Login

गाव माझे आहे पंढरपूर

माझ्या पंढरपूरवर कविता

गाव माझे आहे पंढरपूर
ओळख असे विठोबाची पंढरी
नित्य दर्शनास येतात येथे
बारामाही भक्तजण वारकरी

माझ्या पंढरीत चंद्रभागा
नदी सदा खळखळ वाहे
भक्त पुंडलिकाचे मंदिर
तिच्या पाण्यात उभा आहे

आषाढी-कार्तिकी एकादशीला
भरे लाखो वारक-यांची जत्रा
दिंड्या, पालखी, पताका याने
गजबजून जाई पंढरीची यात्रा

श्री विठ्ठलाचे पंढरपूर म्हणून
महाराष्ट्रात प्रसिद्ध माझे गाव
प्रत्येकाच्या ओठी आणि मनी
असे मायमाऊली विठूचे नाव

सुंदर आहेत कैक मठ
कैकाडी, गजानन महाराज
वृंदावन बागेने सजली
पंढरपूर गावची साज

प्रसिद्ध आहे माझ्या पंढरीची
बाजार आमटी आणि खवा
एकदा तरी आमच्या या
पंढरपूरला भेटून तर जावा