माझा होशील ना? भाग -79

सावनीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की सावनी नसण्याची कल्पना कुणालाच करवत नव्हती.... सगळ्यांनाच तिच्या सोबतच्या गोष्टी आठवत होत्या..... आता पाहूया पुढे......



एव्हाना प्रत्येक जण आपापल्या मनोवस्थेला पोहोचला होता...काय करावे कुणालाच समजत नव्हते.....

. कुणीच तिथे नाही हे पाहून विहंग देखील पटकन आत आला.... सगळ्यांना रडताना पाहून त्याला काहीच समजत नव्हतं...... पण त्याच्या मम्मा ने त्याला बहीण दिले आणि मला माझ्या सावनी मम्मा ला आता थँक्स म्हणायचं आहे...... असा विचार करून तो त्यांच्या छकुलीला घेऊन एका नर्स सोबत आत आला....... आणि त्याच्या मागून ते नवजात रडते बाळ घेऊन सिस्टर देखील आत आल्या......त्या आता पर्यंत सावनी च्या बाबतीत आत काय घडले यासाठी संपूर्ण अनभिज्ञ होत्या...! त्यांना कल्पनाच नव्हती काय झालंय त्याची.....पण सगळे रडत असल्यामुळे त्या तिथेच थांबल्या आणि आजूबाजूला पाहू लागल्या.....

सगळी कडे शांतता पसरली असताना त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला ते खूप रडत होत.......आणि अचानक डॉक्टर स्नेहा च्या लक्ष परत एकदा सावनी कडे गेलं...... तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सावनी च्या हाताची बोटे हालत आहेत...!

आधी त्यांना तो आपल्याला भास होतो आहे असेच वाटले होते.....पण बाळाचे रडणे जसे जसे वाढले तसे तसे मॉनिटर वर हालचाल सुरु झाली.. हार्ट बीट.. वर खाली ग्राफ आरेखन सुरू झाले..! आणि त्यांनी खूप खुश होऊन विलंब क्षणात डॉ. सतीश ना ते दाखवले...!

हाडाचा डॉक्टर.. आपल्या भावना गुंडाळून लगोलग कर्तव्य कठोर झाला...! एकीकडे आपल्याला झालेला आनंद लपवून त्यांनी अजिंक्य सहित सर्वाना बाहेर पाठवून दिले....... फक्त तिथे डॉक्टर गीतांजली आणि डॉक्टर स्नेहा राहिल्या...... डॉक्टर स्नेहा त्यांना हेल्प करत होत्या..... तर डॉक्टर गीतांजली ह्यांनी सावनी ची छकुली आपल्या कडे घेतली होती..... कारण सावनी आपल्या मुलीच्या रडण्याला रिस्पॉन्स देत होती........

डॉक्टर सतीश ह्यांनी ताबडतोबीने काही इंजेक्शन देऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले...!
काही मिनिटांसाठी बंद झालेला श्वास पुन्हा सुरू झाला...!
लगेच त्यांनी तिचे पल्स आणि हार्ट रेट चेक केला.... तो जरी वर खाली होता तरी सुद्धा सुरु होता हे महत्वाचे.....!!!!


" पुन्हा एकदा आईपण... मातृत्व जिंकले...... "


साधारण पणे पुढच्या दोन तीन तासात सावनी नॉर्मल होत असल्याचे त्यांना दिसून आले.... तस त्यांच्या तिघांच्या ही जीवात जीव आला.....

आधीच्या वेळी विहंग तर आता हे नवजात बालक......!

आजच्या पूर्ण दिवसात या दोन्ही बालकांच्या आर्त हाक आणि रडण्याने एक आई मरणाच्या दारात उभी राहून काही काळ थांबून देखील पुन्हा एकदा एकवार आपले आई पण निभावण्यासाठी खेचून परत आणली गेली होती.......


आणि आता देव पण तिला तिच्या मुलांपासून तोडू शकणार नव्हता....

डॉ. अजिंक्य च्या मनातील पुन्हा एकदा आपल्या एकटेपणाची भावना संपुष्टात आली होती.... त्याच्यातला मी पणा सुद्धा गेला होता....

आणि आता कुणाच्याही मनात किंतु परंतु नव्हतं......सगळी नाती सगळे बंध पुनश्च एकवार एका घट्ट बंधनात बांधले जाऊन अजून दृढ झाले होते.

पण या वेळी मात्र कधीही पुन्हा न तुटण्यासाठी .

आता सगळेच जण सावनी च्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते....तिचे हार्ट बीट्स नॉर्मल झाल्यानंतर अजून एका तासात ती शुद्धीवर आली......


तोपर्यंत अजिंक्य ने सगळ्यांना जबरदस्ती ने कॉफी प्यायला लावली होती आणि स्वतः सावनी चा हात हातात घेऊन तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता....


सावनी शुद्धीवर आली तेव्हा तिला अजिंक्य तिच्या हातावर डोकं टेकून झोपलेला दिसला..... तिने त्याला आवाज दिला.....,

" अजिंक्य....... "

तिचा आवाज ऐकून तो खूप खूष झाला.....

" सावू.... कशी आहेस ग..... कस वाटतंय तुला....मी..... आम्ही किती घाबरलो होतो....."

तो तिच्या हाताला किस करत म्हणाला....

" मी.... मी... ठीक आहे.... माझं बाळ..... "

तिच्यात अशक्तपणा असल्यामुळे तिच्या आवाजात थोडी थरथर जाणवत होती.....

" आपलं.... आपल बाळ सावू.... थँक्स यू सो मच..... एवढी गोड गोंडस मुलगी दिलीस मला..... आणि मी तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी सॉरी....."

असं म्हणून तो उठला आणि तिच्या कपाळावर त्याने माथा टेकवला......

" आपलं..... आपल बाळ....... ऐकताना मस्त वाटा... तय...... अजिंक्य...... मुलगी झाली आपल्याला.....? "

सावनी त्याला म्हणाली....

"हो..... खूप गोड आहे ती अगदी तुझ्यासारखी......."

अजिंक्य सावनी ला म्हणाला.....

" हो..... मग मला बघायचं आहे तिला....."

त्याच ऐकून तिला खूप आनंद झाला.....

"सावू....हे बघ.......दिवस कमी भरलेत ना म्हणून तिला काच पेटीत ठेवलं आहे..... पण फीडिंग साठी आणणार तिला..... तु लवकर बरी हो... आणि आपल्या घरी चला...... लवकर.....दोघीही "

अजिंक्य खूप समजूतदार पणे बोलत होता.....

"ठीक आहे.... अजिंक्य... विहंग आलाय का इथे बोलाव ना...... "

सावनी ला विहंग ची आठवण झाली तस तिने विचारलं....

" आलाय विहू..... तो सुद्धा खूप रडत होता.... तुला माहित आहे सावू.... तु बेशुद्ध होतीस तेव्हा त्याच्याच आवाजाने तु शुद्धीवर आलीस...... मला खरंच माफ कर ग मला तुम्हा दोघांमध्ये असणारा बॉण्ड समजला आहे..... "


त्याला खूप इच्छा झालेली विहंग त्यांचा दोघांचा मुलगा आहे हे सांगण्याची पण तिची सिटूएशन पाहता....हळू हळू ती बरी झाली की सगळं सांगू असा विचार त्याने केला......

" हा मग असणारच ना बॉण्ड..... बोलावतोस ना त्याला....?. "

सावनी ने त्याला परत विचारले.....

" हो बोलावतो पण आधी तु खाऊन घे बर...... "

असं म्हणून तो उठला आणि शकुंतला बाई नी तिच्यासाठी मऊसूत बनवलेली खिचडी आणली होती.... ती त्याने एका प्लेट मध्ये घेतली.... आणि ती घेऊन तो तिच्या जवळ गेला.....स्पून मध्ये घेऊन मस्त फुंकर मारून त्याने तो चमचा तिच्या तोंडा जवळ नेला आणि तिला भरवलं....... खाता खाता तिच्या डोळ्यात पाणी आलं..... ते पाहून अजिंक्य ला वाटल तिला तिखट लागलं असावं.... तो पटकन उठला आणि पाण्याचा ग्लास घेऊन आला.....आणि तिला पाणी देत म्हणाला.....,

"हे घे......पाणी पी..... तिखट लागलं असेल ना....?"


सावनी ला त्याने तिची केलेली काळजी पाहून खूप छान वाटत होत.... आणि म्हणूनच तिच्या डोळ्यात पाणी आलं होत...... ती नेहमी त्याला सांगायची माझा होशील ना?
पण आज खऱ्या अर्थाने तो तिचा झाला होता..... आणि हेच तिला हवं होत....

तिने पाणी पिलं आणि त्याला म्हणाली.....,
.

"थँक्स यू... अजिंक्य....."

" वेडू.... अग थँक्स टू यू..... तुझ्या मुळे मला क्युट मुलं मिळाली......चला आता सगळ फिनिश करा बर...... "

असं म्हणून तो तिला भरवू लागला.....

त्याच्या कडे कौतुकाने पाहून ती सुद्धा तो भरवत होता आणि ती खात होती.......


चला....., सावनी तर आता ठीक होईल......
अजिंक्य ही ठीक झाला आहे......
तिची काळजी करतो, तिच्याशी चांगलं वागतो.....
त्यात त्याला त्याची चुकी कळली आहे...
आता विहंग ठीक होईल ना?
आणि ती छकुली कधी भेटेल सावनी ला......??


🎭 Series Post

View all