Login

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे चा अर्थ मराठी vadani kaval gheta meaning in marathi

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे चा अर्थ मराठी vadani kaval gheta meaning in marathi
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे चा अर्थ मराठी vadani kaval gheta meaning in marathi

This article will help you to find :-

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला परब्रह्म म्हटला आहे. लहानपणी जेव्हा शाळेत डबा खायला बसायचो, तेव्हा शाळेतले शिक्षक श्लोक म्हणायला लावायचे अजूनही आठवणीत आहेत ते क्षण.
जर तुम्ही सामान्य हिंदू परिवारातून येत असाल तर घरी सुद्धा जेवणा अगोदर श्लोक म्हणण्याची परंपरा तुम्हाला माहीतच असेल आणि वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक ओळखीचा नाही असा आपल्यापैकी कोणीच नसेल.

पण वेळेच्या ओघात आपण हा श्लोक विसरलो आहोत का ?
आणि ठीक आहे जर आठवणीत आहे तर मग याचा अर्थ काय ? चला तर आजच्या या लेखा मध्ये या दोन्ही प्रश्नांची चांगली उत्तर देऊयात.

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging


वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

अर्थ:-
तोंडात घास घेताना श्री हरीचे नाव घ्या, फुकाचे (म्हणजे कुठलेही द्रव खर्चल्या विना) नाव घेतल्याने सहजच हवन (होम) होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात् परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत.


जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥


|| जय जय रघुवीर समर्थ ||

अर्थ:-
लोकांशी बोलतांना आणि जेवत असतांना जिभेवर रामाचे नाव ठेवावे. अत्यंत आदरपूर्वक गडगडाटी वाणीने त्याची कीर्ती म्हणावी. हरीच्या चिंतानाने अन्न सेवन करीत जावे. असे केल्याने श्रीहरींच्या कायमच्या स्वभावाप्रमाणे तुमच्यावर त्यांची त्यांची कृपादृष्टी राहते.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


तर आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल वदनी कवळ घेता या श्लोकाचा अर्थ तुम्हाला शब्दशः कळला असेल.