Login

DINK भाग 3

Story Of A Women Who Don't Want To Born Baby
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 3

लॅपटॉप व्यवस्थित बंद करून त्याने पिहूकडे बघितले.

"मिस पिहू जोशी?" तो बोलला.

"हो, आपण?" तिहुनी निरखून पाहत विचारले.

"मी तेजस लिमये. आपण सहा सात महिन्यांआधी दिल्लीला एका बिझनेस कॉन्फरन्स मध्ये भेटलो होतो." तो उत्तरला.

"अच्छा!" तो तिला चिपकु वाटला म्हणून जास्त काही न बोलता ती विमानाच्या खिडकीतून बाहेर ढगाना पाहू लागली. ती दुर्लक्ष करतेय हे लक्षात घेऊन तोही डायरी काढून त्यात काही नोंदी करू लागला. एअर होस्टेस ने पिहूला कॉफी आणून दिली. कॉफीचा सीट घेत पिहूच्या मनात आले,
" आताच्या काळात कोण असं डायरीत लिहितो बरं. हा माझे अटेंशन घेण्यासाठी असे करतोय का? जाऊदे. आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी. " या विचारातच तिची कॉफी पिऊन झाली. एक तास सहज निघून गेला. विमान मुंबईला लँडिंग होऊन खाली आले. पिहूला घ्यायला आलेली गाडी ट्राफिक मध्ये अडकली. एअरपोर्टवर बातमीच्या शोधात असलेल्या एका पत्रकाराच्या नजरेत पिहू आली. तसा तो त्याच्या कॅमेरामॅन ला घेऊन तिच्या जवळ आला व बोलू लागला,

"हाय पब्लिक, मी उमेश आणि माझ्यासमोर उभी आहे मिस पिहू ज्यांनी एका लहान लेकराला त्यांची सीट द्यायला नकार दिला होता. त्यांना त्यांचे सीट एका छोट्याशा मुलीच्या जीवाच्या आकांताने रडण्यापेक्षा जास्त प्रिय वाटली."

" हे हे, कोण आहात तुम्ही? काय बडबड करत आहात ? " पिहूने त्याला विचारले.

इतक्यातच इतर पापाराझीना सुद्धा पिहू बद्दल समजलं व त्यांनी तिच्या भोवती घोळका घालून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली,

"मिस पिहू मागील दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर खूप झळकत आहात. हे सर्व ठरवून केलं होतं का?"

"तुम्ही स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची समस्या का नाही समजून घेतली?"

" तुम्हाला त्या लहान मुलीची दया नाही आली. "

" तुमचे लग्न झाले आहे का? तुम्हाला मुलं आहेत की नाही? "

" आपल्या मुलांसोबतही तुम्ही अशाच वागता का? "

पिहू घाबरली नाही मात्र इतक्या माणसांना एकासोबत तिच्या अवतीभवती जमलेल्या पाहून तिचा जीव गुदमरून आला. ती तिथेच शुद्ध हरपून पडणार तोच तेजस तिच्या मदतीला धावून आला,

"ही काय पद्धत आहे?" तो त्या पत्रकारांवर ओरडला, "माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही तुमच्यात? "

" जशास तसे त्यांच्यात तरी माणुसकी आहे का? " एक पत्रकार बोलला.

" ती गुन्हेगार आहे हे ठरवणारे तुम्ही कोण? " त्याने पुन्हा विचारणा केली.

" व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते तसे. " पत्रकार उत्तरला.

"तरीही एका स्त्रीला तुम्ही असे घेरू शकत नाही." तेजस ठामपणे बोलला. तो पिहूच्या दोन्ही खांद्यांना पकडून तिला आधार देत तिथून घेऊन जाऊ लागला तसे पिऊ नये त्याला थांबण्याचा इशारा केला,

"आज संध्याकाळी पाच वाजता बांद्रा कुर्ला बिल्डिंगच्या कस्तुरी मीडिया ऑफिसमध्ये या. तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळेल."

"ओके मॅम, धन्यवाद. चला संध्याकाळी भेटु " गर्दी पांगली.

"तु ठीक आहेस?" तेजसने तिला विचारलं.

"हो." अजूनही तिच्या खांद्या भोवती असलेल्या त्याच्या हातांना पाहत पिहू उत्तरली. त्याच्या ते लक्षात आले तरीही त्याने त्याचे हात बाजूला केले नाही.

"मी तुला ड्रॉप करून देतो." तो बोलला.

"मिस्टर तेजस प्लीज इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नका.  मला स्वतःला सांभाळता येतं. माझ्यासाठी बोललात त्याबद्दल धन्यवाद." पिहू त्याला म्हणाली तसे त्याने तिच्या खांद्यावरिल हात बाजूला केले व तो त्याच्या गाडीत बसला. मागोमाग पिहूची गाडीही आली. तिला लवकरात लवकर फ्रेश होऊन दुपारी एक वाजता कस्तुरीच्या मुंबई ब्रांचमध्ये एका नवीन जाहिरातीचा कॉन्ट्रॅक्ट संदर्भात क्लाईंट कडून करार सही करून घ्यायचा होता. ती सर्व आटोपून बरोबर 12:45 ला बांद्रा कुर्ला स्थित ऑफिसला पोहोचली. आतापर्यंत तिच्या असिस्टंटने मीटिंगची सर्व तयारी करून ठेवली होती.

"मॅम, तो माणुस खूप तेढा आहे." तिची असिस्टंट गार्गी तिला सांगू लागली, "नुसता फिरवतोय. आपणही सरळ सरळ त्याच्याशी बोलू शकत नाही आहे. आपले नाव खराब होऊ शकते.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"