नणंद बाई येती घरा...
आंगणातल्या तुळशी वृंदावनाभोवती फिरत मीनाक्षीने हातातला ओला झाडू थांबवला. कानावर भलतीच ओळखीची गाडीची ध्वनी आली. गेटच्या बाहेर चकचकीत कार थांबली आणि ड्रायव्हरने दार उघडलं. मीनाक्षी आतुरतेने त्या गाडीकडे पाहत होती तेवढ्यात आतून उतरली सोनल. पांढऱ्या रंगाचा ड्रेस, डोळ्यावर काळे गॉगल्स, हातात महागडं बॅग “नणंद बाई येती घरा” हे शब्द मीनाक्षीच्या तोंडून आपसूकच निघाले.
तीन वर्षांनंतर सोनल माहेरी आली होती. लग्नानंतर ती थेट मुंबईला गेली होती. तिची सासू-सासरे हे गावातच राहत होते. तिथं माहेरही गावातच होते आणि सोनल तिकडे नवऱ्याबरोबर बँकेत अधिकारी म्हणून नोकरी करत होती. मागच्या तीन वर्षापासून ऑफिसमध्ये खूप काम असल्यामुळे तिला गावी काही येत आले नाही, पण यावे ते दोघेपण दोन आठवड्याचे सुट्टी घेऊन इकडे सगळ्यांना भेटण्यासाठी आले होते.
मीनाक्षीने थोडं लाजून पण हसतच अंगणात पाणी ओतलं. घरातल्या कामात होती ती, तरी सोनलला पाहताच थोडीशी गडबड झाली ‘काय बोलायचं, कसं वागायचं’ हे तिला ही पटकन सुचत नव्हते.
“अगं, सोनल आलीये! बघ, बघ मीनू!” आतून सासूबाई आनंदाने बाहेर धावत आल्या.
“अगं माझी लेक! एवढ्या दिवसांनी आलिस गं तू! हातपाय बघू दे, किती बारीक झालीस!” आईची माया लगेच बाहेर पडू लागली.
सोनलने लगेच प्रेमाने आपल्या आईला मिठी मारली आणि मीनाक्षी वर एक कटाक्ष टाकला. तो कटाक्ष मीनाक्षीच्या मनात अडकून राहिला.
दुपारचं जेवण तयार होतं. पोळ्या, भेंडीची भाजी, आमटी, पापड. मीनाक्षीने सगळं प्रेमाने वाढलं. सोनलच्या नजरेत मात्र शंकेचा एक हलका रंग होता.
“वहिनी, अजूनही तुम्ही पातेल्यामध्ये आमटी करताय? प्रेशर कुकरमध्ये करत नाही का?” सोनल ने थोड्या बोचक्या आवाजातच विचारलं.
“नाही गं, आईसासूला हीच आवडते. कुकरमध्ये चव जात नाही का?” मीनाक्षी हसत म्हणाली.
सोनलने हलकं हसून खांदे उडवले “मॉडर्न व्हा थोडं, टाईम वाचतो!”
सासूबाई म्हणाल्या, “अगं तिच्या हातची आमटी म्हणजे देव खाऊन जाईल एवढी चव असते! तू खाऊन बघ आधी.” सासुबाईंनी देखील आपल्या सुनेची स्तुती केली.
सोनलने आमटी तोंडात घेतली आणि काही बोलली नाही, पण चेहऱ्यावर प्रसन्न असा भाव दिसला. मीनाक्षीला तेवढंच पुरेसं वाटलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी स्वयंपाकघरात चहा करत होती. सोनल आपल्या बेडरूम मधून बाहेर आली आणि बाहेर हॉलमध्ये उभा राहूनच तिने आत असलेल्या मीनाक्षी कडे पाहिले.
" वहिनी ग्रीन टी आहे का ? "
“अगं नाही गं, आपण साधाच चहा घेतो.” मीनाक्षीने हसऱ्या स्वरात उत्तर दिले.
“अरे बापरे, अजूनही साधा चहा! हेल्थ कधी सांभाळणार तुम्ही गावाकडचे लोक?” सोनल कुचक्या आवाजात नाक मुरडत म्हणाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा