कथेचे नाव : रसिका
विषय : कौटुंबिक कथामालिका
फेरी : राज्यस्तरीय करंडक कथामालिका
भाग : ३
पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेले,दुय्यम स्थान च स्त्रीचे सामर्थ्य होते इतके दिवस.....
पण म्हनतात ना सामर्थ्य वाणा लाही कधीकधी सहानुभूतीची गरज असते. आयुष्या मध्ये विविधरंगी परिस्थितीतून जाताना सामर्थ्यवान ही कधी कधी हतबल होऊन जातात.अन् मग नवीनच परीक्षा सुरू होते .
परीक्षा स्वअस्ती त्वाची,स्वाभिमानची .....!!
एखाद्या बावनकशी सोन्याच्या अलांकराला ही खुप जास्त उपयोगात आणले,तर त्याची तकाकी,सोनेरी तेज,हळूहळू ओसरल्या गत होते.आणि मग पुन्हा एकदा या सोन्याच्या अलंकरा ला त्याची स्वतःची मुल्यता असूनही,त्याचे मोल दिवसेंदिवस वूर्दिंगत होत असूनही, प्रखर ज्वालेच्या अग्निमध्ये तप्त होऊन अजून जास्त निखरावेच लागते.आणि मग हा जुनाच असलेला सोन्याचा अलंकार किती सुंदर,किती तरी नवीनच दिसायला लागतो......
रसीकाचे जीवन ही असेच काहीतरी जुन्या सोन्याच्या अलंकारा प्रमाणे मळकट होत चालले आहे की काय असे तिला वाटू लागले होते.
रसिकाला तिसरा मुलगा झाल्याने घरातील कलुशित वातावरण बदलेल,आणि लग्नाच्या वेळी जसे सर्व काही आनंदात दिसत होते,तेच खेळीमेळीचे वातावरण पुन्हा येईल असेही तिला वाटत होते.त्यामुळे रवी,आणि रवीच्या घरच्यांसोबत रसिकाही खुप च सुखवल्यासारखी झाली होती.पण.....
.....पण झाले नेमके विपरीत च ,रवी आता त्याला तिसरा मुलगा झाल्याने गर्वाने अधिकच दारू पिऊ लागला होता.त्याचा अहंकार त्याला मिळणाऱ्या पैशा सारखा ,वाढतच चालला होता. लग्ना नंतर चे चार पाच वर्षे अपमानास्पद फिल करणारा रवी आता वंशाला दिवा मिळाला म्हणून,खोट्या स्वार्थाच्या,खोट्या पुरुषार्थ च्या भ्रामक अहंकाराने पिडीत होत चालला होता.त्याचा हा बदलत चाललेला विकृत स्वभाव मात्र रसिकाच्या सहन शक्तीला ललकार त होता.
परिवाराला वंशाचा दिवा मिळाला म्हणून सगळे त्या नवीन बाळाच्या कोड कौतुकात वाहवत चालले होते.त्याच्या बाललीला पाहून रसिका आणि तिच्या छोट्या मुलीही त्या आनंदात सामील होतच होत्या.
पण जस जसे बाळ मोठे होऊ लागले.रसिकाला रवी आणि त्याच्या घरच्यांचे वागणे बदलल्याचे प्रकर्षाने दिसू लागले.प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी त मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुली म्हणजे परक्या घरी जाणाऱ्या ,असा भेदभाव स्पष्ट जाणवू लागला."" तुम्ही थांबा ,आधी त्याला त्याला द्या ."" अशी धारणा जणू काय एखाद्या नियमा प्रमाणे पाळली जाऊ लागली.
रसिका अनाथ आश्रम मधून आल्या मुळे तिचे असल्या प्रकारचे भेदभाव होताना तिला इतके जवळून कधी बघायला मिळाले नव्हते.तिच्या हुशारीचे,बुद्धिमत्तेचे,विश्वस्तांनी नेहमी कौतुकच केले होते.तीच्यातले गुण वैशिष्ट्ये ओळखून तिला प्रोत्साहित च केले होते.तिला तिच्या शिक्षणाचे सगळे मार्ग मोकळे करून दिले होते.
आणि हेच आदर्शाचे संस्कार तिच्या मनावरही कोरले गेले होते.तिच्या मुलींच्या शिक्षणा बद्दल चे स्वप्न ती मनातल्या मनात बघत च होती. आपल्या सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे शिकावे आणि त्यांचे करिअर उज्वल असावे असे तिला वाटत होते.
त्याप्रमाणे पावले उचलण्यास तिने सुर्वात केली आणि तिथेच मोठ्ठा धक्का तिला बसला.
खुप छान नामांकित मोठ्या शाळेत सर्व मुलांना शिकण्याची काही गरज नाही.एव्हढा जास्त खर्च मुलींवर करण्याची गरज नाही.कितीही शिकल्या कितीही कमवले ,तरी ते शेवटी परक्याचे धन होणार.त्यामुळे मात्र फक्त शिक्षित करण्याचे दृष्टिकोनातून सध्याष्या शाळेत दाखले करावेत असे रवी आणि त्याच्या घरच्यांचे म्हणणे होते.आणि मग याच मुद्यावरून रसिकाला तिच्या मुली साठी काहीतरी अनपेक्षित ,विपरीत अंदाज येऊ लागले......
रसिका आधी पासूनच निर्धारि,कुशाग्र बुद्धी ची असल्याने भविष्यात येणाऱ्या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यातून कसा मार्ग काढता येईल ,या बद्दल विचार करण्यास सुरुवात केली.
लहानपण देगा देवा,अशी किती सुदंर म्हण प्रचलित आहे.बालपण हे किती निरागस असते.निरागस मन हे मुलीचे असो व मुलाचे निरागस ते मध्ये जर काही फरक नसतो ,तर घरातील वडीलधाऱ्या माणसानी त्यांच्यात भेदभाव करू नये.
उर्वरित कथा भाग : ४ मध्ये
©®Sush
पुणे जिल्हा.