श्रद्धा आतून खूपच तुटलेली असते , ती रडतच रोड वरून जात असताना अचानक तिच्या वडिलांची गाडी तिच्यासमोर येऊन थांबते आणि आपल्या मुलीची इतकी वाईट अवस्था पाहून तिच्या वडिलांना तिची खूप दया येते, ते तिला गाडीत बसून स्वतःच्या घरी घेऊन जातात......
आता पुढे,
श्रद्धा चे वडील तिला आपल्या घरी घेऊन जातात, पण स्वयंम च्या प्रेमात इतकी आंधळी झालेली असते की , त्याच्याशिवाय ती जगणेही विचार करू शकत नाही.... दिवसेंदिवस तिची अवस्था खूपच नाजूक होऊ लागते.... तिचे वडील डॉक्टरांना बोलून तिला तपास करायला सांगतात, तेव्हा त्यांना समजते की श्रद्धा प्रेग्नेंट आहे....
श्रद्धाच्या वडिलांना तिचे खूप टेन्शन आलेले असते... अशावेळी ते स्वतः एकदा स्वयंम च्या घरी जाऊन त्याला मनवण्याचा प्रयत्न करतात परंतु तो रागाने त्यांना अपशब्द बोलून त्यांचा अपमान करून घरातून बाहेर काढतो.... चिन्मय पण आपल्या परीने स्वयमला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या दिवसापासून त्याने चिन्मय सोबत ही मैत्री तोडलेली असते....
श्रद्धाचे वडील हत्ताश मनाने घरी येऊन बसतात, तेव्हा त्यांना प्रतीक आल्याचे समजते.... ते प्रतीक च्या कानावर सगळी गोष्ट घालतात..... प्रतीक पण स्वतः स्वयम जवळ जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु तो प्रतीक चा ही अपमान करतो.... लग्नाच्या आधी श्रद्धा ने प्रतीक आणि तिच्या लग्नाबद्दल त्याला सांगितलेले असते त्यामुळे तो प्रतीक वर ही नको नको ते आरोप लावतो....
इकडे श्रद्धाची अवस्था मात्र पारच बिकट झालेली असते त्यामुळे शेवटी प्रतीक तिला सावरण्यासाठी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतो.... प्रतीकची आधीपासूनच तिच्यावर खूप प्रेम असते आणि आपल्या प्रेमाला इतक्या त्रासात पाहून त्यालाही त्रास होऊ लागतो....
श्रद्धाला आपल्या प्रेग्नेंसी बद्दल समजलेले असते त्यामुळे तिच्या मनात आपल्या बाळाचा विचार येऊ लागतो.... ती आपल्या वडिलांजवळ स्वयंम कडे जाण्याची आणि त्याला हे सगळं सांगण्याची जिद्द करू लागते... तेव्हा तिला समजते की, तिच्यासाठी तिचे वडील आणि प्रतीक दोघेपण स्वयंकडे गेले होते, पण स्वयंने त्या दोघांचाही अपमान करून त्यांना घरातून बाहेर काढले.....
प्रतीक वर लावलेले आरोप ऐकून तर श्रद्धा ला स्वयंच खूपच राग येऊ लागतो.... रागाने ती जीव देण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस प्रतीक तिला अडवतो....
" श्रद्धा आयुष्य हे खूप सुंदर आहे.... त्याला असे जीव देऊन गमावू नकोस.... तुझ्या पोटात तुझा अंश वाढत आहे, कोणाचा नाही निदान त्याचा तरी विचार कर.... " प्रतीक तिच्याकडे पाहून समजावण्याच्या स्वरात बोलतो....
" मी आज याचा विचार करून जगायचा निर्णय जरी घेतला, तरी उद्या जेव्हा दुनिया याला याच्या बापाचे नाव विचारेल, तेव्हा मी काय करू? त्याच्या प्रश्नांची कशी उत्तर देऊ ? " श्रद्धा रडक्या स्वरात प्रतीक कडे पाहून विचारू लागते...
" श्रद्धा तुझ्या या प्रश्नांची उत्तरं बनण्यासाठी मी तयार आ, हे फक्त तू एकदा मला संधी देऊन तर बघ.... " प्रतीक तिचा हात प्रेमाने आपल्या हातात पकडून तिच्याकडे पाहून बोलतो....
" प्रतीक तुला तर सगळं माहित आहे, तरीही तू या मुलाला नाव देण्यासाठी कसा काय तयार होऊ शकतोस ? " श्रद्धा आश्चर्याने प्रतीचे आढळत पाहून त्याला विचारते....
" श्रद्धा माझ्यासाठी नेहमीच तू महत्त्वाची आहे.... हे जे तुझ्या पोटात आहे हे तुझं बाळ आहे आणि आपल्या लग्नानंतर ते आपलं बाळ होईल.... त्याला मी वडिलांचं नावही देईल आणि त्याचा चांगला वडील होऊन दाखवेल..... " प्रतीक श्रद्धाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत बोलतो.... त्याचं बोलणं ऐकून श्रद्धा भारावून जाते आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होते....
श्रद्धाचे वडील अगदी आनंदाने तिचं आणि प्रतीक्षा लग्न लावून देतात..... प्रतीक च्या या निर्णयांमध्ये त्याचे आई-वडील ही त्याच्यासोबत असल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये कसलाही व्यत्यय येत नाही..... श्रद्धा आनंदाने प्रतीक सोबत जाऊन राहू लागते.... प्रतीक श्रद्धा सोबतच तिच्या होणाऱ्या बाळाची ही खूप काळजी घेऊ लागतो.....
स्वयम मात्र श्रद्धाला सोडून गेल्यानंतर खूपच विचित्र वागू लागलेला असतो.... त्याचा कशातही मन लागत नाही.... तो आपलं काम सोडून इकडे तिकडे भटकू लागतो..... या जगात असलेला त्याचा एकुलता एक मित्रही बेईमान निघाला या विचाराने त्याला चिन्मयला एक नजर पाहणेही आवडत नसेल त्यामुळे तो स्वतःच्या घरात राहणंही सोडून देतो..... श्रद्धा सोडून गेल्यानंतर स्वयंंम च्या मनाला समाधान लाभलेले नसते, तो त्या समाधानाच्या शोधातच इकडून तिकडे भटकत असतो.....
असाच पुढचा एक वर्ष निघून जातो.... तो एका ठिकाणी बसलेला असताना अचानक त्याला समोरून चिन्मय आणि माया जाताना दिसतात.... त्याची नजर मायावर पडते तर माया प्रेग्नेंट असते.... तू आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत असताना त्या दोघांचीही नजर स्वयम वर जाते.... चिन्मय मात्र आपल्या मित्राला अशा अवस्थेत पाहून धावतच त्याच्या जवळ येतो.....
" माझे घर तोडून तू मात्र सुखाचा संसार करत आहेस... " स्वयम एक नजर माया कडे पाहून रागाने चिन्मय कडे पाहून त्याला बोलतो.....
" नाही भाऊजी, तुम्ही चुकीचा विचार करत आहात... चिन्मयने कधीच तुमचा घर तोडण्याचा विचार केला नव्हता... या सगळ्याला मी जबाबदार आहे..... " चिन्मय काही बोलायच्या आधीच माया समोरून बोलते, तिच्या चेहऱ्यावर त्याला पश्चातापाची भावना दिसून येऊ लागते..... स्वयम् डोळे रोखूनच तिच्याकडे पाहू लागतो.....
" हो भाऊजी, तुम्ही तुमच्या बायकोला कधीच ओळखले नाही... ती तर चिन्मयला तिच्या भावा सारखा मानत होती आणि चिन्मय तिला अगदी बहिणीसारखे मानत होता.... त्या दोघांचं असं छानपणे राहणं मलाच आवडले नाही आणि म्हणूनच मी तुमच्या मनात चुकीचा गैरसमज भरवला... त्या दिवशीही मी मुद्दामून श्रद्धाला माझ्या घरी बोलवले होते आणि तुम्हालाही फोन करून बोलवले होते त्यामुळे तुम्ही त्या दोघांनाही तशा अवस्थेत पाहिले..... तुमचा संसार तोडण्यासाठी खरं तर मी जबाबदार आहे..... " माया हळव्या स्वरात त्याच्याकडे पाहून बोलू लागते.....
" नाही माझा संसार सोडण्यासाठी खरं तर मीच जबाबदार आहे... मी स्वतःच्या बायकोचे , मित्राचे बोलणे ऐकलं नाही आणि इतरांच्या बोलण्यात ऐकून गैरसमज करून घेतला.... लग्न हे नातेच विश्वासावर जोडलेले असते आणि मी या नात्यांमध्ये विश्वासच दाखवला नाही , तर माझा संसार सुखाचा कसा होईल ? " स्वयमलाता स्वतःची चूक समजलेली असते.....
" मित्रा जेव्हा आपण एखाद्या मुलीला लग्न करून आपल्या घरी घेऊन येतो, तेव्हा ती सर्वस्वी आपली जबाबदारी झालेली असते.... तिच्यासोबत आपल्याला प्रेमानेच वागायला पाहिजे... तुझ्यासारखा मी पण राग धरून बसलो असतो तर कधीच माझे नाते तुटले असते परंतु मी दरवेळी माझ्या बायकोला समजून घेण्याचा प्रयत्न केला.... ती कितीही माझ्यासोबत वाईट वागली तरी मी नेहमी माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून तर आज माझा संसार टिकून आहे आणि तिलाही तिच्या वागण्याची जाणीव झालेली आहे......
श्रद्धा अगदी निर्मळ मनाची होती... एवढ्या श्रीमंत घराण्यात वाढून देखील तिने कधीही तिचा श्रीमंतीचा गर्व केला नाही... तू जसं ठेवेल तशी ती राहत होती... इतकी समजूतदार बायको असतानाही तू तिच्यावर विश्वास दाखवला नाही... अरे , जेव्हा तू रागाने तिला स्वतःच्या घरातून बाहेर काढले तेव्हा तर ती प्रेग्नेंट होती.... " चिन्मयने त्याला घडलेली सगळी हकीकत सांगितली... हे सगळं ऐकून स्वयंमला स्वतःवरच राग येऊ लागला.... पुढचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तो नव्हता .... तो तिकडून उठून घाईनेच श्रद्धाला भेटण्यासाठी तिच्या घराच्या जवळ आला.....
जेव्हा तो तिच्या घराच्या दारात आला, तेव्हा त्याला श्रद्धा आणि तिच्या हातात असलेले छोटेसे बाळ दिसले... सोबतच प्रतीकही तिच्याजवळ होता..... श्रद्धा बाळाला खेळवतच घराच्या आत निघून गेली परंतु प्रतीक ची नजर मात्र स्वयंम वर गेली आणि तो घराच्या गेटवर येऊन स्वयंम लाभेटला....
" श्रद्धा... " स्वयम च्या तोंडातून फक्त हे दोन शब्द फुटले....
" जेव्हा ती तुझ्याजवळ होती तेव्हा तू तिची, तिच्या प्रेमाची कदर केली नाही.... एवढेच काय तिच्या पोटात असलेल्या तुझ्या बाळाचाही विचार केला नाहीस.... अरे ती तर तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती... पण मी आणि तिच्या वडिलांनी तिला अडवले आणि आता ती माझी बायको आणि ते माझं मूल आहे त्यामुळे तुझ्या आता तिच्यासोबत काही संबंध नाही.... मला माझ्या बायकोच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आलेले पाहायचे नाही त्यामुळे तू इकडून निघून गेलास तरी चालेल...... " प्रतीक रागानेच त्याच्याकडे बघून बोलतो....
स्वयं पण काही न बोलता शांतपणे तिकडून निघून जातो.... आज त्याने जर आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला असता , तर त्याचा हा सुखी संसार असता.... त्याची बायको आणि त्याचं बाळ आज त्याच्या जवळ असते परंतु एका संशयाच्या किड्याने त्याच्या घर संसाराची पूर्ण वाट लावली होती आणि आज सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलं होतं.... आयुष्यामध्ये तो पुन्हा एकदा एकटाच राहिला......