स्वयंंम च्या घरी जाऊन ती आपल्या घरात घडलेली सगळी गोष्ट त्याला सांगू लागते... स्वयम तिचा ऐकून तिच्यासोबत येऊन श्रद्धाच्या वडिलांना भेटतो.... तिचे वडील रागाने त्यांच्या दोघांच्याही नात्याला नकार देतात... श्रद्धा आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन स्वयंम सोबत आपले घर सोडून निघून जाते.... तिचे वडीलही रागात असल्यामुळे तिला अडवत नाही.....
आता पुढे,
स्वयम तिकडून श्रद्धाला घेऊन आपल्या घरी निघून जातो.... अशा सिच्युएशन मध्ये त्याला स्वतःलाही काही सुचत नसते त्यामुळे तो आपल्या बेस्ट फ्रेंड ला म्हणजे चिन्मयला फोन करून घरी बोलावून घेतो.... मागच्या पाच सहा वर्षांपासून जेव्हापासून स्वयम तिकडे राहायला आलेला असतो, तेव्हापासूनच त्याची आणि चिन्मयची छान दोस्ती जमलेली असते... तो चिन्मयला आपला सगळ्यात चांगला मित्र मानत असतो....
स्वयम तिकडून श्रद्धाला घेऊन आपल्या घरी निघून जातो.... अशा सिच्युएशन मध्ये त्याला स्वतःलाही काही सुचत नसते त्यामुळे तो आपल्या बेस्ट फ्रेंड ला म्हणजे चिन्मयला फोन करून घरी बोलावून घेतो.... मागच्या पाच सहा वर्षांपासून जेव्हापासून स्वयम तिकडे राहायला आलेला असतो, तेव्हापासूनच त्याची आणि चिन्मयची छान दोस्ती जमलेली असते... तो चिन्मयला आपला सगळ्यात चांगला मित्र मानत असतो....
या जगात चिन्मय हा एकच त्याच्या जवळचा आणि चांगला मित्र असतो... त्याने श्रद्धा बद्दलही त्याला आधीच सांगून ठेवलेले असते....
" मी काय म्हणतो, आता तसही श्रद्धा वहिनीच्या घरी सगळे समजले आहे आणि त्या घर सोडूनही आले आहेत.... मग आता थांबायचं कशाला, आता आपण कोर्टामध्ये जाऊन लग्न करू.... " चिन्मय त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगतो....
" तुझं बोलणं बरोबर आहे रे, पण कोर्टामध्ये पण आपल्याला एक महिना आधीच तारीख घ्यावी लागते ना, मग तोपर्यंत काय ? " स्वयं एक नजर श्रद्धा कडे पाहून चिन्मयला विचारतो....
" सिम्पल आहे तोपर्यंत ती आमच्या घरी राहील.... जेव्हा तुमचं लग्न होईल ना तेव्हा ती तुझ्यासोबत तुझ्या घरी राहायला येईल.... तोपर्यंत ही आमची पाहुणी आहे..... " चिन्मय श्रद्धा कडे पाहून हसतमुखाने बोलू लागतो.... त्याचं बोलणं ऐकून सुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते... स्वयम बोलण्याचा विचार करू लागतो....
" तुझा ठीक आहे रे, पण तुझ्या बायकोला म्हणजेच मायाला ही गोष्ट आवडेल का ? " मायाचा पहिल्यापासूनच जरा कुचका स्वभाव असतो त्यामुळे स्वयंम स्वतः सुद्धा कधी चिन्मयच्या घरी जात नसतो, चिन्मय त्याला भेटायचं निमित्ताने त्याच्या घरी येऊन थांबत असतो.....
" त्याचं टेन्शन नको घेऊ.... इतकी वर्ष तिच्या सोबत संसार करून मला तिला कसं मनवायचं ही गोष्ट तर चांगली समजली आहे आणि प्रश्न फक्त काही दिवसांचा आहे ना, तेवढ्यासाठी ती नकार देणार नाही..... " चिन्मय आपल्या बोलण्याने त्या दोघांनाही धीर देण्याचे काम करतो.....
" चिन्मय खरंच यार तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहे... आज वेळेला तुझीच मदत झाली बघ... " स्वयम आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने बोलतो.....
" आता तू काय मित्राचे पण उपकार मानणार आहेस का ? त्यापेक्षा लग्नाच्या तयारीला लागा.... आपण आता लगेच जाऊन कोर्टामध्ये तुमच्या दोघांच्या लग्नाची तारीख घेऊन येऊ.... तोपर्यंत श्रद्धा वहिनी या घरात आराम करतील, मग आपण आल्यावर तिला मी माझ्या घरी घेऊन जातो.... तोपर्यंत त्यांना मनसोक्त आपलं घर तर बघून घेऊ दे..... " चिन्मय तिच्याकडे बघून बोलतो, तशी ती पण त्या दोघांकडे बघून होकार देते....
चिन्मय आणि स्वयम दोघेपण घरातून स्वयंच गाडीवर बाहेर निघून जातात....ते सगळ्यात आधी कोर्टात जाऊन त्यांच्या लग्नासाठी डेट कन्फर्म करून येतात.... त्यानंतर बाहेरूनच त्यांच्यासाठी काही जेवण घेऊन येतात.... स्वयम घरात येऊन पाहतो तर श्रद्धा त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन शांत झोपलेली असते..... तिला शांत झोपलेले पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीच स्माईल पसरते....
स्वयम श्रद्धा जवळ जाऊन तिला प्रेमाने उठवतो, तशी ती उठून बसते.... एकत्र जेवण करतात त्यानंतर चिन्मय श्रद्धाला घेऊन त्याच्या घरी जातो..... त्याच्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करतो... त्याच्या बायकोला श्रद्धा ने तिच्या घरी आलेले आवडत तर नाही तरीही ती काही न बोलता तयार होते....
चिन्मय आणि त्याची बायको माया या दोघांचेही पहिल्यापासून जास्त पटत नसते.... माया त्याच्यावर जास्तच रोब दाखवण्याचा प्रयत्न करत असते.... ती आपल्या मनाप्रमाणे वागत असते... चिन्मय मात्र कितीही राग आला तरी, आपला संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करत सगळं सांभाळून घेत असतो..... चिन्मयला घरातले सगळे काम करताना पाहून श्रद्धा शतदा त्याला कामांमध्ये मदत करू लागते..... हळूहळू दिवस पुढे जात असतात आणि त्यांच्या लग्नाची तारीख येते.....
स्वयम आणि श्रद्धा च्या लग्नाची साक्षीदार म्हणून स्वयंम च्या बाजूने चिन्मय आणि त्याचा अजून एक मित्र तर श्रद्धा च्या बाजूने तिच्या दोन मैत्रिणी सिग्नेचर करतात.... फायनली त्यांचे कोर्ट मॅरेज होते.... त्यानंतर ते त्यांच्या घराजवळच सगळ्यांसाठी छोटीशी पार्टी देतात.... आज पासून ते नवरा बायको झालेले असतात.....
आजची रात्र त्यांच्यासाठी स्पेशल होण्यासाठी चिन्मय आणि त्याच्या मित्राने मिळून त्यांची बेडरूम छान फुलांनी सजवलेली असते...... हळूहळू एक एक करून सगळे मित्र निघून जातात आता घरात फक्त स्वयम आणि श्रद्धाच असतात.... ते दोघं एकमेकांच्या प्रेमात समर्पित होऊन जातात आणि एकमेकांना आपल्या प्रेमाने फुलवण्याचा प्रयत्न करतात......
त्या दोघांचाही चांगला सुखाचा संसार चालू झालेला असतो.... स्वयम् आणि चिन्मय चे घर एकमेकांच्या समोर असल्यामुळे हळूहळू श्रद्धा ला ही चिन्मय आणि त्याच्या बायकोमध्ये असलेल्या तडी बद्दल समजू लागते..... तिला चिन्मय साठी खूपच वाईट वाटू लागते.... आपलं घर सोडल्यानंतर ती चिन्मय मध्ये नेहमी आपल्या मोठ्या भावाची छबी पाहण्याचा प्रयत्न करत असते, तर चिन्मय ही तिला आपल्या लहान बहिणीसारखाच मानत असतो.... त्यांचे हे भावा बहिणीचे नाते अगदी गंगाजल सारखे पवित्र असते.....
मायाला मात्र त्यांचे हे नाते अजिबात खूपत नाही.... श्रद्धाच्या येण्याने चिन्मयला एक आधार मिळाल्यासारखा वाटू लागतो त्यामुळे त्याला मायाने कितीही त्रास दिला तरी त्याच्या चेहऱ्यावर तो दिसून येत नसतो आणि हीच गोष्ट मायेच्या मनाला खूप लागत असते..... त्यात सोबत श्रद्धा आणि स्वयमचा चाललेला सुखाचा संसार ही तिच्या नजरेत खूपू लागतो.... अशाने माया तडफडू लागते.... हळूहळू त्या दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करू लागते....
चिन्मय आणि श्रद्धा एकमेकांना भाऊ बहिणीप्रमाणे मानत आहेत हे त्यांच्या वागण्यात असते , पण त्यांनी तोंडाने अजून तरी कोणाला बोलून दाखवलेले नसते.... मायाला मात्र याची आधीपासूनच जाणीव झालेली असते परंतु स्वयम नेहमी कामासाठी घरातून बाहेर असल्यामुळे त्याचे घराकडे फारसे लक्ष नसते.... याच गोष्टीचा फायदा घेऊन माया स्वयम् च्या मनामध्ये हळूहळू त्या दोघांबद्दल वाईट साईट भरवण्याचा प्रयत्न करू लागते......
एक दिवशी तर माया मुद्दामून श्रद्धाला आपल्या घरी बोलवते आणि स्वतः मात्र मागच्या दरवाजातून बाहेर निघून जाते.... त्याचवेळी चिन्मय अंघोळीला गेला असल्यामुळे तो फक्त टॉवेल लावूनच बाथरूम मधून बाहेर येतो.... मायाने मुद्दामूनच हे सगळं केलेले असते त्यामुळे तिने स्वयमला फोन करून घरी बोलावले असते.....
" अरे सॉरी, ते मला माया वहिनींनी बोलवले होते म्हणून इकडे आले होते.... " अचानक चिन्मयला तावेलवर समोर पाहून श्रद्धा पाठ फिरवते आणि बोलू लागते... चिन्मय पण थोडासा गोंधळून जातो कारण यावेळी घरी कोणीच नसते हे माहीत असल्यामुळे तो डायरेक्ट टॉवेलवर बाहेर आलेला असतो.... श्रद्धा घाईतच दरवाजातून पुढे जात असताना अचानक तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात चिन्मय पुढे येऊन तिला वाचवतो.... बस ! यावेळी बरोबर स्वयम त्यांच्या घरी येऊन त्यांना त्या अवस्थेत पाहतो आणि स्वतःच्या मनात गैरसमज निर्माण करून घेतो.....
या गोष्टीनंतर चिन्मय आणि श्रद्धा स्वयमला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात पण स्वयंम मात्र कोणाचे काहीही ऐकत नाही... त्याच्या मनात निर्माण झालेला गैरसमज त्याचबरोबर मायाने खूप दिवसापासून लावलेली आग खूपच भडकलेली असते त्यामुळे तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो... तो रागाच्या भरात शब्दाला आपल्या घरातून बाहेर काढतो.....
श्रद्धा आतून खूपच तुटलेली असते , ती रडतच रोड वरून जात असताना अचानक तिच्या वडिलांची गाडी तिच्यासमोर येऊन थांबते आणि आपल्या मुलीची इतकी वाईट अवस्था पाहून तिच्या वडिलांना तिची खूप दया येते, ते तिला गाडीत बसून स्वतःच्या घरी घेऊन जातात......
.
..
...
To be continued.....
************************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा