माझा होशील ना? भाग -76

माझा होशील ना
मागील भाग आपण पाहिलं कि सावनी ची आत्या तिच्या वावर उपचार करण्यासाठी म्हणूंन वाराणसी वरून मुंबई ला येते ..पण सावनी तेव्हा बेशुद्ध अवस्थेत असते ...विहंग हट्ट करून येतो तेव्हा त्याच्या मुळे तिला शुद्ध येते ...आता पाहूया पुढे .....,


आपल्याच आत्याला समोर पाहून ती थोडी आश्चर्य चकित झाली...... तिने त्याही अवस्थेत आत्याला विचारले.......

" आत्तू..... तु... तु... इथे कशी काय....? "


"अग सावू.....तुझी डिलिव्हरी मला करायची इच्छा मी दादाला बोलून दाखवली होती ना.... म्हणून दादाने मला बोलावून घेतलं..... आता ऐक आम्ही तुला भूल देतोय... बाळाचे हार्ट बीट्स कमी झाल्यामुळे तुझं सातव्या महिन्यात c सेकशन करावे लागतंय....तुझं बाळ लवकरच ह्या जगात येईल... तु तयार आहेस ना...?"

सावनी ने फक्त मान डोलावली......

थोडक्यात तिला असणाऱ्या परिस्थितीची कल्पना देऊन भूल दिली गेली...! तिला अर्ध सत्य आणि अर्ध असत्य बोलणे खूप गरजेचे होते.... आत्याने चांगल्या पद्धतीने ती परिस्थिती हॅन्डल केली आणि त्या पुढच्या कामाला लागल्या...

आत्या साठी मागच्याच प्रसंगा ची पुनरावृत्ती होती ती..!
फरक इतकाच होता की मागच्या वेळी सावनी कोमा मधे होती आणि यावेळी पूर्ण शुद्धीत..... पण तरी ही अजूनही ती पुन्हा कोमात जाण्याचा धोका होताच...!

त्यामुळेच तिला बाळाचे ठोके कमी होत आहेत इतकेच सांगून आत आणले गेले होते..! तसही तिला खरं सांगणे शक्य नव्हतंच...

पण भूल दिल्यावर ड्रॉप होणारे बीपी आणि कमी कमी होत जाणारे हार्ट बीट्स सर्वांचे च टेंशन वाढवत होते.
बाकी कोणताही विचार न करता देवाचे नाव घेऊन डॉ. गीतांजली नी एकेक लेअर ओपन करायला सुरवात केली....!

त्यांच्या मनात फक्त लवकरात लवकर बाळाला जन्म देऊन आपल्या भाची चा जीव वाचवायचा हेच चालू होते.
म्हणूनच त्या ऑपेरेशन करता करता एकीकडे देवाचा धावा देखील करत होत्या.....

त्यांच्या समोर असिस्टंट म्हणून डॉ. स्नेहा उभ्या होत्या..! त्या देखील अगदी सराईत पणे सगळं करत होत्या..त्या सुद्धा मनात देवाची प्रार्थना करत होत्याच.......पण त्याच वेळी त्यांच्या डोक्यात मात्र विचारांचे वादळ निर्माण झाले होते.....त्याना सुद्धा तिच्या सोबत काय काय घडलं होत ह्याची कल्पना दिली गेली होती....

गेले दीड दोन वर्ष त्या सावनी सोबत काम करत होत्या..! त्यावेळी तिच्या बाबतीत एवढे काही आधी घडून गेले असेल याची पुसटशी कल्पना देखील त्यांना आली नव्हती....

तिचे वागणे,  बोलणे, तिच्या कामाची पद्धत, तिचा ऑपरेशन करताना दिसणारा निष्णात डॉक्टरी स्वभाव..! हे त्यांनी या मधल्या काळात खूप जवळून पाहिले आणि अनुभवले देखील होते. आणि त्याच सोबत तिने ट्रीट केलेल्या पेशंट व त्यांच्या निरनिराळ्या स्वभावाच्या नातेवाईकांन सोबत असणारे तिचे वागणे त्यांना समजावून सांगणे हे देखील त्यांनी अनुभवले होते.... किती छान ती सगळं सांभाळत होती ना...त्या विचार करत होत्या....

नकळत पणे त्या डॉ. अजिंक्य आणि डॉक्टर सावनी व या दीड दोन वर्षात ठळकपणे लक्षात राहिलेले असे मुक्ता आणि  तृप्ती या दोन केसेस... मध्ये कुठेतरी साम्य शोधू लागल्या होत्या..!

तृप्ती उर्मट तसाच तिचा नवरा देखील काळजी असूनही निष्काळजी..! सातव्या महिन्यात आपल्या बायकोची काळजी घेणे, होणाऱ्या बाळा साठी वेळ देणे हे सगळं दूर ठेऊन एक अपघात म्हणून ती दोघेही त्या बाळाकडे पाहत होती..! बाळ जन्माला आले म्हणजे आपण मोकळे असा दृष्टिकोन ठेवून विचार करत होती तृप्ती......
म्हणजे मुल मिळून देखील त्याची कदर नव्हती.

तर दुसरी कडे मुक्ता बाई....... मुलगा होणे ही आपल्या एकटी ची जबाबदारी मानून नवरा करेल त्या जुलूम जबरदस्तीला आयुष्य मानून जगली...!

लेकराची आस त्याची कदर असूनही ते उपभोगू शकली नाही.
आणि अखेर मुलगा जन्माला घालून जीव मात्र गमावून बसली...!

आणि ह्या सगळ्यात.......सावनी.... ती .. तरी काय वेगळी आहे बर ..?

सुंदर, त्यात डॉक्टर तरीही उपेक्षित...... राहिली...... ज्याच्यावर मनापासून प्रेम केल..... त्याच च बाळ पोटात...... तरी देखील प्रेग्नंट असल्याची गोड बातमी देखील तिला अनुभवता आली नाही हवी तशी..!


तिच्या नवऱ्याने स्वतः एक उत्तम डॉक्टर असून देखील तिचे गर्भारपण ही नाईलाज म्हणून स्विकारलेली परिस्थिती...! त्याने मनापासून त्या बाळाला कधीच स्वीकारले नव्हते..... आणि विहंग हा तिचाच मुलगा असून ही तिच्यावर सावत्र पनाचा शिक्का.....!!!!


त्याच सतत तिच्या पासून लांब राहणे..... आणि त्याला नकोसे असलेले बाळ आपल्या सासू सासऱ्या च्या आधाराने वाढवून, तिने सतत हसतमुखाने रहायचा केलेला प्रयत्न देखील मध्ये मध्ये असफळ झाली....

म्हणजे पहा ना इच्छा आहे,  कदर आहे, पण आनंद तर तिला ही नाहीच, का बर असे?
सगळे दुःख, ताण, सगळ्या चिंता हे सारे फक्त स्त्री नेच का सहन करायचे? सगळं करून सावरून पुरुष मात्र नामा निराळे राहतात....

बिचारी सावनी या गरोदरपणात काय काय भोगत होती..... देवास ठाऊक....!!!!! मुलाचे आजारपण, नवरा सतत त्याच चिंतेत..! आधीच्या बायकोला तो विसरता विसरत नाही.......पण तरीही तिच्यावर आसक्त, सतत तिच्या कडून मानसिक आधारा ची अपेक्षा ठेवणारा, पण तिला गरजेचे वाटत असताना मात्र सारे माहित असूनही त्रयस्थ राहणारा...? आणि काही वेगळं घडलं कि तिलाच दोष देणारा....... "


विचार, विचार... विचार काही केल्या संपत नव्हते..! आणि त्याच विचारात.......एका क्षणी ट्याहॅ....ट्याहॅ ट्याहॅ  चा अगदी नाजुक स्वर कानावर पडला आणि डॉक्टर स्नेहा भानावर आल्या..!

सावनी ने एका गोड गोंडस मुलीला जन्म दिला होता....

कमी दिवस भरल्यामुळे त्या बाळा ला बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या हवाली करण्यात आले..! सात महिन्याचे ते नाजूक बालक...! आवाज अत्यंत क्षीण.. पण हात पाय मात्र चांगलेच हलवत होते..! आणि त्याच्या लुकलुकत्या डोळ्यांनी जग पहायचा प्रयत्न करत होते..!

दोन मिनिट भर डॉक्टर गीतांजली आणि डॉक्टर स्नेहा दोघीही त्या बाळा मध्ये हरवल्या... किती तरी गोड दिसत होते ते..... पण तो मोहचा क्षण त्याना आवरावा लागला...... कारण बाळाने परत एकदा एक ट्याहो फोडून त्या दोघीना भानावर आणले....

आणि पुढच्याच क्षणी... डॉक्टर गीतांजली च लक्ष सावनी कडे गेलं...... आणि ..त्या जीवानिशी ओरडल्या.......

"सावनी......... सावू..... प्लीज....
. प्लीज....... Don't close your eyes......... डॉ. स्नेहा.........प्लीज चेक....... चेक करा तिला...........मी पोटाच्या लेयर पटापट क्लोज करत आहे पण श्वास मंदावतो आहे...!
प्लीज काहीतरी करा...!..... काहीतरी करा...... कुणाला तरी बोलवा...... डॉक्टर सतीश आवाज द्या त्याना...... घाई करा..... "

त्या डोळ्यात पाणी आणून रडत ओरडून अक्षरशः बोलत होत्या...... आणि एकीकडे त्यांनी लेयर क्लोज्ड करत होत्या......

त्यांचा आवाज ऐकून डॉक्टर सतीश पटकन आत मध्ये आले..... त्यांना थोडीफार कल्पना होतीच असं काहीतरी होईल........ तस पटकन पुढे होत...... त्यांनी पटापट काही इंजेक्शन तिला सलाईन वाटे देत राहिले..... पण...... पण....... डॉक्टर गीतांजली ह्यांनी तिचे पोट क्लोज केले....... त्यानंतर त्यांनी पोटा वरून क्लीन देखील केल...... एवढं सगळं झाल्यावर त्यांनी त्यावर स्टिकिंग करून झाले तरी परिस्थितीत बदल दिसत नव्हता...! सावनी काही केल्या रिस्पॉन्ड करत नव्हती......


सावनी वाचेल ना???????
Kramash

🎭 Series Post

View all