मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो.
आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे , नंतर देवधर्म करणे.
असतील शिते तर जमतील भुते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला , की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो.
अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या बुद्धिमान मानसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख , दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो,त्याचे मुळीच काम होत नाही.
अन्नछत्री जेवणे , वर मिरपूड मागणे – दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची , त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
अंगाला सुटली खाज,हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते.
अंगावरचे लेणे,जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे.
अंधारात केले पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे – नाव मोठे लक्षण खोटे.
अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला, की ती दु:खदायी ठरते.
अति परिचयात अवज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो.
आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात.
आपलेच दात आणि आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
आयत्या बिळावर नागोबा – एखाद्याने स्वत:करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
आपला हात जगन्नाथ – आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते.
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? – कोणत्याही गोष्टीला ठरावीक मर्यादा असते.
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती.
अति खाणे मसनात जाणे – अति खाणे नुकसानकारक असते .
अंथरूण पाहून पाय पसरावे – आपली ऐपत , वकूब पाहून वागावे.
अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – स्वत:च्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.
आपली पाठ आपणास दिसत नाही – स्वत:चे दोष स्वत:ला दिसत नाही.
आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे.
आत्याबाईला जर मिशा असत्या तर – नेहमी एखाद्या कामात जर-तर या शक्यतांचा विचार करणे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
आलिया भोगासी असावे सादर – तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
आधीच तारे , त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिति निर्माण होणे.
इच्छी परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
इन मिन साडेतीन – एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
उंदराला मांजर साक्ष – ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे.
उथवळा नवरा गुढग्याला बाशिंग – अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केल्यास चांगले पीक येते.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.
उधारीचे पोते , सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे – श्रीमंती आली की,तिच्या मागोमाग हाजी -हाजी करणारेही येतातच.
ऊसाच्या पोटी कापूस – सद्गुण माणसाच्या पोटी दुर्गणी संतती.
एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.
एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
एकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला – एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
ओळखीचा चोर जीवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
औटघटकेचे राज्ये – अल्पकाळ टिकणारी गोष्ट.
करावे तसे भरावे – जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
करून करून भागला , देवध्यानी लागला – भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे.
कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही.
कशात काय नि फाटक्यात पाय – वाइटात आणखी वाईट घडणे.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही.
काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती – क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढयापुरताच असतो.
कानात बुगडी, गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
काल मेला आणि आज पितर झाला – अतिशय उतावळेपणाची वृत्ती.
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
कानामागून आली अन् तिखट झाली – श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
कामापुरता मामा – आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
कावळा बसला अन् आणि फांदी तुटली – परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
काप गेले नि भोके राहिली – वैभव गेले अन् फक्त त्याच्या खुणा राहिल्या.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
काळ आला पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात – चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही.
कुडी तशी फोडी – देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
खऱ्याला मरण नाही – खरे कधीच लपत नाही.
खाण तशी माती – आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
खायला काळ भुईला भार – निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
खाऊन माजावे टाकून माजू नये – पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.
खोट्याच्या कपाळी गोटा – खोटेपणा , वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.
ग ची बाधा होणे – गर्व चढणे.
गरजेल तो पडल काय- केवळ बदबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही.
गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता – होता टळणे.
गाड्याबरोबर नळयाची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहनांचाही फायदा होणे .
घरोघरी मातीच्याच चुली – एखाद्या बाबतीत सामन्यात: सर्वत्र सारखीच परिस्थिति असणे.
घर ना दार देवळी बिऱ्हाड – शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती.
चोरावर मोर – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसातदेखील दोष असतो.
देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.
दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते.
दहा गेले , पाच उरले – आयुष्य कमी उरले.
नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे.
बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे.
बाप से बेटा सवाई .
अर्थ – वाडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार .
अर्थ – वाडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार .
पळसला पाने तीनच .
अर्थ – कोठेही गेले तरी परिस्थिति सामन्यात: सारखीच असते .
अर्थ – कोठेही गेले तरी परिस्थिति सामन्यात: सारखीच असते .
उंटावरचा शहाणा .
अर्थ – मूर्खासारखा सल्ला देणारा.
अर्थ – मूर्खासारखा सल्ला देणारा.
आवस भाऊचे मावस भाऊ, येरे कुत्र्या घाटा खाऊ -दूर दूर से नातलग बोलवून त्यांची सरबराई करणे.
सगळं आहे घरी पण कांता नाही बरी - आयुष्यात सर्व भौतिक सुख साधने असणे पण त्याचा उपभोग घेता न येणे.
सणी घुगऱ्या, अवदशी पुऱ्या - सणावाराला साधा स्वयंपाक करायचा, पण एरवी मात्र पंचपक्वान्न करून खायचे.
आला चेव तर केला देव, नाही तर बापा हर हर महादेव - मनाला वाटेल तेव्हा एखादं व्रत किंवा काम करणे इतर वेळी मात्र दुर्लक्ष करणे.
साप म्हणू नाही धाकला, नवरा म्हणू नये आपला - साप कितीही लहान असला तरी त्याला जवळ करू नये कारण तू कधीही डंख मारतो त्याचप्रमाणे नवरा ही आपल्याशी कधीही भांडू शकतो.
भट भटनीला मारी, तुरी विकल्या बाजारी - दोन गोष्टींचा कुठलाच परस्पर संबंध नसणे.
घरातले नाही आवडे अन बाहेरचे सावडे - कुटुंबातील, घरातील लोकांशी असलेल्या मतभेदाचा बाहेरचा लोक गैरफायदा घेतात.
काळी कमळजा घरात केरपुंजा - नाव मोठं लक्षण खोटं.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.