लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
माझा भारत देश हा अनेक विविधतेने सजलेला निसर्गाची अतुलनीय हिरवळ लाभलेला देश आहे.... माझ्या या भारत देशात विविध प्रकारच्या भाषा आणि राहणीमान आढळून येते....
भारतात जवळजवळ 1222 बोलीभाषा आहेत त्यापैकी 234 या मातृभाषा आहेत... माझ्या भारतातील प्रत्येक नागरिकाला जसा आपल्या देशाचा अभिमान वाटतो, तसाच आपल्या भाषेचाही अभिमान वाटतो आणि तो असायलाच पाहिजे....
आपल्या भारत देशात विविध प्रकारच्या भाषा आढळतात त्यामुळे जितक्या जास्तीत जास्त भाषा आपण शिकू शकतो ते आपल्यासाठी उत्तमच असते परंतु या सगळ्यामुळे आपल्या मातृभाषेचे महत्त्व मात्र कमी होत नाही... उलट आपल्या मनात आपल्या मातृभाषेविषयी प्रेम अजूनच वाढत जाते.....
जसा आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो, तसा प्रत्येकालाच त्याच्या मातृभाषेचा अभिमान असतो... मग ती मातृभाषा कोणतीही असो... मराठी, हिंदी, गुजराती , पंजाबी, तमिळ , तेलुगु, मद्रासी इतर आपल्याला आपल्या भाषेसोबतच या सगळ्या मातृभाषेचा आदर राखायला पाहिजे.... एक गोष्ट सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की, इतर भाषिकांचा किंवा मातृभाषेचा अपमान करू आपली मातृभाषा कधीही मोठी होणार नाही, त्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात आपण जितका जास्तीत जास्त आपल्या मातृभाषेचा वापर करू तेवढाच आपल्या मातृभाषेचा अभिमान वाढेल.....
आज या युगात सगळीकडे असे आढळून येते की, जो तो इंग्रजी भाषा बोलण्याचा प्रयत्न करत असतो... इंग्रजी ही भाषा शिक्षणाच्या दृष्टीने जरी योग्य असली तरी ती आपल्या देशाबाहेरची भाषा आहे..... मी असे कधीच बोलणार नाही की , तुम्ही कोणतीही भाषा शिकू नका.... शिक्षण घेतल्याने आपले ज्ञान वाढते त्यामुळे आपल्याला जगाच्या चालीरीती समजतात....
इंग्रजी ही भाषा दुसऱ्या देशातील नागरिकांसोबत संपर्क साधण्याचे साधन होऊ शकते, आपल्या शिक्षणासाठी ती उपयोगी पडू शकते, पण याचा अर्थ असा नाही की, आपल्या देशात ज्यांना कोणाला इंग्रजी येत नाही त्यांचा अपमान करावा किंवा त्यांना कमी लेखावे..... पण आजकालची ही पद्धत झाली आहे की , दोन मराठी भाषिक एकमेकांना भेटले तरी ते एकमेकांशी बोलताना मात्र इंग्रजी भाषेचा उपयोग करतात..... या सगळ्यामुळे आपण आपल्याच मातृभाषेचा कमी वापर करत आहे तिचा अपमान करत आहे ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही......
आपल्या मराठी भाषेवर आपला असणारा अभिमान हा आपल्याला खूप काही सांगून जातो...... आपले आपल्या भाषेवर असलेले प्रेम दर्शवतो.... तरीही आजच्या युगात नागरिक मराठी शाळा सोडून इंग्रजी शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी धडपड करू लागतात....
मोठ मोठ्या शिक्षण तज्ञांनीही हे सांगितले आहे की ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषाच उत्तम असते. .. परंतु आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घातल्यामुळे त्यांना मिळणारे ज्ञान हे इंग्रजी भाषेतून मिळू लागते त्यामुळे आपल्या मुलांना मराठी भाषेबद्दल असावा तितका अभिमान वाटत नाही..... या सगळ्यातूनच आपणच आपल्या भाषेला कमी लेखत आहे असे दर्शवण्याचा प्रयत्न करतो.....
आपली संस्कृती आपली मातृभाषा जपणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण मराठी भाषिकांनीच पुढे येऊन आपल्या मुलांना मराठी संस्कृती बद्दल शिकवायला पाहिजे... त्यांना मराठी शाळेत घालून त्यांनाही आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान वाढवायला पाहिजे... तरच पुढे जाऊन आपल्या मराठी भाषेची प्रगती होईल आणि आपली मातृभाषा जगामध्ये ही प्रसिद्ध होईल.....
माझी भाषा हा मराठी
माझा अभिमान आहे
माझ्या भाषेमधले शब्द
यातच माझा प्राण आहे...
माझा अभिमान आहे
माझ्या भाषेमधले शब्द
यातच माझा प्राण आहे...
माझी माय मराठी
ही माझी शान आहे
मला देवाने दिलेले
सुंदर वरदान आहे....
ही माझी शान आहे
मला देवाने दिलेले
सुंदर वरदान आहे....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा