दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी आपले सगळे आवरून मंदिरात जात होती सोनाली तिला पाहिले.
" वहिनी, मी तुमच्यासोबत येऊ का ? " सोनलने समोर येऊन तिला विचारले.
" चल ना , तिकडचे वातावरण इतकं शांत आहे की तुलाही बरं वाटेल. " मीनाक्षी ने हसून उत्तर दिले.
त्या दोघीही मंदिराच्या दिशेने जाऊ लागल्या.
" वहिनी तुम्ही खरच खूप शांत आहात आणि समंजसही. मी काहीही बोललो तरी तुम्ही कधीच माझ्यावर रागवत नाही. " वाटेत सोनलने शांतपणे विचारले.
" ननंद ही तर बहीणच असते सोनल, फक्त वेगळ्या घरातली. खरंतर जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते ना तेव्हा तिला ननंद च्या रूपात जर एक जिवाभावाची मैत्रीण भेटली ना तर तिला सासर देखील माहेरसारखे वाटू लागेल. मी तुला पहिल्यापासूनच माझ्या लहान बहिणी प्रमाणे मानत आहे त्यामुळे मला कधी तुझा राग येत नाही." मीनाक्षी हसत म्हणाली.
त्या शब्दांनी सोनलचं मन विरघळलं. ती जी ‘मॉडर्न, शहरातली’ होती, ती आतून नकळत हळवी झाली.
त्या दिवसापासून सोनलचं मीनाक्षी सोबतच वागणं अगदी बदललं होतं दोघी जणू एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असल्यासारख्या वागू लागल्या जेव्हा ही गोष्ट सासूबाईंना जाणवली तेव्हा त्यांच्याही मनाला आनंद लाभला.
" आई खरंच! वहिनी म्हणजे माझी मोठी बहीण असल्यासारखी आहे. इतकी समजूतदार स्त्री मी कधीच पाहिले नाही. " सोनल नेहमीनाक्षीचा हात पकडून आपल्या आईकडे पहात सांगितले.
“हं, माझं नशीब भारी आहे मग! आज ही गोष्ट माझ्या बहिणीलाही समजली. ” विक्रांत हसून तिच्याकडे पाहत म्हणाला.
सगळे हसले. घरभर एक ऊब पसरली.
सोनल परत मुंबईला जाणार होती. स्टेशनवर सगळे आले होते. मीनाक्षीने डब्यात घरचं अन्न ठेवले, लाडू बांधले, आणि सोनलला दिले.
त्यानंतर पुढचे काही दिवस सोनल आणि मीनाक्षी आरती आनंदाने राहत होते. सोनल आपल्या सासरी देखील आपल्या वहिनीला सोबत घेऊन गेली. सगळ्यांना भेटवले सगळ्यांची आपल्या वहिनी सोबत नव्याने ओळख करून दिली. त्या दोघींची असलेली बाँडिंग पाहून सोनलच्या सासरकडच्यानाही खूप छान वाटले. एकमेकांसोबत हसत खेळत हे दोन हप्ते कसे निघून गेले कोणालाही समजले नाही.
"वहिनी , अग हे एवढं काय दिल आहेस तू ? " सोनल आश्चर्याने समोर असलेल्या बॅग कडे पाहून म्हणाली.
“अगं, तिकडे कामात व्यस्त असतेस. थोडं घरचं खा, माझं मन भरून येईल. मलाही बरं वाटेल. ” मीनाक्षी ने हसून उत्तर दिले.
" मी परत येईल लवकरच... पण यावेळी फक्त सुट्टी घालवायला म्हणून नाही तर माझ्या एका चांगल्या मैत्रिणी सोबत मनुष्यक्त वेळ घालवण्यासाठी. " सोनलने प्रेमाने मीनाक्षीला मिठी मारली आणि अगदी हळव्या स्वरात म्हणाली.
आपल्या लेकीला पुन्हा एकदा शहरात जाताना पाहून सासूबाईंच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ लागले. लग्न झालेल्या मुलीला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तिला तिच्या घरी जावेच लागते हा जगाचा नियम आहे.
ट्रेन सुटली पण यावेळी सोनलची नजर आपल्या आई वडील आपल्या भावा पेक्षा जास्त आपल्या बहिणीकडे पाहत होती.
‘नातं जिंकलं आज’. मीनाक्षीच्या मनामध्ये विचार आला आणि चेहऱ्यावर समाधानाच हसू.
काही महिन्यांनंतर...
एका दुपारी पोस्टमन आला. मीनाक्षीने पत्र घेतलं. सोनलकडून होतं.
> “प्रिय वहिनी,
तुम्ही मला ‘नणंद नाही, बहीण आहेस’ म्हणालात ना ते वाक्य माझ्या आयुष्याचं सत्य ठरलं.
मुंबईत आता मी लोकांना सांगते, माझी वहिनी नाही, माझी मोठी बहीण गावात राहते.
तुमच्या या साधेपणाने मला शिकवलं की नात्यांना दिखावा नको, फक्त प्रेम हवं.
तुम्ही मला ‘नणंद नाही, बहीण आहेस’ म्हणालात ना ते वाक्य माझ्या आयुष्याचं सत्य ठरलं.
मुंबईत आता मी लोकांना सांगते, माझी वहिनी नाही, माझी मोठी बहीण गावात राहते.
तुमच्या या साधेपणाने मला शिकवलं की नात्यांना दिखावा नको, फक्त प्रेम हवं.
तुमची सोनल.”
मीनाक्षीने पत्र सासूबाईंना दिलं. दोघींच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं.
तुळशीवृंदावनाजवळ उभं राहून मीनाक्षी म्हणाली,
“कधी कधी, नात्यांना नातं म्हणवून घ्यायचं असतं… आणि त्यासाठी फक्त एक चांगलं मन पुरेसं असतं.”
तुळशीवृंदावनाजवळ उभं राहून मीनाक्षी म्हणाली,
“कधी कधी, नात्यांना नातं म्हणवून घ्यायचं असतं… आणि त्यासाठी फक्त एक चांगलं मन पुरेसं असतं.”
“नणंद बाई येती घरा” हे केवळ एक वाक्य नाही, तर अनेक घरात उमलणाऱ्या, कधी नाजूक, कधी गोड, तर कधी गैरसमजांनी भरलेल्या नात्याचं प्रतीक आहे. खरंतर जेव्हा एक मुलगी लग्न करून तिचं माहेर सोडून सासरी जाते तेव्हा तिला सासरकडच्यांनी आपली मुलगी म्हणून पाहिले तर तिला देखील आपल्या सासरवाडीमध्येच वडिलांसारखे सासरे आईसारखी सासू भावासारखा अधीर आणि एक गोड अशा बहिणीसारखी नणंद भेटू शकते. फरक फक्त नजरेत आणि मनातल्या भावनांचा आहे.
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा