वतःच्याच डोक्याला हात मारत राहिला.
दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोहचताच समीरने हसून विचारलं,
"काय रे, शेरासारखा परत आलास ना काल रात्री?"
"काय रे, शेरासारखा परत आलास ना काल रात्री?"
दिपकने चेहरा वाकडा करत उत्तर दिलं,
"हो हो, अगदी शेरासारखा! पण तो शेर एका गायीला भूत समजून घाबरला असं म्हण."
"हो हो, अगदी शेरासारखा! पण तो शेर एका गायीला भूत समजून घाबरला असं म्हण."
"म्हणजे? मला समजले नाही?" एका मित्राने न समजून विचारले.
"भूतप्रेत असे काही नसते या गोष्टीवर माझा अजूनही तेवढाच विश्वास आहे; पण भुताटकीची कॉमेडीही होऊ शकते, हे काल पहिल्यांदा समजले." दीपक हसून आपल्या मित्रांकडे पाहून म्हणाला आणि रात्री घडलेला किस्सा आपल्या मित्रांना सांगितला.
त्याने सांगितलेल्या त्या भुताटकीवर सगळे मित्र अगदी खळखळून हसले.
समाप्त
©एकता माने
©एकता माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा